Agripedia

संग्रामपूर : प्रधानमंत्री आवास योजने मार्फत गरजू लोकांना घरकुलाचा लाभ दिला जातो.

Updated on 16 February, 2022 2:04 PM IST

संग्रामपूर : प्रधानमंत्री आवास योजने मार्फत गरजू लोकांना घरकुलाचा लाभ दिला जातो. परंतु शासनाच्या काही जाचक अटीमुळे हजारो लाभार्थी यामधून वगळण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर नियमाकुलचे प्रस्ताव अनेक वर्षांपासून धूळ खात पडले आहेत त्यांचे ग्रा.पं.रेकार्डला त्यांच्या नावे ८ अ करून घरकुलाचा लाभ मिळावा. तसेच शहरीभागाप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना ३ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करा. दिव्यांग व विधवा महिलांना घरकुल योजनेपासुन वंचित न ठेवता त्यांना प्राधान्याने योजनेचा लाभ द्या. 

 या प्रमुख मागण्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेकडो लोकांनसह आज दि.१५ फेब्रुवारी २०२२ पासून पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. घरकुल लाभार्थ्यांना जोपर्यंत प्र पत्र ड यादीमध्ये नावे समाविष्ट केले जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.

वेळ पडल्यास जीव गेला तरी बेहत्तर परंतु घरकुल लाभार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत माघार नाही अशी भूमिका स्वाभिमानी चे जिल्हाध्यक्ष अनंता मानकर यांच्या सह उपोषण कर्त्यांनी घेतली

आहे. या उपोषणामध्ये स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष अनंता मानकर , तालुका अध्यक्ष, उज्वल खराटे, विजय ठाकरे, अनुप देशमुख, कैलास ठाकरे, रामकृष्ण गावंडे, नयन इंगळे, सुपडा सोनवणे, आशिष सावळे, भास्कर तांदळे, विलास तराळे, गणेश मालोकर, श्रीकृष्ण तराळे, प्रवीण येणकर, शिवा पवार, आशिष नांदोकर, रामदास सरदार, वासुदेव ठाकरे, अमोल गिरी, बाबूराव सुरळकर, देविदास बोंबटकार ,योगेश घायल, श्रीकृष्ण मसुरकर, वैभव मुरुख, अजय ठाकरे, दिलीप ठाकरे, मुरलीधर ठाकरे, 

अभिषेक ठाकरे, विशाल चोपडे, सुधाकर बगाडे, रमेश उमरकर, रमेश निर्मळ, महादेव सावंत, पिंटू इंगळे, पुंडलिक नेरकर, गजानन साबळे सह शेकडो गरजु लोकांनी उपोषण सुरू केले आहे.

शहरीभागाप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना ३ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करा. दिव्यांग व विधवा महिलांना घरकुल योजनेपासुन वंचित न ठेवता त्यांना प्राधान्याने योजनेचा लाभ द्या. 

English Summary: Swabhimani's indefinite fast continues to benefit the beneficiaries excluded from the Gharkul scheme.
Published on: 16 February 2022, 02:04 IST