भूपृष्ट लगतची आद्र हवा थंड होऊन तापमान गोठणबिंदू च्या खाली गेल्यासधुके निर्माण होते. काही प्रसंगी पृथ्वीवरील उष्ण पाणी बाष्पीभवन क्रियेमुळे जवळीलशुष्क थंड हवेत शिरते. मग हवा संतृप्त झाल्यासही धुखे संभवते.याप्रसंगी वारा वाहणे मध्येच बंद झाल्यास किंवा आभाळ निरभ्र झाल्यास कांदा पिकावर विपरीत परिणाम होतो. धुक्याच्या प्रभावामुळे रोपांची पात जळून जाते आणि गळून पडते.या काळात रोपावर येणारा मर रोग व त्याविषयी करायचा उपाय योजना याची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.
कांदा रोपावरील मररोग
रब्बी हंगामात दरम्यान पाऊस झाल्यास किंवा ढगाळ वातावरण असल्यास व रोपवाटिकेत स्क्लेरोशियम रॉलफ्सीया बुरशीमुळे मर रोग होतो. रोप वाढत असतानाही बुरशी जमिनीलगतचा भागातून शिरकाव करते. यामध्ये जमिनीलगतचा रोपांचा भागमऊपडतो आणि रोपे कोलमडतात,सुकतात व पिवळी पडतात. त्यावर पांढरी बुरशी वाढते. बुरशी जमिनीत सुप्तावस्थेत अनेक वर्षे राहू शकते.या रोगामुळे रोपांचे दहा ते 90 टक्क्यांपर्यंत नुकसान होते.प्रादुर्भावित रोपांच्या पुनर्लागवडीनंतर हा रोग शेतात देखील मोठ्या प्रमाणात पसरतो.
या रोगावर उपाय योजना
- बियाणे निरोगी स्वच्छ व खात्रीचे असावे.
- लागवडीपूर्वी बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.
- रोपवाटिकेसाठी पाण्याचा निचरा लवकर आणि चांगल्या प्रमाणात होणारी जागा निवडावी.
- रोपे गादीवाफ्यावर तयार करावे.कारण त्यावर पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारेहोतो.
- रोपवाटिकेची जागा प्रत्येक वेळी बदलावी.
- रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास दोन रोपांच्या ओळीत ताम्रयुक्त बुरशीनाशक आचे पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात ओतावे.
- पुनर लागवड सरी वरंब्यावर करावी.
- धुके पडणारे वातावरण कीडबुरशीला उपयुक्त ठरत असल्याने कीडनाशके अधिक प्रभावीकाम करीत नाहीत. अशा स्थितीत पुढील प्रतिबंधात्मक उपाय करावेत.
- शेताजवळ, बांधावर पहाटेच्या वेळी मध्यम ओलसर पालापाचोळा, कोरडे तण,सुकलेले लाकूड आधी हवेच्या प्रवाहाच्या उलट दिशेलापेटवून धूर करावा.त्यात दगडी कोळसा टाकून धूर व उष्णता रात्रभर राहील असे पाहावे.
- पिकास थोडे पाणी द्यावे. शेतात पाणी सोडल्याने तापमान 0.5 ते दोन अंश सेल्सिअसपर्यंत वाढते.
- ज्या दिवशी धुके पडण्याची शक्यता असेल त्या दिवशी पाण्यात विरघळणाऱ्या गंधक पावडरीची (80 टक्के)40 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
- शेताच्या उत्तर पश्चिम दिशेच्या बांधावर झाडे मध्यभागी ठिकाणी वारा प्रतिरोधक तुती,शिसव,सुबाभूळ,जांभूळ आधी झाडांचे सजीव कुंपण तयार केल्यास गार हवेच्या झोका पासून पिकाचा बचाव होऊ शकतो.
- धुक्याचा प्रभाव कमी करण्यासाठी दरवर्षी शेतात अल्प प्रमाणात वाळू मिसळा.
- सुडोमोनासफ्लूरोसेन्सएक किलो प्रति एकर या प्रमाणात फवारावे.
- धुक्यापासून सर्वाधिक नुकसान नर्सरीत होते.संध्याकाळी रोपांच्या पानांवर पाण्याचा हलका फवारा मारावा.
- नर्सरी रोपे रात्रीच्या वेळेत प्लास्टिक कागदाने झाकवेत.असे केल्याने प्लास्टिक मधील तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढते.पॉलिथिन ऐवजी पेंडा देखील वापरता येतो.
- रोपांना सकाळी आणि दुपारी सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी त्यांचा दक्षिण भाग उघडा राहील याची खबरदारी रोपेझाकताना घ्यावी.
Published on: 05 November 2021, 08:58 IST