Agripedia

केळी 1) केळीची नवीन पाने गोलाकार न होता पिवळसर पांढरी होतात. 2) झाडांची वाढ खुंटते व लहान फळे तयार होतातव पाने पिवळी पडतात.

Updated on 21 February, 2022 3:33 PM IST

केळी

  • केळीची नवीन पाने गोलाकार न होता पिवळसर पांढरी होतात.
  • झाडांची वाढ खुंटते व लहान फळे तयार होतातव पाने पिवळी पडतात.
  • वांगी :-
  • गंधकाची कमतरता असल्यामुळे झाडाची अपरिपक्व फुले गळतात, उत्पादनात घट होते.
  • कोबी :-
  • कमतरतेमुळे नवीन पानाचे काठ पिवळे पडतात.
  • नवीन पानांचा आकार चमच्याचा  किंवा खपा सारखे होऊन निमुळता होत जातो. त्यामुळे गड्डा तयार होत नाही.
  • फ्लावर :-
  • फुलकोबी गंधकाच्या कमतरतेला अतिशय संवेदनशील आहे.
  • लागवडीपासून एक महिन्याच्या आतपानाच्या कडात पिवळसर पडून खाली निमुळत्या होतात.
  • गंधकाच्या कमतरतेमुळे उत्पादनात घट होते.
  • हरभरा :-
  • पानांची टोके पिवळसर हिरव्या रंगाची होतात. कमतरतेमुळे पानाला लाल रंग येतो.
  • नवीन अपरिपक्व पाने वाळतात व झाडांच्या शाखा व्ही आकाराच्या होतात.
  • मिरची :-
  • गंधकाची कमतरता असल्यामुळे झाडांना फुल धारणा उशिरा होऊन फुलांची संख्या कमी होते व उत्पादनात घट होते.
  • नवीन कोवळ्या पानांच्या शेंड्यावर पिवळे ठिपके दिसून येतात.
  • कापूस :-
  • जुन्या पानांवर गंधकाची कमतरता लवकर दिसून येते. नवीन पाने पिवळ्यापात्याचा रंग लालसर दिसतो.
  • भुईमूग :-
  • गंधकाची कमतरता असल्यामुळे सर्वसाधारण झाडापेक्षा लहान झालेले आढळतात.
  • शेंगा नत्रासाठी यांची वाढ खुंटते व परिपक्व होण्यास वेळ लागतो.
  • मका :-
  • नवीन पानांच्या शिरा पिवळ्या पडतात व पानांच्या कडा लालसर दिसतात.
  • पानांची कडा लालसर होऊन खोड खालच्या बाजूने लालसर होऊन पिवळी पडतात.
  • कांदा :-
  • गंधकाचे प्रमाण कमी झाल्यास, पाण्याचा आकार लहान होतो पाने पिवळी पडतात.
  • पानांचे शेंडे पिवळसर पडून वाळतात
  • तांदूळ :-
  • पाने पिवळसर होतात.
  • झाडाची वाढ खुंटते व लोंब्याच्या  संख्येत घट होते.
  • ज्वारी :-
  • झाडाची जुनी पाने पिवळसर हिरव्या रंगाचे होतातजुनी पाने हिरवीच राहतात.
  • झाडांची नवीन पाने लहान होऊन निमुळतात.
  • सोयाबीन :-
  • नवीन पाने हिरवट पिवळसर होतात व पानांची लोळीकमी होते.
  • गंधकाची जास्त कमतरता असल्यास असल्यास पूर्ण झाड पिवळे होऊन परिपक्व होण्यापूर्वी ते गळून जातात. फुले कमी होऊन फळधारणा कमी होते.
  • ऊस :-

1)नवीन पानांवर पिवळसर हिरवा रंग येतो.

2)गंधकाची कमतरता असल्यास पूर्ण पान पांढरे होतात व वाढतात.

  • गहू :-

1)सर्वसाधारण पूर्ण झाड पिवळे पडते.

2)गंधकाच्या कमतरतेमुळे झाडांची वाढ खुंटते. लोंब्या धरण्याचे प्रमाण कमी होते. व फुले कमी दाणे भरण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.

 गंधकामुळे तेलबियाणे पिकांमध्ये तेलाचे प्रमाण तसेच उत्पादनात वाढ होते. शेंगवर्गीय पिकामध्ये जैविक नत्रस्थिर  करण्यासाठी गंधकाचीमदत होते. उदा. सोयाबीनमध्ये गंधकाच्या उपयोगाने शेंगांच्या संख्येत व त्यांच्या वजनात वाढ होते.गंधकामुळे कडधान्य पिकांची प्रतीमध्ये वाढ होते.उसामध्ये साखरेचे प्रमाण वाढते.

 जिप्सम मध्ये गंधकाचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. साधारणत: 13 टक्के ते 27 टक्के एवढे असते.तसेच जिप्सम मध्ये कॅल्शियम सल्फेट- 65 टक्के ते 70 टक्के कॅल्शियम- 14 टक्के ते 16 टक्के, सल्फर 14 टक्के ते 20 टक्के एवढी आहे.

English Summary: symptoms of dificiency of sulphur in crop and benifit of sulfur
Published on: 21 February 2022, 03:33 IST