Agripedia

पावसाळा म्हटलं म्हणजे ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाट असतो. हे वातावरण प्रामुख्याने जून महिन्याच्या सुरुवातीला जास्त असते. नेमकी या वेळेसच शेतामध्ये पेरणीची लगबग सुरू असते. सुरुवातीच्या पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात विजा कोसळण्याच्या घटना घडतात. अशा वातावरणात आपल्या पशुधनाचे विजापासून संरक्षण करणे खूप महत्त्वाचे असते.

Updated on 25 October, 2021 9:19 AM IST

पावसाळा म्हटलं म्हणजे ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाट असतो. हे वातावरण प्रामुख्याने जून महिन्याच्या सुरुवातीला जास्त असते. नेमकी या वेळेसच शेतामध्ये पेरणीची लगबग सुरू असते. सुरुवातीच्या पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात विजा कोसळण्याच्या घटना घडतात. अशा वातावरणात आपल्या  पशुधनाचे विजापासून संरक्षण करणे खूप महत्त्वाचे असते.

अंगावर वीज पडू नये यासाठी अनेकांना काय करावे हे माहिती नसते. दरवर्षी आपण पाहतो की वीज पडून अनेक जण दगावतात. याचा फटका शेतकरी आणि पशुपालकांना बसू नये यासाठी काही खबरदारी घेणे खूप महत्त्वाचे असते. विजा कडाडत असताना आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याची माहिती या लेखात घेऊ.

 विजा कडाडत असताना कोणत्या गोष्टी करणे टाळावे?

  • सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गुरांच्या उघड्या गोठ्यामध्ये किंवा पडक्या घरात बसू नये.
  • पावसाळ्यात आपण बहुतेकदा पाऊस सुरू झाला की छत्री वापरतो. परंतु छत्री वापरताना त्याला धातूचा दांडा नाही ना याची काळजी घ्या. धातूचा दांडा असलेली छत्री वापरू नये.
  • शेतात असताना कृषी अवजारे, यंत्रे इत्यादींपासून दूर राहावे.
  • जनावरे जर तलावात किंवा नदीत पोहत असतील तर त्यांना लगेच बाहेर काढावे.
  • मुक्त गोठ्यातील जनावरे शक्यतो अशा परिस्थितीतच बांधून ठेवावे.
  • जवळ विजेचे खांबकिंवा टेलिफोन किंवा  टेलिव्हिजन टावर असेल तर अशा जागेवर उभे राहू नये.
  • विजेवर चालणारी उपकरणे तसेच प्लग जोडलेली सर्व विद्युत उपकरणे बंद ठेवावे.
  • शेतात पाणी भरत असताना विद्युत पंप तात्काळ बंद करावा.
  • शेतामध्ये असताना ट्रॅक्टर, सायकल किंवा दुचाकी यावर असाल तर तात्काळ सुरक्षित ठिकाणी पोहोचावे.
  • पिंपळ किंवा वडा सारख्या मोठ्या झाडांपासून दूरच राहावे.
  • ओल्या शेतात काही काम चालू असेल तर तिथून तात्काळ कोरड्या जागेत यावे.
  • शेत,जनावरांचा गोठा किंवा घराभोवती तारेचे कुंपण घालू नये कारण या गोष्टी विजेलासहज आकर्षित करतात.
  • मोकळ्या जागी असाल तर उंच जागेवर थांबू नये एखाद्या खोलगट भागात जाऊन थांबावे.
  • शेतामध्ये सुरक्षित ठिकाण नसेल तर पायाखाली लाकूड, गोणपाट, प्लास्टिक अशा वस्तू किंवा वाळलेला पालापाचोळा ठेवावा.
  • एकाच ठिकाणी जास्त व्यक्तींनी न थांबता दोन व्यक्ती  मध्ये 15 ते 20 फूट अंतर ठेवावे.
English Summary: take precaution rain and lightning
Published on: 25 October 2021, 09:19 IST