Agripedia

कांदा उत्पादक बांधवांनो गेल्या दोन दिवसांपासून हवामान खात्याकडून

Updated on 24 June, 2022 3:48 PM IST

कांदा उत्पादक बांधवांनो गेल्या दोन दिवसांपासून हवामान खात्याकडून व विविध संकेतस्थळावरून आपणास अरबी समुद्रातील निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचे प्रस्थान मुंबईवरून रायगड ठाणे नाशिक धुळे मार्गे मार्गाने मध्यप्रदेश कडे जाणार असल्याचे समजले आहेया वादळा सोबतच राज्यातील विविध भागांत पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे.सध्या सर्वच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कांदे काढून तयार असून हे कांदे कांदा चाळीत, पत्र्यांचे शेड, पाचटाचे शेड तसेच झाडाखाली किंवा शेतात ठेवलेले आहेत.

हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे निसर्ग चक्रीवादळामुळे येणाऱ्या वादळाचा वेग जास्त असल्यानेकांदा चाळींचे पत्रे उडणे कांद्यावरील प्लास्टिक कागद उडून जाणे त्याचबरोबर चाळींना लावलेले प्लास्टिक कागद किंवा नेट जाळी फाटण्याची तुटण्याची शक्यता आहे.याबाबत सावधगिरी म्हणून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी आपापल्या चाळींचे पत्रे दोरखंडाने बांधून त्याचबरोबर वाळूच्या गोणी भरून चाळींच्या पत्र्यावर ती टाकावेजेणेकरून वादळा मुळे कांदा चाळींची हानी होणार नाही व कांदा भिजणार नाही.

या वादळा सोबतच राज्यातील विविध भागांत पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे.सध्या सर्वच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कांदे काढून तयार असून हे कांदे कांदा चाळीत, पत्र्यांचे शेड, पाचटाचे शेड तसेच झाडाखाली किंवा शेतात ठेवलेले आहेत.हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे निसर्ग चक्रीवादळामुळे येणाऱ्या वादळाचा वेग जास्त असल्याने कांदा चाळींचे पत्रे उडणे कांद्यावरील प्लास्टिक कागद उडून जाणे त्याचबरोबर चाळींना लावलेले प्लास्टिक कागद किंवा नेट जाळी फाटण्याची तुटण्याची शक्यता आहे.

याबाबत सावधगिरी म्हणून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी आपापल्या चाळींचे पत्रे दोरखंडाने बांधून त्याचबरोबर वाळूच्या गोणी भरून चाळींच्या पत्र्यावर ती टाकावेजेणेकरून वादळा मुळे कांदा चाळींची हानी होणार नाही व कांदा भिजणार नाही.त्याचबरोबर झाडाखाली व शेतात ठेवलेल्या कांद्यावरती प्लास्टिक कागद टाकलेला असल्यास त्याच्यावरती वजनदार दगड व्यवस्थित ठेवावे आणि वादळ व पावसापासून कांद्याचे संरक्षण करावे.महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादकांनी वरील प्रमाणे काळजी घ्यावी हि विनंती.

 

भारत दिघोळे

संस्थापक अध्यक्ष

 

शैलेंद्र पाटील

राज्य प्रवक्ते

-महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.

English Summary: Take care of onion stalks from strong winds and heavy rains
Published on: 24 June 2022, 03:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)