Agripedia

काही वर्षांपासून हवामानाचा अंदाज फार काही अचूक येत नाहीये

Updated on 14 July, 2022 4:17 PM IST

काही वर्षांपासून हवामानाचा अंदाज फार काही अचूक येत नाहीये आणि प्रत्यक्षात पावसाची वाट बघत यावेळेस पेरणी करण्यास देखील शेतकऱ्यांना उशीर झाला आहे.अशावेळी बदलत्या हवामानामुळे तुम्हाला पीकपद्धतीत मोठा बदल करावा लागतो. नवनवीन पिकांची शेती करणं फायदेशीर ठरतं. कारण त्यामुळे शेतकरी मित्र आधुनिकतेची जोड देत शेतीतून लाख रुपये उत्पन्न कमवू शकतो. कोणी कोणी पारंपरिक शेती सोडून नगदी पिक करतात.गुलखेरा फुलांचे उत्पादन मिळवून देतंय पैसा.जर आपण एका औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतीची लागवड केली तर त्याची मुळं, देठ, पाने आणि बिया सर्वच बाजारात विकल्या जातात. 

अशा या गुलखेरा पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा पेरणी केल्यानंतर दुसऱ्यांदा बाजारातून बियाणे विकत घेण्याची गरजच नाही, कारण या वनस्पतीचे बियाणे पुन्हा पेरता येते. गुलखेरा या फुलांच्या शेतीबद्दल सांगायचं झालं तर गुलखेरा वनस्पतीची खास गोष्ट म्हणजे ते कोणत्याही पिकाच्या मध्ये लागवड करून तुम्ही नफा मिळवू शकता. यामुळे डबल फायदा तुम्हाला होऊ शकतो. गुलखेरा हे औषध तयार करण्यासाठी अधिक वापरले जाते.गुलखेरा फुलांची लागवड (gulkhaira farming): माहीतीनुसार, गुलखेरा प्रति क्विंटल 10,000 रुपयांच्या जवळपास विकला जातो. एका बिघामध्ये 5 क्विंटलपर्यंत गुलखेरा निघू शकतो. गुलखेराची पेरणी नोव्हेंबर महिन्याच्या जवळपास केली जाते. तसेच एका बिघामध्ये 50,000-60,000 रुपये मिळणं सोपं आहे. जर आपण आपल्या जवळील असणाऱ्या काही औषध कंपन्यांशी मिटिंग करून

ही वनस्पती आपल्याला हवी का अशी चर्चा करून मागणीप्रमाणे पुरवठा केला तर यापेक्षा दुप्पट, तिप्पट भाव तुम्हाला नक्कीच मिळेल. यामुळे सध्याच्या पिकाचे उत्पादन निघायला जरी तुम्हाला उशीर झाला तरी इतर शेती खर्चासाठी हा काही तात्पुरता पैशांचा जुगाड तुम्हाला कामी येईल.नोव्हेंबरमध्ये जर लागवड केली तर एप्रिल-मे महिन्यामध्ये हे तयार होते. पीक तयार झालं की, पुढील येणाऱ्या एप्रिल-मे महिन्यामध्ये झाडांची पाने व देठ सुकून खाली पडतात. आता तुमचं काम सुरू होईल जे नंतर तुम्हाला गोळा करावे लागतील. या फुलाचा उपयोग विविध औषधांमध्येही होतो जसे की, फुलापासून बनवलेले औषध ताप, खोकला आणि इतर अनेक आजारांवर सुद्धा फायदेशीर ठरते. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांतील शेतकरी त्याची लागवड करत आहेत. कन्नौज, हरदोई, उन्नाव या जिल्ह्यांतील शेतकरी त्याची लागवड करून दरवर्षी तगडी कमाई करतात.

English Summary: The benefit will be great! Earn lakhs of rupees by farming these flowers
Published on: 14 July 2022, 04:17 IST