कांदा हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक आहे.उत्पादन वाढावे आणि कांद्याच्याशेतीच्या माध्यमातूनशेतकरी बंधूंना चांगले उत्पन्न मिळावी यासाठी कांद्याच्या चांगल्या जातीची लागवड करणे फार महत्त्वाचे असते.वेगवेगळे हंगामानुसार व बाजारपेठेची वेगवेगळे मागणी यानुसार चांगल्या प्रकारच्या कांदा जात निवडणेमहत्वाचे असते. या लेखात आपण अशाच काही कांद्याच्या जाती विषयी माहिती घेणार आहोत.
या आहेत कांद्याचा काही महत्त्वाच्या जाती
- बसवंत 780:
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केली जात विकसित केली असून या जातीचे कांदे गोलाकार असतात. तसेच शेंड्याकडे निमुळते होत जातात. यांचा रंग आकर्षक लाल असतो या जातीपासून तीन ते चार टन उत्पादन येते. लागवड ऑगस्ट महिन्यात केल्यास उत्पादन वाढते. हा वाण खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य आहे.
- ऍग्रीफॉउंड डार्क रेड:
नाशिक येथील राष्ट्रीय बागवानी संस्थेने ही जात स्थानिक वानातून विकसित केले आहे. या जातीचे कांदे आकाराने गोल व गर्द लाल रंगाचे असतात. 90 ते 100 दिवसात कांदे काढणीला येतात व हेक्टरी 20 ते 27 टन उत्पादन येते.हवामान खरीप हंगामासाठी उपयुक्त आहे.
3-एन.2-4-1:
पिंपळगाव बसवंत येथील कांदा संशोधन केंद्राने ही जात निवड पद्धतीने विकसित केले आहे.प्रामुख्याने या जातीची शिफारस रब्बी हंगामासाठी केली गेली आहे.कांदे गोलाकार मध्यम ते मोठे असतात. रंग विटकरी असतो व चव तिखट आहे. या जातीचे कांदे पाच ते सहा महिने चांगले टिकतात.लागवडीनंतर कांदे 120 दिवसांनी काढणीला येतात व हेक्टरी 30 ते 35 टन उत्पादन येते. ही जात जांभळा करपा या रोगाला व फुलकिडे यांना सहनशीलआहे.
4-फुले सफेद:
ही जात रांगडा तसेच रब्बी हंगामासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलीआहे. कांद्या चमकदार रंगाचे मध्यम गोल असतात. साठवणुकीत दोन ते तीन महिने टिकतो व हेक्टरी 20 ते 25 टन उत्पादन येते.
5-
फुले सुवर्णा:
हवामान महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1997 विकसित केला असून तिन्ही हंगामात घेण्यास शिफारस केली आहे. या जातीचे कांदे पिवळ्या किंचित विटकरी रंगाचे, गोलाकार, मध्यम तिखट निर्यातीस व साठवणुकीसयोग्य आहे. 110 दिवसांत काढणीस येतो व 23 ते 24 टन उत्पादन येते.
6- पंचगंगा चे विविध प्रकारचे वाण
पंचगंगा सीड्स औरंगाबाद येथील शास्त्रशुद्ध व दर्जेदार कांदा बियाणे उत्पादन करणारी कंपनी आहे.पंचगंगा सुपर,निफाड सिलेक्शन,बसवंत 780,फुले समर्थ, पंचगंगा पुना फुरसुंगी, एक्सपोर्ट स्पेशल या जाती या कंपनीने उत्पादित केलेल्याआहेत.
Published on: 26 September 2021, 03:15 IST