सर्व शेतकरी बंधु यावर्शी पान्याच्या जमीनीतील असलेल्या पान्याच्या उपलब्धतेमुळे चींतीत आहेत.
आता एरीकेशन च्या एरीयात आहे तेवढ्या कमी पान्यावर पीके कशी घ्यावीत,कोनती घ्यावीत,कींवा आहेत त्या फळबागा कशा जगवाव्यात हा मोठा प्रश्न सर्वांनसमोर उभा आहे. मग अशा परीस्थीतीत पान्याचे काटेकोरपने नियोजन जर आपणांस करता आले तर आहे त्या कमी पान्याचा सदउपयोग करुन रबी ची पीकं घेता येतील व पीकाचे नियोजन करतानी शक्यतो कमी पान्याची पीकं नीवडावीत.
zbnf नैसर्गिक विषमुक्त शेती करतांना रासायनीक शेती पेक्षा पाणि कमीच लागते.कारन यामधे आपण आच्छादनाचा व वाफसा आल्यानंतरच पान्याचा उपयोग करतो. आच्छादनामुळे जवळपास ५०% पान्याची बचत तर होतेच पन आच्छादनापासुन कोनतेही पीक घेतानी खुप फायदे आपणांस होतात.
नेहमी पीकांना पाणि देतानी वाफसा स्थीतीवरच पाणि दिले पाहीजे.वाफसा स्थिती असतांनी पानी दिल्यास पाणि कमी लागते व आच्छादनामुळे पान्याचे बाष्पीभवन न होता हवेतील पाणि आच्छादन ओढुन घेते व पीकांना पानी उपलब्ध होते त्यामुळे पान्याची बचत होते. जमिनीच्या पृष्ठभागाखालि मुळयाच्या परिसरात , दोन माती कणाच्या मध्ये ज्या पोकळया असतात त्या पोकळयामध्ये पाण्याचे अस्तित्व नको तर पोकळयामध्ये 50 % पाण्याची वाफ व 50 % हवा यांचे मिश्रण हवे . या स्थितिला ” वाफसा ” म्हणतात .
जसे :- 1) गादी वाफ्यात कांदे किंवा लसुण लावतो . वाफ्याच्या काटाचे कांदे मोठे होतात कारण तेथे वाफसा असतो .
2) उंच सखल भाग – त्यात तूर पेरली – सखल भागातील तूर खुरटी व उंच भागातील तूर जोमदार दिसेल कारण वाफसा .
नाही म्हणुन जास्ती पाणी पाजतो तेव्हा दोन मातीच्या कणामध्ये ज्या पोकळया असतात त्या सर्व पाण्याने भरून जातात व तेथील हवा निघुन जाते. वाफा पाण्याने गच्च भरतो तेव्हा बुड- बुड असा जो आवाज येतो तो त्या निघुन जाणाऱ्या हवेचा असतो . परीणामी मुळया व जीवानुना ऑक्सिजन मिळत नाही आणि जीवाणु मरतात व मुळया कुजतात .मुळाकडुन अन्नाचि होणारी उचल ( Mineral Uptake ) थांबते त्यामुळे पाने पिवळी पडू लागतात , वाढ खुंटते अर्थातच उत्पादनात घट .
म्हणून पाणी एवढे दिले पाहिजे की , मातीच्या दोन कनामधिल पोकळयात पाणी साठणार नाही , तर त्या पाण्याची वाफ जमिनीतील उष्णतेने होईल ( जास्त पाणी दिले तर जमीन थंड पड़ते व वाफ बनत नाही ) व त्या पोकळयामध्ये 50 % पाण्याची वाफ व 50 % हवा यांचे मिश्रण होईल एवढेच पाणी द्यावे.समजा जमिनीत अंगभुत उष्णता आहे जेणेकरुन त्या उष्णतेने प्रति मिनट 2 ली पाण्याची वाफ होते तेव्हा 2 ली पाणी दिले तर वाफसा होईल .
पण जर आपण 2 ली ऐवजी 4 ली पाणी दिले तर 2 ली पाण्याची वाफ बनेल व 2 ली पाणी तसेच राहील व वाफसा राहणार नाही . म्हणून जमिनीला एवढेच पाणी दिले पाहिजे जेणेकरून मुळीजवळ वाफसा राहील व अतिरिक्त पाणी गांडूळनि पाडलेल्या छिद्रातुन भूजल साठ्याकडे निघुन जाईल व वाफसा कायम राहील. सर्वच माझे मताशि सहमत असतीलच असे नाही.मी माझे मत मांडले,आपण आपले मत मांडु शकता.
लेखक गजानन खडके
9422657574
Published on: 22 January 2022, 01:36 IST