महाराष्ट्र मध्ये कापूस पिकाचे क्षेत्र 28 लाख हेक्टर वरून 42 लाख हेक्टरपर्यंत वाढले असून,त्यातली बहुतांश क्षेत्र कोरडवाहू लागवडीखाली असते.उर्वरित बागायती क्षेत्रामध्ये कापूस पिकाचे फरदड घेण्यात येते. यात एखाद्या सिंचन देण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांचा देखील समावेश असतो. या लेखात आपण फरदड घेतल्यामुळे कुठली परिस्थिती निर्माण होते? याविषयी माहिती घेऊ.
कपाशीचे फरदड घेतल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते
1-कपाशीचा दीर्घकाळ वाढणाऱ्या संकरित वाणांची लागवड होते. या संकरित वानांवर गुलाबी बोंड आळी च्या जास्त पिढ्या पूर्ण होतात.परिणामी या अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो.
2- वेगवेगळ्या कपाशीच्या संकरित वाणांची लागवड झाल्याने त्यांचा फुले येण्याचा व बोंडे लागण्याचा काळ वेगळा राहतो. गुलाबी बोंड अळीच्या वाढीसाठी सतत अन्न पुरवठा होत असल्याने व जीवनक्रम एकमेकात मिसळल्याने त्यांच्या संख्येत वाढ होते.
3-जास्त काळापर्यंत कच्चा कपाशीची जिनींग मध्ये आणि व्यापारी संकुलात साठवण केली जाते. त्यामुळे गुलाबी बोंड आळी आगामी हंगामात येण्यासाठी पोषक वातावरण तयार होते.
- हंगामपूर्व लागवड केलेल्या म्हणजेच (एप्रिल किंवा मे मध्ये) कपाशी मध्ये फुले येण्याचा काळ जून-जुलै महिन्यात येत असल्याने लवकर गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव.तसेच मागीलहंगामातील कपाशीवरील बोंड आळी चा जीवनक्रम हा एकाच वेळी सोबत येतो.पर्यायाने गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो. त्यांच्यामध्ये प्रतिकारक्षमता वाढत आहे.
5-गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव हा मुख्यतः हिवाळ्यात ऑक्टोबर शेवटी ते नोव्हेंबर मध्ये होतो. डिसेंबर महिन्यात कपाशीच्या पऱ्हाट्या किंवा वाळलेल्या खुरकुट्या मध्ये कोषावस्थेत जाते. नोव्हेंबर नंतर डी शेतात पाणी देऊन पीक ठेवल्याने शेंदरी बोंड आळीच्या वाडीला आणखी चालना मिळते.
6- बोंड आळी मध्ये बीटी प्रतीना विरुद्ध प्रतिकारक्षमता तयार होऊ नये यासाठी बीटी जनुक विरहित कपाशीच्याआश्रित ओळी म्हणजे रेफ्युजी लावण्याची शिफारस केली जाते. परंतु बरेच शेतकरी रेफ्युजी लागवड करत नाहीत.
7-कपाशी पिकावर येणाऱ्या प्रमुख बोंड आळी पैकी हिरवी बोंड आळी, शेंदरी बोंड आळी आणि तंबाखूची पाने खाणारी अळी यापैकी फक्त शेंदरी बोंड आळी चा जीवनक्रमकापूस पिकावर पूर्ण होतो.
त्यामुळे त्यांच्या मधील मागच्या तीन-चार वर्षातक्राय प्रथीना विरुद्ध प्रतिकारक्षमता निर्माण झालेली दिसून येत आहे. यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतांश संकरित वानांवर शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भावकमी जास्त प्रमाणात दिसून येत आहे.
8-सुरुवातीच्या काळात रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफास,फिप्रोनील किंवा ऍसफेटयासारख्या कीटकनाशकांचा वापर अधिक प्रमाणात झाला. या कीटकनाशकांचा तीन ते चार वेळा वापर केल्यास झाडांचे कायिक वाढ झाल्याने फांद्यांचे अधिकवाढ होते.फुले व बोंडे यांचे प्रमाण कमी होते. या रासायनिक कीटकनाशकांचा एकत्रित वापर झाल्याने फुले लपेटून अळीचा प्रादुर्भाव हिरव्या व फुटलेल्या बोंडामध्येदेखील आढळून येतो. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कृत्रिम व वनस्पतिजन्य कीटकनाशकांचा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फवारणी केली. तसेच रासायनिक कीटकनाशकांचा वापर आणि मर्यादित केला अशा ठिकाणी बोंडे एकाच वेळी फुटूनआली. परिणामी शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी झाला.
9-म्हणून फरदड घेणे टाळावे.
Published on: 15 November 2021, 03:43 IST