रेशीम उद्योग हा खूप मोठा आर्थिक उलाढाल असलेल्या उद्योग आहे.त्याला फार मोठी किंमत मिळते. या उद्योगासाठी शासनाकडून देखील मदतीच्या माध्यमातुन चालना देण्याचे प्रयत्न चालू आहेत. यासाठी सरकारने जागोजागी रेशीम उद्योग केंद्र उभारले आहेत. या केंद्रांमधून रेशीम अळ्यांचे अंडी पुंजी तसेच मार्गदर्शन देखील मिळते. या लेखामध्ये आपण रेशीम शेती विषयी सविस्तर माहिती घेऊ.
तुतीची लागवड पद्धत
1-तुती लागवड साठी कसदार जमीन लागते.तुतीची लागवड करताना दोन सरीचा मधील अंतर चार ते पाच फूट ठेवावेआणि ओळी मधील दोन झाडांमध्ये तीन फुटाचे अंतर ठेवावे.म्हणजे तुतीपोसेलतिची वाढ उत्तम प्रकारे होईल.
2-तूती ही रानटी वनस्पती असल्याने त्याला पाणी कमी लागते. एक एकर उसाला जेवढे पाणी लागते तेवढे पाण्यात तीन एकर तुती आरामात जगते.
3-पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन किंवा पारंपरिक पाटाने पाणी देऊ शकता.
4-तुती लागवडीपासून 45 दिवसात तुती कापणीला येऊन अडीच ते तीन महिन्यातून उत्पन्न मिळवूशकतात.
5- एकदा लावलेली तुती तुम्ही पंधरा वर्षापर्यंत आरामात जगवू शकता. तुम्हाला तुटीची पुन्हा लागवड करण्याची गरज नसते.
6- एका एकरामध्ये तुम्ही 200 किलो रेशीम उत्पादन मिळवू शकता.
रेशीम शेतीसाठी शेडची रचना
- शेडचा कार 65 फूट लांब आणि 34 फूट रुंद असावा. ( एका एकर तुती साठी )
- रेशीम शेतीसाठी शेडची गरज लागते. शेड बांधण्यासाठी शासन अनुदानही देते.
- शेड बांधताना ते स्वच्छ करण्यास सोपे राहील अशा पद्धतीने शेड बांधावे.
- अळ्यांना वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी स्वच्छतेला खूप महत्त्व आहे.
- अळी शेडमध्ये आणण्यापूर्वी ते रेशीम कोष विकल्यानंतर संपूर्ण शेड तसेच अळी ठेवण्यासाठी केलेले रॅक लोखंडी असो किंवा बांबूचे ते निर्जंतुक करून घ्यावी.
- अशा पद्धतीने बांधावे जेणेकरून तिथे इतर प्राणी किंवा कीटकांना शिरकाव करता येणार नाही.
- मुंग्यांपासून संरक्षणासाठी साधा उपाय म्हणजे रॅक चे पाय वाटी किंवा प्लेटमध्ये ठेवून त्यात पाणी ओतावे जेणेकरून मुंग्या वर चडणार नाहीत.
- शेडचा आसपासचा परिसर स्वच्छ असावा जेणेकरून तेथून रोगजंतूंचा प्रादुर्भाव होणार नाही.
- शेड मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने स्वच्छता पाळावी.त्यांच्या हातात द्वारे देखील रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
अशा पद्धतीने करावे रेशीम अळ्यांचे संगोपन
1-रेशीम अळीलाकमीत कमी 25 डिग्री सेल्सिअस ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान लागते.यापेक्षा जास्त किंवा कमी तापमानात या जगू शकत नाही.
2-आठ दिवसांची रेशीम आळी किंवा तुम्ही अंडी रेशीम संचालनालय आतूनविकतघेऊ शकतात.
3-अळीचा जीवन क्रम तीस दिवसात पूर्ण होतो शेवटचे पाच सहा दिवस अळी कोश तयार करते.
4- या अळ्यांना हिरवा तुतीचा पाला खाऊ घालावा सकाळी आणि संध्याकाळी खाऊ घालावा.
5-मोल्ड नंतर हिरवा पाला वाढवावा.
6-तुतीची पिवळी पाने खाऊ घालू नयेत त्यामुळे रेशीम चा दर्जा कमी होतंपर्यायाने उत्पादन कमी मिळते.
7- रेशीम आळी ने धागा बनवायला सुरुवात केली की तिला पाला टाकले बंद करून रेकवर चंद्रिका अंथरावी जेणेकरून आळ्या कोष चंद्रिके वर येऊन बसतील.
8-एका एकर तुतीची लागवड करून तुम्ही वर्षभरात चार ते पाच वेळेस रेशीम कोष तयार करू शकतात.
- एका एकरातील तुती पासून 200 किलोपर्यंत तुम्ही कोश विकू शकता.
- कमीत कमी दोन एकर तुती लावून तुम्ही वर्षभरातून आठ वेळा उत्पन्न मिळवू शकतात.
- बाजार भाव हा कोषाच्या दर्जावर अवलंबून असतो.
- एका एकरात तुती कापणीला येण्यासाठी 45 दिवस आणि त्यानंतर एक महिन्यात 200 किलो कोष,एक लाख रुपये उत्पन्न अडीच महिन्यात मिळू शकतात.
- खर्चहा दहा हजार रुपये एका वेळेला लागतो.
- तयार मालतुम्ही बेंगलोरला देखील विकू शकता.
Published on: 22 November 2021, 03:30 IST