सोयाबीन मध्ये तूर आंतरपीक घेताना पट्टा पद्धतीचा अवलंब करावा. हे पट्टा पेर पद्धत प्रमुख यांनी ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र, बैलजोडी चलित पेरणी यंत्र द्वारे चांगल्या पद्धतीने करता येते. या लेखात आपण सोयाबीन आणि तूर आंतरपीक यासाठी पट्टापेर पद्धतीचे प्रकार जाणून घेऊ.
सोयाबीन: तूर आंतरपीक पट्टा पद्धतीचे प्रकार-
- ट्रॅक्टरचलि सात दात्याचे पेरणी यंत्राद्वारे- ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र सात दात्याचे असते. या पेरणी यंत्र द्वारे सोयाबीन आणि तूर आंतरपीक पट्टा तयार करताना तीन ओळी सोयाबीन : दोन ओळी तूर अथवा चार ओळी सोयाबीन + एक ओळ तूर याप्रमाणे नियोजन करता येते. आंतरपीक पद्धतीत सोयाबीन सोबत तुरीची एक ओळ किंवा दोन ओळी घ्या व याचा निर्णय शेतकऱ्यांनी आपल्या पसंती त्यानुसार घ्यावा.
बैलजोडी द्वारे तीन ओळी सोयाबीन: एक ओळ तूर पेरणी- बहुतेक शेतकरी तीन दाती काकरी,सरत्याच्या,पाभरीचा अथवा तीफणी चा वापर करतात. तीन दाती काकरीने पेरणी करताना पट्टा पेर पद्धतीनुसार शेताच्या धूऱ्याकडून पेरणी सुरू करताना तीन ओळी तीन सरत्याद्वारे सोयाबीनच्या घ्याव्यात.
- फिरून येताना तीन पैकी काठावरच्या प्रत्येकी एक सरत्याने बियाण्याची पेरणी न करता केवळ मधल्या सरत्यावर फक्त तुर बियाणे पेरावे. पुन्हा परत जाताना तिनी सरत्यावर सोयाबीन पेरावे.पुन्हा फिरून येताना केवळ मधल्या सरत्यावर तुरीची पेरणी करावी. खाली ठेवलेल्या ओळीच्या ठिकाणी डवऱ्याच्या साह्याने गाळ पाडून घ्यावा.
- बीबीएफ प्लांटरने पेरणी- या ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राद्वारे सोयाबीनची पेरणी रुंद वरंबा व सरी पद्धतीने करता येते. यामध्ये दोन्ही बाजूला प्रत्येकी एक नांगराचे फळा लावलेली असल्याने पेरणी करताना दोन्ही बाजूला नाली तयार होते. या यंत्रावर बियाणे व खत पेरण्यासाठी पेटी दिलेली असते. या माध्यमातून चार जाती पेरणी यंत्र द्वारे सोयाबीन चार ओळी मध्ये गादी वाफ्यावर पेरणी शक्य होते.
याद्वारे सोयाबीन व तूर आंतरपीक घेताना बीबीए प्लांटर प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना पेरणीच्या अंतरानुसार म्हणजेच दोन ओळीतील अंतरानुसार एक ओळ सुटेल एवढी जागा सोडून द्यावी. म्हणजेच प्रत्येक चारओळी सोयाबीनच्या गादी वाफ्यानंतर एक ओळ मावेल एवढ्या लांब वरंबा तयार होतो. या खाली ठेवलेल्या छोट्या गादीवाफ्यावर सोयाबीन पेरणी सोबतच महिलांच्या साह्याने सरळ रेषेत तुरीचे टोकण करावे. तुरीचे बियाणे टोकताना दोन झाडांतील अंतर साधारण वीस सेंटीमीटर ठेवत एका ठिकाणी दोन बिया सुमारे चार ते पाच सेंटीमीटर खोलवर लावाव्यात.
Published on: 24 December 2021, 06:31 IST