यावर्षी पावसाच्या लहरीपणाचा व हवामानाच्या बदलाचा सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील उत्पन्न शेतकऱ्यांच्या हातून पूर्णता गेले आहे. शेतकरी यातून कसाबसा सावरत होता, आणि खरीप हंगामाची भरपाई रब्बी हंगामात करू पाहत होता. पण गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी मुळे व त्यानंतर हवामानाच्या बदलामुळे रब्बी हंगामातील पिकांना देखील मोठा फटका बसताना दिसत आहे. सध्या राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे, आणि या वातावरणाचा फटका रब्बी पिकांना बसत आहे. राज्यात या बदललेल्या हवामानामुळे रब्बी पिकांवर अनेक रोगांचे सावट बघायला मिळत आहे. पिकांवर प्रामुख्याने मावा आणि तांबोरा रोग मोठ्या प्रमाणात नजरेस पडत आहे. रब्बी हंगामातील सूर्यफूल, गहू, हरभरा या पिकांवर मावा आणि तांबोरा प्रकर्षाने दिसून येत आहे.
तसे बघायला गेले तर मावा आणि तांबेरा या दोन्ही रोगावर नियंत्रण हे सहजरीत्या मिळवता येऊ शकते, मात्र असे असले तरी दोन्ही रोगांमध्ये थोडासा साम्यपणा आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना नेमका रोग कुठला आहे ते ओळखता येत नाही आणि त्यामुळे शेतकरी चुकीचे कीटकनाशके फवारणी करताना दिसत आहेत आणि यामुळे रोग आटोक्यात येत नाहीये याउलट पिकांवर याचा विपरीत परिणाम बघायला मिळत आहे. आणि यामुळे उत्पादनात देखील घट होऊ शकते असे कृषी वैज्ञानिक सांगत आहेत. खरं पाहता यंदा रब्बी हंगामासाठी सर्व काही पोषक आहे मात्र वातावरणातील होत असलेला सततचा बदल हा पिकांसाठी थोडासा घातक सिद्ध होत आहे. पिकांवर आलेला मावा आणि तांबेरा या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य कीटकनाशकांची निवड करणे महत्त्वाचे ठरते, म्हणून आज आपण या रोगांची ओळख करून घेणार आहोत तसेच यावर कोणती फवारणी करावी याविषयी जाणून घेणार आहोत.
असे ओळखा मावा आणि तांबोरा रोग व किड
राज्यात सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे आणि त्यामुळे दैनंदिन तापमानात फरक बघायला मिळत आहे, याचा एकत्रित परिणाम पिकांना घातक ठरत आहे व पिकांवर विशेषतः गव्हावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मावा किड गव्हाच्या पानावर शेंड्यावर विष्टा टाकते ही विष्ठा चिकट असते ती एक प्रकाराची बुरशी असते. आणि यालाच शेतकरी तांबोरा समजतात त्यामुळे मावा किडीवर तांबोराची
कीटकनाशकांची फवारणी केली जाते. पण यामुळे मावा किडीवर नियंत्रण मिळवले जाऊ शकत नाही, याउलट यामुळे पिकाची क्षती होते. म्हणून जिथे माव्याची विष्ठा असते तिथे पानाने स्पर्श करावा आपणांस तिथे किडीची हालचाल दिसली की समजायचे मावा आहे नाही हालचाल झाली तर तांबोरा समजायचे आणि त्यानुसार किडींवर नियंत्रण मिळवायचे.
Published on: 20 December 2021, 06:38 IST