Agripedia

तणांचा जर पिकांमध्ये प्रादुर्भाव असला तर पिकांची वाढ व्यवस्थित होत नाही.बरेचदा असे होते की, तणांचे बी हे जमिनीच्या वरच्या भागात असल्यामुळे त्यांची उगवण लवकर होते व रासायनिक खत मुख्य पीका ऐवजी तणांना मिळत असल्याने त्यांची वाढ झपाट्याने होते.

Updated on 23 November, 2021 3:27 PM IST

तणांचा जर पिकांमध्ये प्रादुर्भाव असला तर पिकांची वाढ व्यवस्थित होत नाही.बरेचदा असे होते की, तणांचे बी हे जमिनीच्या वरच्या भागात असल्यामुळे त्यांची उगवण लवकर होते व रासायनिक खत मुख्य पीका ऐवजी तणांना मिळत असल्याने त्यांची वाढ झपाट्याने होते.

त्यामुळे मुख्य पिकास खत उपलब्ध होत नाही. तसेच उगवणाऱ्या पिकाच्या वाढीवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे.जलद गतीने उगवलेल्या तनाचा बंदोबस्त करण्यासाठी शक्यतो शेतकऱ्यांनी कोळपणी व निंदणी द्वारे तणनियंत्रण करावे. तणांचा प्रादुर्भाव जास्त असेल तरच तणनाशकाचा वापर करावा.

 तणनियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर नुकसान व तोटे

 सततच्या तणनाशकाच्या वापरामुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंचा नाश होऊन जमिनीचा पोत, सामू, विद्युत वाहकता, कर्ब व नत्राचे प्रमाण इत्यादींवर परिणाम होत असल्यामुळे  पिकाच्या उत्पादनावर परिणाम होतो. मोठ्या प्रमाणावर तनाचा प्रादुर्भाव असल्यास उगवणीनंतर चे तणनाशक फवारणी करीता वापरावे. उगवणी पूर्व तणनाशकाची फवारणी केली असल्यास  उगवणीनंतर शिफारस केलेल्या तणनाशकाची फवारणी करू नये.कारण उगवणीपुर्वी अथवा उगवणीनंतर केलेल्या तणनाशक फवारणी चा परिणाम हा 45 दिवसांपर्यंतराहतो.तणनाशक फवारणी करीता स्वतंत्र पंप वापरावा.उगवण पूर्व तणनाशक फवारणी करता वापरलेला पंपपुन्हा वापरताना स्वच्छ करावा. तसेच कीटक नाशक फवारणी करिता वापरलेला पंप तणनाशक फवारणी करता वापरू नये.शक्यतोवर फवारणी वारा शांत असताना सकाळी किंवा सायंकाळी करावी. कारण यावेळी पानावरील छिद्रे  जास्त प्रमाणात उघडलेली असतात. त्याद्वारे फवारणीचे द्रावण तणाकडून जास्त प्रमाणात शोषले जातेव त्यामुळे प्रभावी तणनियंत्रण होते.

 फवारणीसाठी अल्कधर्मी पाण्याचा वापर करू नये-

 तणनाशके ही अल्कधर्मी असल्यामुळे फवारणी करता वापर करत असलेले पाणी आम्लधर्मी म्हणजेच पाण्याचा सामू तीन ते सहा असणे आवश्यक आहे.फवारणी करीता गढूळ पाणी अजिबात वापरू नये. फवारणी साठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा सामू सहा पेक्षा जास्त असल्यास तणनाशके अशा पाण्याच्या संपर्कात आल्याबरोबर तणनाशकातील घटकाची क्रियाशीलता कमी होते.त्यामुळे अपेक्षित प्रमाणात तण नियंत्रण होत नाहीशेतकऱ्यांनी फवारणीवर केलेला खर्च वाया जातो.

 हेक्‍टरी 500 लिटर पाण्यातील द्रावणात ची फवारणी करावी-

 बहुतेक शेतकरी पावर स्प्रे पंपाद्वारे फवारणी साठी हेक्‍टरी 125 ते 150 लिटर द्रावण वापरतात. त्यामुळे संपूर्ण एक हेक्‍टरवर पुरेशा प्रमाणात फवारणी होत नसल्याने त्याचा अपेक्षित फायदा होत नाही.

एक हेक्‍टर क्षेत्राकरिता किमान पाचशे लिटर पाण्यातील द्रावण फवारणीसाठी वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नॅपसॅकस्प्रे पंपाचा वापर करून हेक्टरी 500 लीटर पाण्यातील द्रावणाच्या फवारणी करावी.

 फवारणी करताना घ्यायची काळजी

  • पेरणी करणारा व्यक्ती निर्व्यसनी. त्या व्यक्तीने फवारणीच्या अगोदरच्या दिवशी मद्यपान,धूम्रपान केलेले नसावे.
  • फवारणी करणाऱ्या व्यक्तीने सुरक्षाकवच परिधान करून फवारणी करावी.
  • तणनाशकाची फवारणी करताना ज्या तणनाशकाची शिफारस विशिष्ट पिकासाठी केलेले आहे, त्याच पिकांमध्ये फवारणी करावी अन्यथा इतर पिकांमध्ये फवारणी केल्यास पिकांच्या नुकसान होऊ शकते.
  • पावर स्पेअर किंवा ट्रॅक्टर वरील पंपाने फवारणी करणे अत्यंत चुकीचे असून तणनाशक फवारणी करताना नॅपसॅकस्प्रे पंपाचा वापर करावा.
English Summary: take precaution while sprey of herbicide on crop follow that
Published on: 23 November 2021, 03:27 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)