Agripedia

महोगनी हे असे एक झाड आहे ज्याची लागवड करून शेतकरी चक्क करोडपती होऊ शकतात. हो जर एक एकर जमिनीत महोगनी झाडाची 120 झाडे लावली तर शेतकरी फक्त 12 वर्षात करोडपती होईल. सर्व प्रथम महोगनी विषयी जाणुन घ्या शेतीसह फळबागांच्या माध्यमातून शेतकरी आपले उत्पन्न दुप्पट करू शकतो. शेतकरी फळ किंवा लाकडाची झाडे लावू शकतात. यासह, शेतकरी या वनस्पतींच्या दरम्यान देखील अन्य पिकांची लागवड करू शकतात.

Updated on 30 August, 2021 6:39 PM IST

महोगनी हे असे एक झाड आहे ज्याची लागवड करून शेतकरी चक्क करोडपती होऊ शकतात.  हो जर एक एकर जमिनीत महोगनी झाडाची 120 झाडे लावली तर शेतकरी फक्त 12 वर्षात करोडपती होईल.

 

 

 

 

सर्व प्रथम महोगनी विषयी जाणुन घ्या

शेतीसह फळबागांच्या माध्यमातून शेतकरी आपले उत्पन्न दुप्पट करू शकतो. शेतकरी फळ किंवा लाकडाची झाडे लावू शकतात. यासह, शेतकरी या वनस्पतींच्या दरम्यान देखील अन्य पिकांची लागवड करू शकतात.

यामुळे त्यांचे उत्पन्नही दुप्पट होईल.महोगनी लाकूड एक मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारे लाकूड आहे.  हे लाकूड लाल आणि तपकिरी रंगाचे आहे.  त्यावर पाण्याच्या कोणताही परिणाम होत नाही म्हणजे पाण्याने लाकूड खराब होत नाही. हे झाड केवळ 50 डिग्री सेल्सियस पर्यंत तापमान सहन करण्याची क्षमता ठेवते आणि पाणी नसले तरीही ते वाढतच राहते.

 

 

 

 

पाच वर्षांतून एकदाच येतात झाडाला बीया

मोहगणीच्या लाकडाचा वापर चौकटी, फर्निचर लाकडी बोटी आणि इतर फर्निचर च्या वस्तू तयार करण्यासाठी केला जातो, ज्या खूप मौल्यवान मानल्या जातात. त्याची पाने प्रामुख्याने कर्करोग, रक्तदाब, दमा, सर्दी आणि मधुमेहासह अनेक प्रकारच्या आजारांमध्ये उपयोगी असल्याचे सांगितलं जाते. मोहगनीचे झाड पाच वर्षांतून एकदा बिया देते.

एका झाडापासून पाच किलो बिया मिळू शकतात.  त्याच्या बियाण्यांची किंमत खूप जास्त आहे आणि ती एक हजार रुपये प्रति किलो पर्यंत विकली जातात. जर आपण ठोक बाजारासंदर्भात बोललो तर लाकूड बल्कमध्ये 2 ते 2200 रुपये प्रति घनफूट सहज विकले जाते. ही एक औषधी वनस्पती देखील आहे, म्हणून त्याची बिया आणि फुले शक्तीवर्धक औषधे निर्माण करण्यासाठी वापरली जातात.

या झाडाच्या पानांमध्ये एक विशेष प्रकारचा गुण आढळतो, ज्यामुळे डास आणि कोणत्याही प्रकारचे कीटक त्याच्या झाडांजवळ येत नाहीत. या कारणामुळे त्याच्या पानांचे आणि बियांचे तेल डास प्रतिबंधक आणि कीटकनाशके बनवण्यासाठी वापरले जाते.  साबण, पेंट, वार्निश आणि अनेक प्रकारची औषधे त्याच्या तेलाचा वापर करून बनवली जातात.

 

 

 

 

मोहगनीची झाडे कुठे वाढतात ?

 ज्या ठिकाणी जोराचे वारे कमी वाहतात त्या ठिकाणी महोगनी झाडे उगवली जातात, कारण त्याची झाडे 40 ते 200 फूट उंच असतात.  पण भारतात हे झाड फक्त 60 फूट लांबीपर्यंत वाढते. या झाडांची मुळे कमी खोल आहेत आणि भारतात ते डोंगराळ भाग वगळता कुठेही वाढू शकतात. महोगनी झाडांची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवता येते. त्याची झाडे कोणत्याही सुपीक जमिनीत वाढू शकतात, परंतु त्याची झाडे पाणी धरून ठेवणाऱ्या जलयुक्त जमिनीत किंवा खडकाळ जमिनीत लावू नका. या झाडांसाठी मातीच पीएच मूल्य सामान्य असावे.

 

 

महोगनी लागवडीसाठी हवामान

उष्णकटिबंधीय हवामान महोगनी लागवडीसाठी सर्वोत्तम मानले जाते, जास्त पाऊस त्याच्या झाडांच्या वाढीसाठी योग्य नाही. महोगनीची झाडे सामान्य हवामानात चांगली विकसित होतात, जेव्हा महोगनीची झाडे लावली जातात, तेव्हा त्यांना तीव्र उष्णता आणि थंडीपासून बचाव करावा लागतो. महोगनी वनस्पतींना अंकुरीत आणि विकसित होण्यासाठी सामान्य तापमानाची आवश्यकता असते, हिवाळ्याच्या हंगामात 15 डिग्री आणि उन्हाळ्याच्या हंगामात 35 डिग्री तापमानात चांगले वाढते.

 

 

 

 

 

 

भारतात पाच विदेशी वाण घेतले जातात

भारतात आतापर्यंत महोगनीच्या झाडांची विशेष प्रजाती आलेली नाही, आतापर्यंत फक्त 5 विदेशी जातींचे कलमी वाण घेतले गेले आहे.  यात क्यूबन, मेक्सिकन, आफ्रिकन, न्यूझीलंड आणि होंडुरन जातींचा समावेश आहे. झाडांच्या या सर्व जाती झाडांच्या गुणवत्तेच्या आधारावर आणि त्यांच्या उपजाच्या आधारावर उगवल्या जातात, या वनस्पतींची लांबी 50 ते 200 फूट असते.

 

 

 

 

 

 

महोगनीची रोपे कुठून करणार खरेदी?

महोगनी लागवडीसाठी, त्याची रोपे कोणत्याही नोंदणीकृत सरकारी कंपनीकडून खरेदी केली जाऊ शकतात, याशिवाय, त्याची रोपे नर्सरीमध्ये देखील तयार केली जाऊ शकतात.  रोपवाटिकेत रोपे तयार करण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत लागते. म्हणून, त्याची रोपे खरेदी करणे आणि लावणे अधिक योग्य आहे.  रोपवाटिकेतून रोपे खरेदी करताना, हे लक्षात ठेवले पाहिजे की झाडे दोन ते तीन वर्षांची आहेत आणि चांगली वाढतात. जून आणि जुलै हे महिने रोपे लावण्यासाठी अधिक योग्य मानले जातात.

 

 

 

 

 

लाकडाला असतो सोन्यासारखा भाव

महोगनी झाडे एका एकरमध्ये सुमारे 12 वर्षे वाट पाहिल्यानंतर कोटी रुपये कमवून देऊ शकतात. महोगणीच्या झाडाच्या लाकडाची किंमत दोन हजार रुपये प्रति घनफूट आहे.  त्याची बियाणे आणि पाने देखील चांगल्या किमतीत विकली जातात, शेतकरी महोगनी लागवड करून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

English Summary: technology of mahogany cultivation
Published on: 30 August 2021, 06:39 IST