भाजीपाला लागवडीमध्ये रासायनिक खतांचा, रासायनिक कीटकनाशक यांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या अतिवापरामुळे निसर्गातील मूलभूत साधनसंपत्तीच्या घटकांवर तसेच उत्पादित मालाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहेत. भाजीपाला हा नाशवंत असल्यामुळे जास्त काळ साठवता येत नाही.
म्हणून त्यांचा वापर त्वरित करावा लागतो. कीडनाशके वापरल्यानंतर आठ ते दहा दिवस भाजीपाल्याची विक्रीसाठी काढणी करू नये. अशा सूचना दिल्या असल्या तरी त्या कितपत पाळल्या जातात हे सांगता येत नाही. सेंद्रिय खतांचा आणि जैविक तथा वनस्पती जन्य रोग किडनाशक औषधांचा वापर करून केलेल्या शेती पद्धतीला सेंद्रिय शेती असे म्हणतात. सेंद्रिय शेती पद्धतीत खालील बाबींवर विशेष लक्ष दिले जाते.
सेंद्रिय शेतीत या बाबींवर लक्ष द्यावे.
- कृषी किंवा तत्सम उत्पादनावर आधारित उद्योगांमधून निर्माण झालेल्या सेंद्रिय पदार्थांच्या अधिकाधिक व कार्यक्षम पद्धतीने त्यापासून सेंद्रिय खत तयार करून वापर करणे.
- शेतातील काडीकचरा, धसकटे, तन, जनावरांचे मलमूत्र, वनस्पतींचे अवशेष इत्यादी कुजवून किंवा त्यावर प्रक्रिया करून त्यापासून कंपोस्ट खत,शेणखत, गांडूळ खत निर्माण करून रासायनिक खतांऐवजी किंवा त्यांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा अधिक वापर करणे
- डाळवर्गीय पिकांचा वापर करून हिरवळीच्या खताचा वापर हीसेंद्रिय खत म्हणून वापर करणे
- सेंद्रिय खतामुळे पिकांना लागणाऱ्या पोषक अन्नद्रव्ये सोबतच जमिनीचा कस व जलधारणशक्ती वाढते. जमीन भुसभुशीत राहून हवाही खेळती राहते. शिवाय या सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीत उपयुक्त सूक्ष्म जीवांची वाढ होण्यासाठी मदत होते.
जिवाणू संवर्धके
एकदल पिकांना अझोटोबॅक्टर जिवाणू खत आणि कडधान्य पिकांसाठी रायझोबियम जिवाणू खत बियाण्याला लावतात हे जिवाणू जमिनीतहवेतील नत्र शोषून घेऊन साठवतात व नंतर तो पिकांना उपलब्ध करून देतात. स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धकांची बियाण्यावर प्रक्रिया करून किंवा वनस्पतींच्या मुळांशी तेशेणखतांमध्ये मिसळून देतात. हे जिवाणू जमिनीतील स्थिर झालेल्या विद्राव्य स्फुरदाचे विघटन करून तो विरघळून पिकास उपलब्ध करून देतात.
मित्र कीटकांचा किंवा जीवाणूंचा वापर
परोपजीवी किंवा परभक्षी किडी पिकांचे नुकसान करणार्या किडींवर आपली उपजीविका करतात.
या जैविक घटकांचा वापर करून काही भयानक किडींचा बंदोबस्त करता येतो.उदा.क्रायसोपाही कीड मावा, तुडतुडे, फुलकिडे, पतंग वर्ग कीटकांच्या अंडी आणि अळ्यांचा नाश करतात. ट्रायकोग्रामाहे परोपजीवी कीटक पतंग वर्ग किडींचा अंड्यामध्ये अंडी घालून त्यांचा नाश करतात. हिरव्या अळीसाठी याचा व्यापारी तत्त्वावर वापर होत आहे. घाटेअळी विषाणू एच एन पी व्ही तर काळीअळीच्या नियंत्रणास एस एनपीव्हीवापरतात.
ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर पिकांच्या मुळावरील बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी केला जातो. याशिवाय निंबोळी अर्काचा वापर कीडरोग नियंत्रणासाठी करतात.
Published on: 27 October 2021, 12:19 IST