रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते मात्र भौतिक सुपीकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतापैकी एक उत्कृष्ट खत आहे. या लेखात आपण गाडूळाचे प्रकार आणि त्यांचा जीवनक्रम जाणून घेणार आहोत.
गांडूळाचे प्रकार
- एपीजीक- ही गांडूळे जमिनीच्या पृष्ठभागालगतच राहतात. आपल्या अन्नपैकी 80 टक्के भाग सेंद्रीय पदार्थ खातात तर 20 टक्के भाग माती व इतर पदार्थ खातात. त्यांचा प्रजननाचा दर अधिक असतो. त्यांचा आकार लहान असतो.
- ॲनसिक- ही गांडूळे साधारणतः जमिनीत एक मीटर खोलीपर्यंत राहतात.ते सेंद्रिय पदार्थ व माती खातात त्यांचा आकार मध्यम असतो.
- ऐन्डोजिक- ही गांडूळे जमिनीत तीन मीटर अथवा त्याहून अधिक खोलीपर्यंत राहतात. त्यांचा आकार लांब असतो व रंग फिकट असतो. तसेच त्यांचा प्रजननाचा दर अतिशय कमी असतो. हे बहुदा माती खातात. यातील प्रकारांची वैशिष्ट्ये व गुणधर्म पाहता एपिजिकआणि ॲनेसिकगांडूळ खत तयार करण्यासाठी वापरली जातात. त्यातही आयसिनियाफेटिडा,पेरीओनिक्स,युड्रीनसआणि लॅम्पिटोया चार प्रजाती अधिक उपयुक्त आहेत. स्वतःच्या वजनाइतके अन्न रोज खातात.
गांडुळाचा जीवनक्रम
गांडुळाच्या जीवनामध्ये अंडी, बाल्यावस्था व पूर्ण अवस्था अशा तीन अवस्था असतात. या सर्व अवस्थांत साठी ओलसर जमीन आवश्यक असते. गांडुळाचा जीवनक्रम प्रामुख्याने त्याच्या जातीवर अवलंबून असतो. पूर्ण वाढ झालेल्या गांडूळामध्ये स्त्री आणि पुरूष जनन असे दोन्हीही अवयव असतात. गांडूळ प्रत्येक सहा ते सात दिवसांनी अंडी टाकते. या अंड्यामध्ये दोन ते वीस गर्भ असतात. अंडी अवस्था हवामानाचा अनुकूलते नुसार सात ते 20 दिवसांचे असते. गांडुळांची अपूर्णावस्था दोन ते तीन महिन्याची असते. त्यानंतर तो जेव्हा पूर्णावस्था मध्ये येतो तेव्हा तोंडाकडील दोन ते तीन सेंटिमीटर अंतरावरील अर्धा सेंटिमीटर आकाराचा भाग जाड होतो हे वयात आलेल्या गांडूळाचे लक्षण होय.
सर्वसाधारणपणे गांडुळांची आयुष्य दोन ते तीन वर्षाचे असते. इसिनीया फेटीडा या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या गांडूळाचीलांबी 12 ते 15 सेंटिमीटर असते. एका किलोमध्ये सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेली एक हजार गांडूळे बसतात.अशी एक हजार गांडूळे घेवून त्यांची अनुकुल वातावरणात वाढ केल्यास एका वर्षात त्यांची संख्या आठ लक्ष 83 हजार होते. पिल्ले व प्रौढ गांडुळे एका किलो मध्ये 2000 बसतात. शंभर किलो प्रौढ गांडुळे महिन्याला एक टन गांडूळ खत तयार करतात.
Published on: 14 December 2021, 01:44 IST