महाराष्ट्र मध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. तसे पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये भरगोस पद्धतीने कांद्याचे उत्पादन शेतकरी बंधू घेतात. परंतु आपण कांदा लागवडीचा विचार केला तर यामध्ये आपल्याला माहित आहे की अगोदर कांद्याची रोपवाटिका तयार केली जाते व नंतर पुनर लागवड केली जाते. या दृष्टिकोनातून कांदा रोपवाटिका तयार करण्यासाठी कांद्याची बियाणे शेतकरी बंधू विकत घेतात.
बरेच शेतकरी बंधू घरी तयार केलेले कांद्याची बियाणे रोपवाटिकेसाठी वापरतात आणि काही इतर शेतकऱ्यांकडून घरगुती बियाणे विकत घेतात.
तर बाकीचे शेतकरी बंधू कृषी सेवा केंद्राकडून विविध कंपन्यांची बियाणे विकत घेतात. परंतु या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर कांद्याचे बोगस बियाण्याच्या बाबतीत अनेक प्रकारच्या तक्रारी गेल्या दोन-तीन वर्षात ऐकायला मिळाल्यात.
बरेच शेतकरी बंधूंचे यामुळे खूप मोठे नुकसान झाले. त्यामुळे कांदा बियाणे खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यामध्ये उत्पादनाला फटका बसून नुकसान होणार नाही. त्यामुळे कांदा बियाणे खरेदी करताना कोणत्या गोष्टींची विशेष करून काळजी घ्यावी याची या लेखात माहिती घेऊ.
कांदा बियाणे खरेदी करायचे तर घ्या अशा पद्धतीने काळजी
1- त्यात महत्त्वाचे म्हणजे कांदा बियाणे खरेदी करताना जे कृषी सेवा केंद्र चालक संबंधित बियाण्याचे गुणवत्ता व दर्जाच्या बाबतीत हमी देतील अशा अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करणे गरजेचे आहे. तसेच कांदा बियाणे खरेदी करताना पावती घेणे गरजेचे आहे.
2- कांद्याचे बियाणे खरेदी केल्यानंतर त्याचे पॅकिंग, पिशवी, त्या बियाणे खरेदीची पावती व त्या पॅकिंग मधील थोडे कांद्याचे बियाणे काढणी होईपर्यंत खूप सांभाळून ठेवणे गरजेचे आहे.
नक्की वाचा:आता सरकारकडून फळबागांची लागवड करण्यासाठी तब्बल 100 टक्के अनुदान; असा घ्या लाभ
3- कांदा बियाणे घेताना बियाण्याचे पाकीट सीलबंद किंवा मोहर बंद आहे ना याची तंतोतंत खात्री करून घ्यावी. कारण यामुळे तुम्हाला जर कुठल्या भेसळीचे शंका असेल तर ती दूर होते. तसेच कांदा बियाण्याच्या पॅकिंग वरील लॉट क्रमांक आणि अंतिम मुदत पाहून घेणे खूप गरजेचे आहे.
4- बऱ्याचदा वजन कमी किंवा छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करण्यात येते. असे प्रकार जर तुम्हाला दिसून आले तर तुम्ही तुमच्या नजीकच्या कृषी विभागाशी तात्काळ संपर्क साधने कधीही चांगले असते. अशा गैरप्रकारचे माहिती तुम्ही प्रत्यक्ष भेटून किंवा मोबाईल द्वारे किंवा एसएमएस करून देखील कृषी विभागाच्या निदर्शनास आणून देऊ शकतात.
नक्की वाचा:लिंबू उत्पादक शेतकऱ्यांनो सावधान! या रोगापासून करा लिंबाचा बचाव अन्यथा होईल मोठे नुकसान
Published on: 03 November 2022, 08:15 IST