Agripedia

मका हे कापूस आणि सोयाबीन पाठोपाठ एक महत्त्वपूर्ण पीक असून मक्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे आर्थिक नफा होतो. चांगले व्यवस्थापन आणि योग्य नियोजनाने जर मका लागवडीकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिले तर निश्चितच चांगले आर्थिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते. मक्याचे काही प्रकार असून यापैकी स्वीटकॉर्न अर्थात मधुमका लागवड शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची ठरते.

Updated on 28 September, 2022 10:39 AM IST

मका हे कापूस आणि सोयाबीन पाठोपाठ एक महत्त्वपूर्ण पीक असून मक्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे आर्थिक नफा होतो. चांगले व्यवस्थापन आणि योग्य नियोजनाने जर मका लागवडीकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिले तर निश्चितच चांगले आर्थिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते. मक्याचे काही प्रकार असून यापैकी स्वीटकॉर्न अर्थात मधुमका लागवड शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची ठरते.

नावाप्रमाणे हा मक्याचा प्रकार गोड आणि स्वादिष्ट आहे तसेच यामध्ये साखरेचे प्रमाण 13 ते 15 टक्के असते. या मक्याची कणसे जेव्हा दुधाळ अवस्थेत असतात तेव्हा ते उकडून किंवा भाजून खाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात वापरले जातात.

एवढेच नाही तर यापासून कॉर्न सूप, वडा असेच उपमा, दाण्याची उसळ, स्वीट कॉर्न हलवा इत्यादी अनेक खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी याचा वापर होतो. या लेखामध्ये आपण मधुमक्‍याच्या लागवडीविषयी थोडक्यात माहिती घेऊ.

नक्की वाचा:अशी करा वाटाणा लागवड आणि व्यवस्थापन आणि घ्या भरघोस उत्पन्न

मधुमक्याची लागवड

1- लागणारे हवामान- या पिकाला उष्ण हवामान मानवत असून उत्तम वाढीसाठी 20 अंश सेल्सिअस ते 32 अंश सेल्सिअस यादरम्यान  तापमान असणे आवश्यक आहे. दहा अंश सेल्सिअसच्या  खाली तापमान गेल्यास याच्या उगवण शक्तीवर परिणाम होतो.

2- जमीन- पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम काळी व जांभ्या दगडापासून तयार झालेली सुपीक जमीन व सामू सहा ते साडेसात पर्यंत असावा.

3- पूर्वमशागत- लागवडी अगोदर जमिनीची नांगरणी करून कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी व हेक्‍टरी 10 ते 12 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.

4- पेरणीचा कालावधी- रब्बी हंगामामध्ये नोव्हेंबरमध्ये पेरणी करावी व जमिनीच्या मगदुरानुसार टोकण पद्धतीने साठ बाय वीस सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी. एका ठिकाणी दोन दाणे चार ते पाच सेंटीमीटर खोल टाकावेत. उगवल्यानंतर जोमदार व निरोगी रोप ठेवावे.

5- खतांचा पुरवठा- लागवडीच्या वेळेस हेक्‍टरी दहा टन शेणखत मिसळून द्यावे तसेच प्रति हेक्‍टरी 200 किलो नत्र, 60 किलो स्फुरद  आणि 60 किलो पालाश या खतांची मात्रा द्यावी. यामध्ये एका हेक्‍टरसाठी  100 किलो नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी ओळीमध्ये सात ते आठ सेंटीमीटर खोलवर द्यावे.

नक्की वाचा:Fertilizer Management: पिकासाठी नत्राचा पुरेपूर वापर करण्यासाठी अवलंब करा 'या' उपाय योजनांचा

6- आंतरमशागत- पिक उगवल्यानंतर दहा बारा दिवसांनी विरळणी करून एक जोमदार रोप ठेवावे व 20 ते 30 दिवसांनी निंदणी करून पीक तणमुक्त ठेवावे.

7- पाणी व्यवस्थापन- पिकाची पाण्याची गरज ओळखून 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाण्याचे व्यवस्थापन करावे परंतु पिकामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.

8- मधुमक्याची काढणी- जेव्हा कणसे दुधाळ अवस्थेमध्ये असतील तेव्हा कणसांची काढणी करावी. काढणी करताना तयार कणसे काढावीत.

अशा पद्धतीने दोन ते तीन वेळा काढणी करावी व उरलेले मक्याचे पीक जनावरांसाठी हिरवा चारा म्हणून वापरावे. साधारणतः एका एकर मध्ये 150 ते 160 क्विंटल कणसांचे उत्पादन मिळते.

नक्की वाचा:Onion Farming : कांदा लागवड शेतकऱ्यांना बनवणार लखपती! मात्र 'या' गोष्टींची घ्यावी लागेल काळजी

English Summary: sweetcorn cultivation can give more production to farmer and get nutritional grass to animal
Published on: 28 September 2022, 10:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)