Agripedia

खरबूज हे फळ मूळचे इराण, अनातोलिया आणि आर्मेनियाचे आहे. खरबूज व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. त्यात 90 टक्के पाणी आणि 9 टक्के कार्बोहायड्रेट असतात. भारतात खरबूज पिकवणाऱ्या राज्यांमध्ये पंजाब, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे. खरबूज हे नगदी पीक आहे. फळ पिकण्याच्या वेळी कोरडे हवामान आणि पश्चिमी वारा वाहल्यामुळे फळांचा गोडवा वाढतो. हवेत जास्त ओलावा असल्यास फळे उशिरा पिकतात आणि रोग होण्याची शक्यताही वाढते.

Updated on 30 August, 2021 6:49 PM IST

खरबुजची लागवड कशी करावी? (Melon Cultivation)

खरबूजासाठी उन्हाळ्याचा हंगाम हा सर्वोत्तम हंगाम आहे, खरबूजची वेल जानेवारीच्या सुरुवातीपासून ते फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत लावली जाते.

जर जमीन रेताड असेल आणि तापमान 22 ते 26 अंशांच्या दरम्यान असेल तर पिकाचे उत्पादन चांगले येते. जर यावेळी पश्चिमी वारा वाहू लागला तर फळांमध्ये अधिक गोडवा येतो.

तसेच, वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या महिन्यात लागवड केली जाते, दक्षिण भारतात, ऑक्टोबरमध्ये, तर बिहारमध्ये डिसेंबर आणि जानेवारीमध्ये आणि उत्तर भारतातील इतर राज्यांमध्ये फेब्रुवारीपर्यंत लागवड केली जाते.

कोणती वाण लागवडीसाठी योग्य?

आता सपाट जमिनीवरही शेती केली जाते.   जातीचा विचार केला तर; पुसा मधुरस, अर्का रहंस, काशी मधू, दुर्गापुरा मधु, पंजाब सुन्ही, गुजरात खरबूज अशा अनेक जाती आपल्या देशात लागवड केल्या जात आहेत. यामध्ये शेतकरी विशिष्ट क्षेत्राच्या जमिनीची गुणवत्ता लक्षात घेऊन पिके लावत आहेत.

खरबूज कसे लावले जातात?

बरेचसे लोक दोनदा पिके घेतात, एकदा जानेवारी महिन्यात आणि दुसऱ्यांदा 15 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी पर्यंत.

यामागचे कारण म्हणजे आपण पिक दोन महिने बाजारात विकू शकतो.

एकरमध्ये ते सुमारे तीन बेड बनतात, प्रत्येक वाफ्यामध्ये बियाणे लावतात;तसेच इतर पारंपारिक पद्धतीने रोपे लावतात जसे कि,

कलम पद्धतीप्रमाणे.

खरबूजची काढणी कधी होते?

त्याची काढणी एका शेतात 4 ते 5 वेळा केली जाते. एक आठवड्यापासून 15 दिवसात पीक तयार होते आणि बाजारात पोहोचते.

एका एकरात 150 क्विंटल ते 250 क्विंटल खरबूज तयार होतात, म्हणजेच माल एकरी 5 लाख दराने विकला जातो आणि दोन ते अडीच लाख रुपये मिळतात.

English Summary: technology of melon crop
Published on: 30 August 2021, 06:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)