मर रोग हा रोग जमिनीत राहणाऱ्या फ्युजारीयम (Fusarium oxysporum)बुरशीमुळे होता. रोगाचा प्रसार रोगट बियाण्यांद्वारे व दूषित जमिनीद्वारे होतो.पाऊस समाधानकारक होऊन गेलाय.काही दिवस पावसाने उघडीप दिली आणि आता पुन्हा रिमझिम पाऊस चालू होतोय त्यामुळे मातीच तापमान 22 ते 27℃ या दरम्यान रहात आहे. आणि ही फ्युजारीयम बुरशी 24-25℃ तापमानात भरपूर फोपावते.या काळात जमिनीत वापसा व तसेच जास्त ओलावा झाल्यास झपाट्याने वाढते. या बुरशी चे बीजाणू तयार झाल्यापासून पुढे अनिश्चित काळासाठी जमिनीत पडून राहू शकतात. त्यामुळे ज्या ज्या वेळी अनुकूल वातावरण तयार होईल त्या त्या वेळी जी बुरशी पिकास मुळाद्वारे रोग ग्रस्त करेल.
लक्षणे:-
सततच्या ढगाळ वातावरणामुळे किंवा शेतात पाणी साचल्याने सुरवातीस पाने पिवळे पडून, कोमजतात आणि पानगळ होते,शेवटी संपूर्ण झाड वाळते. झाड उपसून पाहिल्यास मूळ कुजल्यासारखे दिसते.
प्रतिबंधक व नियंत्रण उपाय:-
रोगप्रतिबंधक जातींचा वापर करावा.
पिकाची फेरपालट करावी.
शेतामधून पाण्याचा पूर्णपणे निचरा होईल ही काळजी घ्यावी.
मुळाजवळ हवा खेळती राहण्यासाठी नियमित खुरपणी करावी.
पेरणीपूर्वी बियाण्यास दीड ग्रॅम कार्बेनडाझिमची किंवा ३ ग्रॅम थायरमची किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी प्रतिकिलो प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.त्यामुळे बुरशीस प्रतिबंध होईल.
मागील पिकाचे अवशेष शेताबाहेर नष्ट करून टाकावेत. त्यामधील बुरशीचे बीजाणू नष्ट होतील.
या रोगास प्रतिबंध उपायच जास्त प्रभावी ठरतात.
जर मर ही फ्युजारीयम बुरशीपासून होत असेल तर
स्ट्रेप्टोमायसिन किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड या बुरशीनाशकांची तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रादुर्भाव पाहून आळवणी करावी.
या आधी प्रतिबंधक उपाय नक्की अवलंबवावे कारण प्रतिबंधक उपाय हे रोगास व पुढे होणाऱ्या नुकसानास थांबवत असतात.
संकलन -विजय इंगळे,बुलढाणा
सचित काळदाते,वाशीम
हरीश लेंडे,अमरावती
Published on: 30 September 2021, 09:28 IST