सूर्यफूल हे एक प्रमुख तेलवर्गीय पिकांपैकी एक आहे, याची लागवड गेल्या काही वर्षांपासून देशात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशात सूर्यफूल तेलाची मागणी बघता याची शेती शेतकरी बांधवांसाठी विशेष फायदेशीर सिद्ध होऊ शकते. कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना सूर्यफूल लागवडीचा सल्ला देत असतात. सूर्यफूल शेतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याची लागवड करण्यासाठी उत्पादन खर्च हा खूप कमी येतो आणि त्या तुलनेत प्राप्त होणारे उत्पादन मात्र भरगोस असते त्यामुळे या पिकाची लागवड शेतकरी बांधवांसाठी विशेष फायदेशीर सिद्ध होत असल्याचा दावा केला जातो. हेच कारण आहे की अलीकडे देशात मोठ्या प्रमाणात सूर्यफूलाची शेती बघायला मिळत आहे.
राज्यात देखील सूर्यफूल लागवड केली जाते, मात्र अद्यापही राज्यात खूपच कमी प्रमाणात आणि मोजक्याच प्रदेशात याची लागवड बघायला मिळते. सूर्यफूलचे एक तसं बघायला गेलं तर नगदी पीक म्हणून ओळखले जाते. कृषी वैज्ञानिकांच्या मते, जर एक हेक्टर क्षेत्रात सूर्यफूल लागवडीचा विचार केला तर सुमारे एक हेक्टर क्षेत्रासाठी तीस हजार रुपये उत्पादन खर्च अपेक्षित असतो. या एक हेक्टर क्षेत्र पासून सुमारे 25 क्विंटल सूर्यफुलाचे उत्पादन होऊ शकते. बाजारात या फुलांची किंमत सुमारे चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढी असते. म्हणजेच आपण 30 हजार रुपये एका हेक्टरसाठी खर्च करून सुमारे एक लाख रुपयांपेक्षा अधिक निव्वळ नफा कमवू शकता.
सूर्यफुल मानवी आरोग्यासाठी फायद्याचे
आहार तज्ञांच्या मते, सूर्यफूल तेल मानवी आरोग्यासाठी एक वरदानच आहे. सूर्यफूलमध्ये असलेले औषधी गुणधर्म मानवी शरीरासाठी विशेष फायदेशीर असल्याने याची बाजारात कायम मागणी बघायला मिळते.
या पिकाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याची लागवड रबी आणि खरिपातील इतर पिकांसोबत आंतरपीक म्हणून देखील करता येते. शेतकरी मित्रांनो जर आपणास सूर्यफूल लागवड करायची असेल तर फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात लागवड करावी, हे दोन महिने याच्या लागवडीसाठी सर्वात योग्य असल्याचे कृषी वैज्ञानिक सांगत असतात.
सूर्यफूल लागवडीतील काही महत्त्वपूर्ण बाबी
सूर्यफूल पेरणी करण्यासाठी जवळपास अडीच ते तीन किलो बियाणे प्रति बिघा आवश्यक असते. सूर्यफूल चे बियाणे पेरणी करण्यापूर्वी 4 ते 6 तास पाण्यात भिजत ठेवण्याचा सल्ला दिला जातो. अंदाजीत सहा तासानंतर भिजवलेल्या बिया सावलीत वाळवाव्यात, सावलीत भिजवलेल्या बिया वाळवल्यानंतर जवळपास 15-20 दिवसांनी सूर्यफुलाची योग्य अंतरावर पेरणी करण्याचा सल्ला दिला जातो. सूर्यफूल पिकाला पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे, त्यामुळे वेळोवेळी या पिकासाठी पाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
याशिवाय कीटकनाशकांची फवारणी फुलोरा अवस्थेत करता येत नाही, फुलोरा अवस्थेत जर कीटकनाशकांची फवारणी केली तर फुलांचा विकास पूर्णतः थांबून जातो, यामुळे सूर्यफुलाच्या उत्पादनात मोठी घट घडून येत असल्याचे सांगितले जाते. आवश्यकतेनुसार आणि तज्ञांचा सल्ला घेऊनच या पिकास कीटकनाशकांचा वापर करावा अन्यथा उत्पादनात मोठी घट घडून येऊ शकते.
Published on: 03 March 2022, 05:56 IST