हाव खरंच वालढा भो.काही त फरक पलडा.
हे वाक्य मी एका ठिकाणी ऐकलं..आणि मग बसलो विचार करत.35 वर्षांच पोरगं जे 60 वर्षांच्या म्हाताऱ्या नेत्याला लाजवेल असं बोलत.शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना त्यांच्या हक्काचं मिळालं पाहिजे म्हणून सतत प्रयत्नशील असतं. ते नाव म्हणजे रविकांत तुपकर. आता यात कोणतीही स्तुती नसून वस्तुस्थिती मांडतोय.
बातम्या करत असतांना अनेकदा गावखेड्यांना मी प्राधान्य देतो.तिथल्या आजोबा मंडळींना बोलत असतो त्यांच्यासोबत गप्पा मारत असतो.बऱ्याचदा शेतीचे प्रश्न अनुत्तरित राहतात.बऱ्याच शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो अशा गोष्टी त्यांच्याकडून माझ्या कानावर पडतात.
डोक्यात येत की त्यांच्यासाठी एक कुणी आमदार-खासदार उभा राहतो की नाही मग हे सर्व विचार करता करता करता करता रविकांत तुपकरांच नाव माझ्या समोर येतं.आणि मी अजून सखोल विचार करत जातो काय गरज आहे या रविकांत तुपकरांना.की अन्नत्याग.आंदोलन.वैगेरे वैगेरे.नाही ज्यावेळी मी हे अन्नत्याग आंदोलन स्वतःहून पहिल्यांदा अनुभवले त्यावेळेस मला लक्षात आलं की याची फार गरज आहे आणि असा आवाज कोणीही उठवत नाही दावणीला बांधलेल्या राजकारकारण्यांना शेतकऱ्यांकडे अजिबात लक्ष देण्याची आवश्यकता वाटत नाही ही वस्तुस्थिती आहे.मग तेव्हा दुसरीकडे रविकांत तुपकरांसारख्या युवा नेत्याचा जन्म होतो आणि तो लढतो.
मला खूप काही लिहायचं नाही पण थोडक्यात मांडतो आहे.
सोयाबीन कापूस अन्नत्याग आंदोलनामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होतोय.आणि भविष्यात होईल.
रविकांत तुपकरांच्या ऑफिसमध्ये जे लोक येतात ना ते फक्त शेतकरी नसतात त्यात नोकरदार ,विद्यार्थी,विधवा महिला.शेतकरी असे विविध घटक अपेक्षा घेऊन येतात.त्यांचं काम 100 टक्के होतं.हे मी स्वतः बघितलं आहे.
सर्वांसाठी महत्त्वाची टीप - आपल्याला जे दिसत ते लिहिलंच पाहिजे म्हणून हे लिखाण.
Mayur Nikam
#mayurnikamzee
Published on: 25 December 2021, 02:20 IST