भारतात सध्या रब्बी हंगामाची लगबग सुरू आहे, जवळपास सर्वत्र रब्बी हंगामाच्या पेरण्या झाल्या आहेत, रब्बी हंगामातील पिके आता वाढीसाठी तयार आहेत. रब्बी हंगामात सर्वात महत्त्वाचे पीक म्हणून गव्हाच्या पिकाला ओळखले जाते. राज्यात गव्हाची लागवड बऱ्यापैकी आपणास दिसून येईल, रब्बी हंगामात याचे क्षेत्र कमालीचे वाढण्याची नोंद करण्यात आली आहे. कृषी वैज्ञानिक याचे कारण असे सांगतात की, रब्बी हंगामाच्या सुरुवातीला राज्यात अवकाळी नामक सावट आले होते, अवकाळी मुळे रब्बी हंगामाचा पिक पेराच लांबला, तेव्हा अवकाळी मुळे वावरात पाणी साचले होते, तसेच वाफसा नव्हता. तेव्हा फक्त रब्बी हंगामातील गव्हाच्या पिकासाठी पोषक वातावरण होते, त्यामुळे गव्हाचा पेरा हा लक्षणे वाढला. पेरा तर वाढला पण आता, हवामानाचा बदलाचा सामना गव्हाच्या पिकाला करावा लागत आहे, सध्या राज्यात ढगाळ सदृश्य वातावरण निर्माण झाले आहे आणि याचा सर्वात मोठा फटका गव्हाच्या पिकाला बसताना दिसत आहे कारण की यावर तांबेरा नावाचे ग्रहण लागले आहे. जर तांबेरा रोग अधिक प्रमाणात पिकावर वाढला तर याचा परिणाम सरळ उत्पादनात होतो, यामुळे कवाचा तेरा अधिक असून सुद्धा उत्पादनात घट होऊ शकते म्हणून गव्हावरील तांबेरा रोगाचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे ठरते. चला तर मग मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत गव्हावर आलेल्या तांबेरा रोगाचे नियंत्रण नेमके कसे केले जाणार.
कृषी वैज्ञानिकांच्या मते, गव्हावर येणारा तांबेरा हा तीन प्रकारचा असतो. जो खोडावर येतो तो काळा तांबेरा, जो पानावर येतो तो नारंगी तांबेरा, कृषी वैज्ञानिकांच्या मते आपल्याकडे पिवळा तांबेरा सहसा जाणवत नाही. त्यामुळे आज आपण या दोन तांबेरा रोगाच्या व्यवस्थापना विषयी जाणून घेणार आहोत.
गव्हाच्या पानांवर येणारा तांबेरा
याला नारंगी तांबेरा म्हणून ओळखतात. जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान याचा प्रादुर्भाव अधिक असतो. जर याचा प्रादुर्भाव अधिक असला तर हा रोग खोडावर सुद्धा बघायला मिळतो. या रोगाचे लक्षण असे की, पानावर पिवळ्या रंगाचे ठिपके तयार होतात, हे प्रामुख्याने गोल आकाराची असतात, त्यानंतर याच टिपक्यांचे रूपांतर फोडात होते. वातावरणात थंडी आणि आर्द्रता जास्त असली तर या रोगाचा प्रसार अधिक होतो.
असे करा नियंत्रण
गहू उत्पादक शेतकऱ्यांनी एका गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे ती गोष्ट म्हणजे पेरणी ही नेहमी नोव्हेंबर महिन्यातच आटपली गेली पाहिजे, नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा हा रब्बी हंगामातील गव्हाच्या पेरणीसाठी आदर्श मानला जातो. गव्हाची पेरणी करताना दुसरी विशेष भाग म्हणजे, पेरणी ही नेहमी सुधारित बियाण्याचीच करावी. तसेच असे बियाण्याची पेरणी करावी ज्या बियाण्याची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असते. गव्हाच्या पिकात कृषी वैज्ञानिकांच्या मते, नत्र आणि स्फुरद व त्याचे प्रमाण 2:1 असावे.

Published on: 21 December 2021, 12:51 IST