सध्याच्या काळा मध्ये शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये वारंवार आलेल्या तणावरती बेसुमार पणे तणनाशकाचा वापर करत आहेत.त्याची कारणे :- १) मजुर उपलब्ध होत नाहीत.२) वाढलेली मजुरी.३) तणांचे वाढते प्रमाण तणनाशक न वापरण्याची कारणे ही अत्यंत महत्वाची
आहेत :- तणनाशक वापरल्यामुळे पुढील नुकसान होते Further damage is caused by the use of herbicides :-1) उभ्या पिकाच्या वाढी वरती विपरीत परिणाम होतो.
कॅल्शिअम व सल्फेटयुक्त खते का मिसळुन देऊ नये वाचा भयानक कारण
त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता असते.2) जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढुन जमिनीतील सामु वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पिके त्यांना पाहीजे तेवड्या प्रमाणात अन्नद्रव्य घेऊ शकत नाहीत.
3) जमिन कडक बनते त्यामुळे जमिनीतील हवेचे प्रमाण कमी होऊन मुळांना पाहीजे तेवड्या प्रमाणात ऑक्सीजन न मिळाल्याने पिकांची वाढ मंदावते. 4) तणनाशक वापरल्यामुळे मृत पावलेल्या तणातील आणी जमिनीवरती पडलेले रासायनिक घटक जमिनीत विरघळल्याने पिकाच्या पांढय्रा मुळीची वाढ मंदावते.
६) तणनाशक वापरल्यामुळे विविध आजारावरील आयुर्वेदिक तणे नष्ट होत आहेत.७) तणनाशकाच्या अती वापरामुळे जमिनीची जलधारणक्षमता कमी होऊन जमिन नापीक होऊ शकते.८) तणनाशक वापरलेल्या ठिकाणी पेरणी केल्यावर उगवणक्षमता कमी होऊन पिक किमान १ वर्ष चांगले येत नाही.
शेतीचे, मानवाचे उत्तम आरोग्य हिच खरी संपत्ति
पानी फाउंडेशन
मो: नंबर :- ८६०५५५५९७८
Published on: 29 October 2022, 11:14 IST