Agripedia

यावर्षी राज्यात भरपूर पाऊस झाला. आता सगळीकडे पाऊस थांबला आहे.त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. आता थंडीची चाहूल लागली आहे त्यामुळे साहजिकच वातावरणात धुक्याचे प्रमाण वाढले आहे. या पडणाऱ्या धुक्यामुळे पिकांचे नुकसान होते.

Updated on 23 October, 2021 12:33 PM IST

यावर्षी राज्यात भरपूर पाऊस झाला. आता सगळीकडे पाऊस थांबला आहे.त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. आता थंडीची चाहूल लागली आहे त्यामुळे साहजिकच वातावरणात धुक्याचे प्रमाण वाढले आहे. या पडणाऱ्या धुक्यामुळे पिकांचे नुकसान होते.

कांदा पिकाच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्यामुळे कांदा पिकाचे शेंडे पिवळे होण्यास सुरुवात होते. कांद्याची पात झुकलेले दिसतात.धुक्यामुळे कांदा पिकावर मावा, करपा या दोन रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. धोक्यापासून कांदा पिकाचे नुकसान होऊ नये, यासाठी कोणती उपाययोजना करावी  याबाबतची माहिती या लेखात घेऊयात.

धुक्यात कांदा पिकाची काळजी अशी घ्यावी.

1-हिवाळ्याच्या दिवसात कांद्याच्या पातीवर जे मोठ्या प्रमाणात दव  साठलेले असते. ते काढणे गरजेचे असते. यासाठी प्रेशर पंपाच्या सहाय्याने पाण्याचे फवारणी करू शकता.त्यामुळेपातीवरील धुके नाहीसे होऊन जाईल.

 दुसरा उपाय म्हणजे सिलिकॉन बेस स्टिकर ची पाण्यात मिसळून फवारणी करू शकता.

3- धुके ज्या वेळी पडत असेल त्याच वेळी पिकावर फवारणी घेणे गरजेचे असते. दुपारी फवारणी घेऊ नये. तसेच पिकावर बुरशीनाशकांची फवारणी करू शकता.

4- ज्या शेतकऱ्यांचा कांदा स्प्रिंकलर  किंवा रेन पाइप वर आहे त्यांनी सकाळच्या धुक्याच्या वेळात पाच ते दहा मिनिटांसाठी स्प्रिंकलर सुरू करावी.

5-

डोक्यावर पूर्वीपासून चालत आलेला एक उपाय आहे ते म्हणजे पूर्वीच्या काळी शेतकरी लिंबाच्या पाल्याने कांद्याच्या पाठीवरीलधुकझटकायची. हा देखील उपाय उत्तम आहे.

6- तसे पाहिल्यास कांदा पिकाला रोजच्यारोज फवारणीची आवश्‍यकता नसते. मात्र रोजच जर धुके पडत असेल तर तीन दिवसातून एकदा बुरशीनाशकाची फवारणी करावी. शक्यतो द्रव स्वरूपातील बुरशीनाशकाचा वापर करावा.

( स्त्रोत- हॅलो कृषी)

English Summary: take precaution onion crop in winter season and fog condition
Published on: 23 October 2021, 12:33 IST