पुर्तता करणाचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, त्याला देखील बराच कालावधी उलटून गेला असून लेखी आश्वासन पूर्ण न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर हमी कायद्यांतर्गत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी युवा शेतकरी ऋषीकेश म्हस्के यांनी केली आहे. खडकपूर्णा प्रकल्प विभाग देऊळगांव राजा अंतर्गत गांगलगाव
वितरिकेवरील शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात १७ ऑगस्ट २०२० रोजी अधीक्षक अभियंता, पाटबंधारे प्रकल्प मंडळ बुलडाणा यांच्या दालनात ऋषीकेश म्हस्के व शेतकऱ्यांनी दुपारी 1 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत आंदोलन केले होते. त्यावेळी आंदोलनकर्त्यांच्या २३ मागण्यासंदर्भात चर्चा होऊन लेखी आश्वासन देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. त्यानंतर १४ डिसेंबर २०२० रोजी पुन्हा आंदोलन छेडण्यात आले. मात्र त्याची कोणतीही दखल प्रशासनाने घेतली नाही.
त्यामुळे सदर प्रकरणी जाब विचारण्यासाठी ऋषीकेश म्हस्के व शेतकरी कार्यालयात गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांविरुध्द निलंबनाची कारवाई करण्याची मागणी ऋषिकेश म्हस्के यांनी केली आहे. शिवाय खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाटाचे टप्पा क्रमांक ४ चे काम अतिशय नित्कृष्ठ दर्जाचे झाले असल्याचे ऋषिकेश म्हस्के यांचे म्हणणे आहे. प्रकल्पाचे ठेकेदार शेतकरी बांधवांशी कायम उध्दटपणे बोलतात,
काम अपूर्ण असल्यामुळे ठेकेदारीची देयके देण्यात येणार नाहीत, असे लेखी देऊनही अधिकाऱ्यांच्या आर्शिवादाने बिले काढण्यात आली आहेत, असा आरोप देखील ऋषिकेश म्हस्के यांनी केला आहे.
प्रतिनिधी- गोपाल उगले
Published on: 17 December 2021, 07:17 IST