Agripedia

शेणखत जमिनीसाठी फारच उपयुक्त असे आहे. शेणखताच्या नियमित वापराने जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन भौतिक गुणधर्मांमध्ये लक्षणीय बदल होत असतात. यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. पिकांच्या पांढऱ्या मुळांची चांगली वाढ होते. बरेच शेतकरी शेतात शेणखत अगदी सहजपणे मिसळून निवांत राहतात.

Updated on 19 October, 2021 6:31 PM IST

शेणखत जमिनीसाठी फारच उपयुक्त असे आहे. शेणखताच्या नियमित वापराने जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन भौतिक  गुणधर्मांमध्ये लक्षणीय बदल होत असतात. यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. पिकांच्या पांढऱ्या मुळांची चांगली वाढ होते. बरेच शेतकरी शेतात शेणखत अगदी सहजपणे मिसळून निवांत राहतात.

परंतु असे  न करता शेणखत जमिनीत मिसळून त्यांना व्यवस्थित काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. या लेखात आपण जमिनीत शेणखत मिसळताना कोणते काळजी घ्यावी? याबद्दल माहिती घेणार आहोत.

जमिनीत शेणखत मिसळताना कोणती काळजी घ्यावी?

  • लहान क्षेत्र असलेले शेतकरी शेतातील उकिरड्यात, खड्ड्यात वर्षभर साठवलेले शेण हे खत म्हणून शेतात मिसळतात. असेशेन चांगले कुजलेले असणे गरजेचे आहे. शेणखतामध्ये हुमणी,कॉकचाफर भुंगे, नारळावरील गेंडा भुंगा च्या अळ्याइत्यादी किडींचा आळी आढळून येतात.जास्त बरेचसे शेतकरी शेणकिडे म्हणून संबोधतात. अशा अळ्या शेणखताद्वारे पसरून शेतातील मुख्य पिकास नुकसान पोहोचतात.
  • भुंगेरा वर्गीय किडीची मादी मे किंवा जून महिन्यात शेणासारख्या कुजणाऱ्या पदार्थांमध्ये अंडी देतात.त्यामुळे शेनाचा खड्डा,ढिगारा, उकिरडा इत्यादी मे महिन्याच्या सुरुवातीलाच रिकामा करून हे शेणखत शेतात मिसळून घ्यावे. त्यामुळे पाऊस पडल्या नंतर त्यामध्ये होणारा प्रसार थांबवता येईल.
  • उन्हाळ्याच्या दिवसात चाऱ्याची कमतरता असताना शेतकरी मोकळ्या शेतात जनावरे चरण्यास सोडतात त्यामुळे शेतात त्यांचे शेण शेतात विखुरलेल्या स्वरूपात पडते.
  • मे महिन्याच्या शेवटी आता जून महिन्याच्या सुरुवातीला पडणाऱ्या पावसाबरोबरच हुमणीच्या मादी भुंगेऱ्याकडून अशा कुजणाऱ्या शेणात अंडी देतात. त्यामुळे अशा शेतात पुढील हंगामात घेतले जाणारे पीक हे आळी द्वारे प्रादुर्भावग्रस्त होते.
  • काही शेतात तर शेळ्या-मेंढ्या जा गोलाकार रिंगणात बसवल्या जातात,त्याच भागात पावसाळ्यात हुमणीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो.
  • बऱ्याच वेळा शेतातील नींदणीत येणारे गवत जनावरांच्या गव्हाणीत चारा म्हणून वापरला जाते. अशात तरुणांच्या मुळास लटकलेली शेतातील माती रोगकारक बीजाणू शेणाबरोबर खड्ड्यात जाते.  त्या ठिकाणी इतर सेंद्रिय पदार्थ बरोबर वाढते.अशा वेळेस शेणखतासजैविक प्रक्रिया करून घेणे आवश्यक असते.
English Summary: take care of mix maure in soil and precaution
Published on: 19 October 2021, 06:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)