Agripedia

भारतामध्ये कांद्याचा वापर आहारात मोठ्या प्रमाणात केला जातो. खरीप हंगामातील कांदा लगेच मागणी असल्यामुळे विकला जातो परंतु रांगडा हंगामातील कांदा साठवता येऊ शकतो. प्रदू कांद्याची साठवण करत असताना खूप काळजी घ्यावी लागते. कांदा साठवणूक की मध्ये दुर्लक्ष केल्यास कांद्यावर साठवणुकीत येणारे रोग होऊ शकतात.त्यामुळे कांद्याचे फार मोठे नुकसान होते. या लेखात आपण कांदा साठवणुकीत होणारे रोगाबद्दल माहिती घेऊ.

Updated on 09 January, 2022 5:13 PM IST

 भारतामध्ये कांद्याचा वापर आहारात मोठ्या प्रमाणात केला जातो. खरीप हंगामातील कांदा लगेच मागणी असल्यामुळे विकला जातो परंतु रांगडा हंगामातील कांदा साठवता येऊ शकतो. प्रदू कांद्याची साठवण करत असताना खूप काळजी घ्यावी लागते. कांदा साठवणूक की मध्ये दुर्लक्ष केल्यास कांद्यावर साठवणुकीत येणारे रोग होऊ शकतात.त्यामुळे कांद्याचे फार मोठे नुकसान होते. या लेखात आपण कांदा साठवणुकीत होणारेरोगाबद्दल माहिती घेऊ.

कांद्याच्या साठवणुकीत येणारे रोग

  • मानकूज- हा बुरशीजन्य रोग असून या रोगाची लागण कांदा जेव्हाकाढणीला येतो तेव्हा होते. या रोगाची लक्षणे कांदाचाळीत भरल्यानंतर दिसू लागतात. या रोगाची बुरशी पानाच्या जखमांमधून मानेपर्यंत पोहोचते. मानेतील पेशी मऊ होतात तसेच कांदा उभा कापला असता मानेचा खालचा भाग तपकिरी दिसतो. कांद्याच्या पापुद्रा मध्ये राखाडी रंगाची बुरशी वाढलेली दिसते. कांदा काढल्यानंतर तो व्यवस्थित सुखावला नाही तर या रोगाचा प्रसार होतो.

या रोगाचे नियंत्रण

 या रोगाच्या नियंत्रणाकरिता पेरणीपूर्वी थायरमची दोन ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.बुरशीचे जीवनचक्र थांबावे याकरिता पिकाची फेरपालट करावी. काढणी करण्यापूर्वी कांदा पिकावर वीस ग्रॅम कार्बेन्डाझिम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कांद्याचे काढणी केल्यानंतर दोन ते चार दिवस पातीसह शेतात सुकवावा. नंतर लांब मानकापून प्रतवारी करून सावलीत दहा ते पंधरा दिवस सुकवून  मग चाळीत भरावा.

  • काळीबुरशी- हा देखील एक बुरशीजन्य रोग आहे. या रोगाची लागण कांद्याचे काढणी झाल्यानंतर कांद्याच्या वरच्या भागाकडून होते. कांद्याच्या वरच्या पापुद्रा च्या आत असंख्य पुंजके दिसतात. बुरशीची वाढ होऊन वरच्या एक-दोन पापुद्रा पर्यंत पोहोचते. काही काळानंतर कांद्याचा पृष्ठभाग काळा होतो. साधारणतः जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये साठवलेल्या कांद्यावर ही बुरशी जास्त वाढलेली दिसते.

नियंत्रण

मानकूज रोगासाठी जे व्यवस्थापन करावे लागते त्याच्या रोगासाठी ही करावे.

  • निळी बुरशी-हा रोग पेनिसिलियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगात सुरुवातीला कांद्यावर खोलगट पिवळे डाग पडतात. ते लगेच हिरवट निळसर होतात.
  • या रोगामुळे कांद्याचे सोड मोठ्या प्रमाणात वाढते.इतर साठवणुकीतील रोगावर करण्यात येणारे व्यवस्थापन याही रोगास लागू पडते.
  • काजळी- हादेखील बुरशीजन्य रोग असून या रोगाची सुरुवात कांदा काढणीपूर्वी काही दिवस आगोदर होते. या रोगाची तीव्रता कांदा चाळीत साठवला नंतर वाढते. कांद्याच्या वरच्या आवरणावर लहान गर्द हिरवा किंवा काळा ठिपकापडतो. ठिपक्यांचा आकार कालांतराने वाढत जातो व बुरशी गोल कड्यान सारखी दिसते. कधी कधी काळी बुरशी पापुद्रा याच्या शिरांच्या मार्गाने पसरलेली दिसते. पांढर्‍या कांद्याच्या जाती या रोगास जास्त प्रमाणात बळी पडतात. याच्या नियंत्रणासाठी कांदा काढणीपूर्वी बुरशीनाशकाची इतर साठवणुकीत येणाऱ्या रोगाप्रमाणे फवारणी करावी. कांदा चांगला सुकवून साठवून गृहात भरावा.
English Summary: that is some harmful disease in onion storage symptoms and management
Published on: 09 January 2022, 05:13 IST