Agripedia

देशातील लोकसंख्या हि वाढतच आहे आणि त्यासाठी अन्नाची गरज देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शेतात पिकासाठी अनेक नवनवीन पेस्टीसाईडचा वापर हा वाढत आहे. अधिक उत्पादणासाठी तसेच पिकांचे रोगापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी बांधव पेस्टीसाईडचा वापर हा करत असतात. पेस्टीसाईड मध्ये कीटकनाशक, कवकनाशक, बुरशीनाशक इत्यादी रासायनिक औषधंचा समावेश असतो.

Updated on 20 November, 2021 9:14 PM IST

देशातील  लोकसंख्या हि वाढतच आहे आणि त्यासाठी अन्नाची गरज देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शेतात पिकासाठी अनेक नवनवीन पेस्टीसाईडचा वापर हा वाढत आहे. अधिक उत्पादणासाठी तसेच पिकांचे रोगापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी बांधव पेस्टीसाईडचा वापर हा करत असतात. पेस्टीसाईड मध्ये कीटकनाशक, कवकनाशक, बुरशीनाशक इत्यादी रासायनिक औषधंचा समावेश असतो.

पिकाच्या चांगल्या विकासासाठी ह्या रासायनिक औषधंचा वापर हा गरजेचा आहे पण जर ह्याच औषधंचा अतिरेक वापर हा केला गेला तर ह्यापासून अनेक दुष्परिणाम घडतात. याच्या अतिरिक्त वापरामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम घडतात, जसे की, जल प्रदूषण होते, मातीचे प्रदूषण, वायू प्रदूषण, पिकांवर परिणाम होतो, उपयुक्त जिवाणू वर वाईट परिणाम होतात.

पेस्टीसाईडचे हानीकारक परिणाम लक्षात घेता, आज कृषी उत्पादन वाढीबरोबरच पर्यावरणावर आणि सजीवांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नयेत यासाठी कीटकनाशकांचा सुरक्षित आणि न्याय्य वापर करण्याची गरज आहे. कीटकनाशकांच्या तसेच इतर सर्व प्रकारच्या पेस्टसाईडच्या सुरक्षित आणि न्याय्य वापरासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते या लेखात आज आपण जाणून घेऊया.

 पेस्टीसाईड संबंधी घ्यावयाची काळजी

»पेस्टीसाईड खरेदी हि नोंदणी असलेल्या केंद्रातूनच करा.

»पेस्टीसाईड जेवढे आवश्यक आहे तेवढेच, योग्य प्रमाणात खरेदी करा.

»पॅकिंगवर बॅच नंबर, लेव्हल इत्यादी बाबी तपासून खरेदी करा.

»कृषी विशेषज्ञाचा सल्ला घेऊन आवश्यक तेच पेस्टीसाईड खरेदी करा व वापरा.

»पेस्टीसाईडचे खुले पॅकेट खरेदी नका करू

»पेस्टीसाईड ठेवताना विशेष काळजी घ्या. लहान मुलांपासून तसेच पशुपासून पेस्टीसाईड लांब राहतील याची काळजी घ्या.

»वेगवेगळ्या रासायनिक औषधे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा.

»आवश्यक तेवढेच पेस्टीसाईडचे द्रावण तयार करा व फवारणी करा.

»ग्लोव्हस, मास्क, इत्यादी आवश्यक साधने वापरा जेणेकरून यापासून आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही.

»औषध फवारणी साठी शुद्ध पाण्याचा वापर करा.

»तयार केलेले द्रावण 24 तासानंतर वापरू नका.

»वारंवार एकच प्रकारचे औषध फवारू नका. यामुळे पिकांचे नुकसान होते.

»फवारणी साठी योग्य ते मशीनरी वापरा म्हणजे, पंप, ब्लोअर इत्यादी.

»

फवारणी करण्याआधी यंत्रची व्यवस्थित पाहणी करून घ्यावी व स्वच्छ करून घ्यावे.

»औषध पॅकेट तोंडाने फोडू नये तसेच पाटपंप किंवा इतर मशीनरीला असलेले नोजेल तोंडाने उघडू नये.

»कोणतीही फवारणी हि संध्याकाळच्या वेळीच करावी.

»फवारणी करताना हातमोजे, मास्क इत्यादी गोष्टी वापराव्यात.

»वाऱ्याच्या वेगानुसार अंदाज बांधून फवारणी करावी.

»फवारणीपूर्वी, तयार झालेल्या फळे आणि भाज्या खुडून टाका.

English Summary: take precaution to use of pesticide and follow some tips
Published on: 20 November 2021, 09:14 IST