Agripedia

शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीत असेल नसेल तरी सांगतो नेमॅटोड हा सुतकृमी मातित लपलेला व पिकाचा अन्नरस चोरुन जगणारा भुरटा चोर म्हटले तर वावगं ठरणार नाही!त्याचं विशेष कार्य म्हणजे झाडाचे अन्न खाऊन त्यावर जगणारा परजीवी म्हणजे निमॅटोड त्यामुळे आपल्या पिकाच्या तिस ते चाळीस टक्के उत्पादनात घट होऊ शकते.

Updated on 04 June, 2022 8:54 AM IST

शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीत असेल नसेल तरी सांगतो नेमॅटोड हा सुतकृमी मातित लपलेला व पिकाचा अन्नरस चोरुन जगणारा भुरटा चोर म्हटले तर वावगं ठरणार नाही!त्याचं विशेष कार्य म्हणजे झाडाचे अन्न खाऊन त्यावर जगणारा परजीवी म्हणजे निमॅटोड त्यामुळे आपल्या पिकाच्या तिस ते चाळीस टक्के उत्पादनात घट होऊ शकते.

शेतामध्ये मर रोगास आमंत्रण देणारा आहे त्यांच्यासाठी काही शेती तज्ञ निंबोळी तेल वापरण्याचा सल्ला देतात.  मंडळी सल्ला देणारे तर बरोबर सल्ला देतात पण आपली चुकतंय ते समजणं महत्वाचं आहे.

तुमच्या माहीती साठी सांगतो आपन जर त्याला रसायनाचा वापर करून जर नाश‌ केला असता तर आपला केव्हाच प्रश्न सुटला असता व नेमॅटोड सुतकृमी केव्हाच संपुन गेला असती परंतु येथे परिस्थिती थोडी वेगळी आहे.

नक्की वाचा:चिंताजनक! गव्हापाठोपाठ आता भारतीय चहादेखील अनेक देशांनी केली परत, उच्च कीटकनाशके आणि रसायने जास्त असल्याचा दावा

आता सुतकृमी जन्माला येण्याचे कारण समजून घेणे आवश्यक आहे परंतु जिवंत असेपर्यंत त्याचा नाश करणं हे काही दिवसांपुरते मनाचं समाधान होऊ शकतं. आपन त्याला एका बाजुने रसायनाने मारण्याचा प्रयत्न तर ती सुतकृमी त्याची पुढची येणारी पिढी या रसायनाला न जुमाननारी जन्माला येईल हे आपन लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

मग काय करावं हाच यक्ष प्रश्न पडला असेल.पर्यत तर करावेच लागेल.मग हातावर हात ठेवून बसुन विचार करावा का?आता काय करायचे ? ओळखणे आता फार सोपे होईल की नेमॅटोड का येतो? कोणत्या शेतामध्ये अपडेट होतो हे समजणे आपल्याला

महत्त्वाचे आहे ?

मि थोडं आता वेगळ्या पद्धतीने सांगतो हेच बघा लहान मुलांना होणारे जंत व पिकाला होणारा नेमॅटोड हे एकाच जातीचे आहेत जेव्हा आपल्या जमिनीचा पि एच (pH) वाढतो व आपलीं जमिन नापिकतेकडे झुकते तेव्हा तिची पोषण क्षमता कमजोर व कमकुवत होते व अशा जमिनितील पिक अशक्त बनते की मलुल बनले मग त्यावर विषाणू व बुरशी आणि रोगाचा प्रादुर्भाव खुप होतो.

नक्की वाचा:Low Investment bussiness: कमी खर्चात करा हा व्यवसाय आणि कमवा information

ाच नियम सर्व किडींना व रोगांना लागु होतो! नेमॅटोड हा बुरशीचा वाहक असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव करतो. आता महत्वाचं आहे की आपल्या जमिनीचा PH का वाढत असेल त्याचं कारण म्हणजे आपण आपल्या जमिनीत वारेमाप साठुन राहिलेल्या रासायनिक खतांच्या अंशामुळे जमिन ही अपटेक करत नाही.

त्या मुळे रासायनिक खतं ही जमिनीत  साठुन रहातात.अपटेक का होत नसेल कारण आपल्या जमिनीत चिलेशन होण्यासाठी जिवाणुच अस्तित्व कमी झाले.कारण आपल्या जमिनितीत  त्यांचे खाद्य  सेंद्रिय कर्बच नाही वनस्पति व प्राणी यांचे कसदार अवशेष ही नाही समान आहेत

 मंडळी हि नैसर्गिक साखळी आहे,एकमेकांवर आधारलेली असल्यामुळे जर एक कड़ी तुटली ना तर शेतकऱ्यांना सतत दक्ष रहावे लागते व एकाच रोगासाठी वारंवार औषधे द्यावी लागेल व शेती मधला खर्च मर्यादेच्या बाहेर जातो यापेक्षा भयानक म्हनजे उत्पन्नात भली मोठी घट होते.त्या साठी शेतीमध्ये मातीला काय पाहीजे व काय नाही पाहिजे हे समजणे महत्त्वाचे आहे.जर

जमिन बलवान तर पिक पहिलवान होईल हा मंत्र नेहमी लक्षात ठेवा......

शेतीच्या मधे विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल....

 धन्यवाद मित्रांनो

मिलिंद जि गोदे

Save the soil all together

milindgode111@gmail.com

Mission agriculture soil information

नक्की वाचा:म्हातारपण करा आरामदायी, घ्या लाभ 'या' योजनेचा मिळवा दरमहा 5 हजार रुपये

English Summary: sutrakrumi nimtod is thief in soil that decrease crop production 30 percent
Published on: 04 June 2022, 08:54 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)