गहू हे रबी हंगामातील प्रमुख पीक आहे. जर गहू पिकाचा विचार केला तर गवावर काळा किंवा नारिंगी तांबेरा सर्वात नुकसानकारक रोग आहे. या रोगाच्या प्रादुर्भावाने गहू पिकाचे अतोनात नुकसान होते. त्यामुळे या रोगाचे वेळीच नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न करणे फार गरजेचे असते.
या लेखात आपण गव्हावरील नारिंगी तांबेरा रोगाचे लक्षणे आणि उपाय योजना थोडक्यात जाणून घेऊ.
गव्हावरील नारिंगी तांबेरा रोगाचे लक्षणे
- प्रामुख्याने हवेद्वारे वाहून आलेल्या बीजाणू मुळे नारिंगी तांबेरा रोगाचा प्रसार होतो.
- गहू पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानावर गोलाकार ते अंडाकृती आकाराचे लहान ठिपके दिसून येतात. पानावर किमान तीन तास दव साठलेले असल्यास व हवेतील तापमान 20 अंश सेल्सिअस असल्यास प्रादुर्भाव होतो. अनुकूल हवामानात दहा ते चौदा दिवसात रोगाची लक्षणे दिसतात. कालांतराने ठिपक्यांच्या जागी असंख्य बीजाणु तयार होऊन ठीपक्या चा रंग नारंगी ते गर्दनारंगी दिसू लागतो. रोगग्रस्त पानांवरून बोट फिरवल्यास नारिंगी रंगाची पावडर बोटावर लागते.
- रोगाची लागण शेंड्यापर्यंत तीव्र प्रमाणात फुलोरा पूर्वी झाल्यास उत्पादनात 80 टक्क्यांपर्यंत घट येते. बाल्यावस्थेत रोगाची लागण झाल्यास रोपे फुलोरा पूर्वी मृत होतात.
रोगनियंत्रणासाठी करावयाच्या उपाय योजना
- पेरणी करण्यासाठी रोगप्रतिकारक्षम जातींची पेरणी करावी.
- जर तांबेरा रोगाला प्रतिकारक्षम जात यांचा विचार केला तर यामध्ये फुले समाधान, नेत्रावती, त्र्यंबक,गोदावरी आणि पंचवटी या जातींचा समावेश होतो.
- एकाच परिसरात एकाच जातीच्या बियाण्याची पेरणी न करता प्रतिकारक्षम विविध गहू जात यांची पेरणी करावी. पेरणी केलेल्या क्षेत्रात अंतर ठेवावे.
- गव्हाची पेरणी थंडीला सुरुवात झाल्यावर 15 नोव्हेंबरच्या पर्यंत करावे.जरा उशिरा पेरणी करायची असेल तर फुले समाधान किंवा एनआयएडब्ल्यू 34 हेतांबेरा प्रतिकारक्षम वाणपेरावे
- गहू पिकाला जास्त पाणी दिल्यास पिकात ओलावा सतत टिकून राहतो. वाढलेल्या आर्द्रतेमुळे रोगाचे प्रमाण वाढते. त्यामुळे शिफारशीप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
- शिफारशीत रासायनिक खत मात्रा चा वापर करावा. युरियाचा वापर शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात केल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
- रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास तर प्रोपिकॉनाझोल(25 टक्के) एक मिली 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.फवारणी प्रमाण प्रती लिटर पाणी
English Summary: symptoms of narinigi tanbera disease in wheat crop and controll management
Published on: 12 February 2022, 05:29 IST
Published on: 12 February 2022, 05:29 IST