Agripedia

जमीन क्षारयुक्त होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर, जमिनीतून होणाऱ्या पाण्याचा निचरा चा अभाव इत्यादी कारणांमुळे जमिनी क्षारयुक्त होतात. या समस्येवर वेळीच लक्ष दिले नाही तर ऐका आणि जमीन नापीक होतील.क्षारयुक्त जमिनीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

Updated on 20 October, 2021 1:47 PM IST

 जमीन क्षारयुक्त होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गरजेपेक्षा  जास्त पाण्याचा वापर, जमिनीतून होणाऱ्या पाण्याचा निचरा चा अभावइत्यादी कारणांमुळे जमिनी क्षारयुक्त होतात. या समस्येवर वेळीच लक्ष दिले नाही तर ऐका आणि जमीन नापीक होतील.क्षारयुक्त जमिनीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

 ही समस्या जास्त करून ज्या भागांमध्ये पाटाच्या पाण्या द्वारे सिंचनाची व्यवस्था असते, अशा भागातील जमिनी मोठ्या प्रमाणात क्षारयुक्त आढळतात. भारताचा विचार केला तर भारतामध्ये एकूण 11.3 दशलक्ष हेक्‍टर जमीन खारवट व चोपण बनली असल्याचे आढळले आहे. महाराष्ट्र मध्ये क्षारपड व पाणथळ जमीन मुख्यतः सांगली,सातारा, सोलापूर, धुळे,पुणे, अहमदनगर,जळगाव, अकोला इत्यादी जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने आढळतात.

जमिनी क्षारयुक्त कशा बनतात?

 जमिनीच्या मूळ स्तरावर किंवा  खडकावर ऊन, वारा, पाऊस वगैरे नैसर्गिक घटकांचा परिणाम होऊन माती बनते. सर्वप्रथम खडकांची झीज होऊन त्यापासून लहान लहान आकाराचे कण बनतात व पावसाच्या पाण्याने व आर्द्रतेने त्यामध्ये अनेक रासायनिक क्रिया घडून क्षारांची निर्मिती होते.

ज्या भागात पाऊस जास्त असतो तिथे हे विरघळणारी क्षार पावसाबरोबर नैसर्गिक रित्या सहज धुऊन जातात. जमिनीचा पृष्ठभाग तापल्याने पाण्याचे बाष्पीभवन होऊन खालच्या थरातील क्षार जमिनीच्या पृष्ठभागावर येतात. अति उष्णता व कमी उष्ण तापमान, सिंचनाचे खराब पाणी,सिंचनाच्या पद्धती, पाण्याच्या निचरा चा अभाव इत्यादी कारणांमुळे जमीन क्षारयुक्त होतात.

क्षारयुक्त जमिनीची सुधारणा

 यावर सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे जमिनीची योग्य सपाटीकरण करूनयोग्य अंतरावर चर खणून पाण्याचा निचरा याची सोय करावी. जमिनीची खोल नांगरट आणि कुळवणी करावी. त्यामध्ये विद्राव्य क्षार पृष्ठभागावर येत नाहीत. कंपोस्ट आणि शेणखत यासारख्या सेंद्रीय खतांचा  वापर करावा. सेंद्रिय खतातील सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन कार्यक्षम अशी सेंद्रिय आम्ले तयार होतात. जमिनीचा सामू कमी करायला मदत करतात. तसेच विनिमय व्यवस्थेतील सोडियम ला घालवून घेतात.

जिप्समचा वापर केल्यास जमिनीतील कॅल्शियम म्हणजे चुन्याचे प्रमाण वाढते आणि सोडियमचे प्रमाण कमी होते. जमिनीचा सामू आणि क्षारांचे प्रमाण नुसार लोह पायरॉइटचा देखील वापर करावा.

 ताग,धैचा, सुबाभूळ, शेवरी यासारखी हिरवळीची पिके घेऊन त्यांचा हिरवळीचे खत म्हणून वापर करावा. उन्हाळ्यात शेतात वाफे करून त्यात पाणी सोडून विरघळलेले क्षार धुऊन काढावेत. बाष्पीभवनामुळे पृष्ठभागावर येणार्‍या क्षारांचे प्रमाण कमी करण्यासाठी उसाच्या पाचटाचे आच्छादन म्हणून वापर करावा.क्षारांनानजुमानणारीपालक,लसूण, कांदा, कापूस, ऊस, शेवरी यासारखी पिके घ्यावीत.

English Summary: thats reason behind alkaline land reason and remedy
Published on: 20 October 2021, 01:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)