Agripedia

महाराष्ट्रात शेतकरी आता नवनवीन पिकांची लागवड करत आहेत आणि त्यापासून चांगली कमाई देखील करत आहेत. टरबूज पिकाची देखील महाराष्ट्रात लागवड हि उल्लेखनिय आहे. अनेक शेतकरी बांधव टरबूज पिकातून चांगले उत्पन्न मिळवीत आहेत. महाराष्ट्रात टरबूज पिकाच्या लागवडिखाली जवळपास 660 हेक्टर एवढे मोठे क्षेत्र आहे. महाराष्ट्रात ह्या पिकाची लागवड हि फळबागात आंतरपीक म्हणुन तसेच नदी नाल्याच्या किनारी प्रामुख्याने केली जाते. टरबूजची मागणी देखील चांगली आहे, ह्याचा उपयोग हा कच्चा देखील केला जातो, कच्चे टरबूज हे लोनच्यासाठी व भाजी बनवण्यासाठी केला जातो.

Updated on 02 November, 2021 7:19 PM IST

उन्हाळ्याच्या दिवसात टरबूज खाने आरोग्यासाठी उत्तम असल्याचे सांगितलं जाते, डॉक्टर देखील ह्याचा सल्ला देतात. त्यामुळे उन्हाळ्यात याला प्रचंड मागणी असते. टरबूज मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असतात यामध्ये मुख्यता व्हिटॅमिन ए, बी आणि व्हिटॅमिन सी आढळतात जे की आपल्या मानवी शरीरासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे ह्या टरबूजची मागणी हि उल्लेखनीय आहे. म्हणुन कृषी जागरण आपल्या वाचक शेतकरी मित्रांसाठी टरबूज लागवडीची ए टू झेड माहिती घेऊन आले आहे.

 टरबूज पिकाला आवश्यक जमीन आणि हवामान

»टरबूज पिकासाठी मध्यम प्रकारची काळी जमीन योग्य असल्याचे सांगितले जाते पण ह्या मध्यम काळ्या जमिनीत पाण्याचा निचरा हा चांगला झाला पाहिजे.

»मातीची पातळी/स्तर 5.5 ते 7 पर्यंत ह्या पिकासाठी योग्य असल्याचे सांगितलं जाते.   »टरबूज पिकासाठी उष्ण आणि कोरडे हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो.  »24 °C ते 27 °C तापमान हे टरबूज पिकाच्या वेलीच्या वाढीसाठी उत्तम असल्याचे टरबूज उत्पादक शेतकरी सांगतात.

»तापमान 18 °C पेक्षा कमी किंवा 32 °C पेक्षा जास्त झाल्यास, टरबूज च्या वेलीचा पाहिजे तसा विकास होत नाही तसेच फळाची वाढ खुंटते.

»टरबूजच्या बिया ह्या 21°C पेक्षा कमी तापमाणात उगवत नाहीत.

 टरबूज लागवड कधी

»टरबूजच्या बियाणे टोपण्याची/पेरणीची वेळ हि नोव्हेंबर ते मार्च दरम्यान योग्य असते. »नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पेरणी केली तर रोपांचे दंवपासून/दडपासुन संरक्षण करणे गरजेचे आहे.

»बहुतेक शेतकरी टरबूजची लागवड हि जानेवारी-मार्चच्या सुरुवातीला करत्यात. »तसेच टरबूज उत्पादक शेतकरी सांगतात की, डोंगराळ भागात मार्च-एप्रिल महिन्यात टरबूजची लागवड करावी त्यामुळे उत्पादनात वाढ होते त्या शेतकऱ्यांना परिणामी फायदा मिळतो.

टरबूज पिकासाठी पूर्वमशागत

टरबूज पिकासाठी वावर चांगले तयार करणे महत्वाचे आहे त्यासाठी वावराची उभी-आडवी नांगरणी करावी, ढेकळे फोडून चांगली वावराची मळणी करावी. वावरात चांगल्या क्वालिटीचे कंपोस्ट अथवा शेणखत टाकावे ज्यामुळे उत्पादन चांगले मिळते. टरबूजसाठी एकरी सव्वा किलोच्या आसपास बियाणे लागते. मित्रांनो टरबूजच्या बियाण्यावर प्रक्रिया करणे महत्वाचे असते त्यासाठी 3 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाणे वापरावे असा सल्ला शेतकरी बांधव देतात.

English Summary: technique of watermelon cultivation and management
Published on: 02 November 2021, 07:19 IST