Agripedia

आपल्या राज्यात सूर्यफूल हे एक महत्वाचे पीक म्हणून ओळखले जाते. सूर्यफूल हे पीक सूर्यप्रकाश व तापमानास संवेदनशील नसले तरी अधिक उत्पादन मिळण्यासाठी योग्य वेळी पेरणी करणे महत्त्वाचे आहे, पेरणी जूनचा पहिला पंधरवडा ते जुलैचा पहिल्या पंधरवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणीपूर्वी बियाणास बीजप्रक्रिया अवश्य करावी.

Updated on 26 June, 2023 1:58 PM IST

आपल्या राज्यात सूर्यफूल हे एक महत्वाचे पीक म्हणून ओळखले जाते. सूर्यफूल हे पीक सूर्यप्रकाश व तापमानास संवेदनशील नसले तरी अधिक उत्पादन मिळण्यासाठी योग्य वेळी पेरणी करणे महत्त्वाचे आहे, पेरणी जूनचा पहिला पंधरवडा ते जुलैचा पहिल्या पंधरवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणीपूर्वी बियाणास बीजप्रक्रिया अवश्य करावी.

हे पीक सूर्यप्रकाश व तापमानास संवेदनशील नसते. त्यामुळे खरीप, रब्बी, उन्हाळी अशा तीनही हंगामात लागवड करता येते. हलक्या ते भारी अशा सर्व प्रकारच्या जमिनीत पीक उत्तम येते. सूर्यफुलाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे पाण्याचा ताण सहन करू शकते, त्यामुळे दुष्काळी भागातही चांगले उत्पादन मिळते.

कमी कालावधीत चांगले उत्पादन मिळून जाते. सूर्यफुलामध्ये तेलाचे प्रमाण ५ ते ४० टक्के इतके असते, थोड्या क्षेत्रात कमी कालावधीत या पिकापासून जास्त तेल उत्पादन मिळू शकते. सूर्यफूल तेलास चांगला बाजारभाव असल्यामुळे इतर तेलवर्गीय पिकांच्या तुलनेत किफायतशीर कमी खर्चात येणारे पीक म्हणून सूर्यफूल ओळखले जाते.

दुग्धव्यवसायाला मिळते गती, हे यंत्र अनेकांची कामे मिनिटांत करते, जाणून घ्या...

आरोग्यासाठी देखील सूर्यफूल तेल चांगले मानले जाते. पिकाच्या वाढीसाठी २० ते २९ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. फुलोऱ्याच्या अवस्थेत ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान, सतत रिमझिम किंवा मोठा पाऊस, तसेच पीक धुक्यात सापडल्यास दाणे भरण्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे फुलोऱ्याची अवस्था पावसात व धुक्यात सापडणार नाही, याची काळजी घेऊनच पेरणीची वेळ ठरवावी.

आता वारकऱ्यांना मिळणार विमा संरक्षण

किफायतशीर उत्पादनासाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी जमीन निवडावी, थोड्याफार चोपण जमिनीत देखील हे पीक येते. जमिनीचा सामू ६.५ ते ८.५ पर्यंत असावा. जमिनीची खोल नांगरणी करून कुळवाच्या ३-४ पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणीपूर्वी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी ५-६ टन प्रमाणे द्यावे.

अखेर पावसाने राज्याला भिजवले, राज्यभर पावसाला सुरुवात..
यावर्षी पुणे जिल्ह्यात हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता, कृषी विभागाचा नियंत्रणासाठी पुढाकार..
अंबादास दानवे थेट कृषी केंद्रात! योग्य दरात बियाणे, खतांची विक्रीचे करण्याचे निर्देश...

English Summary: Sunflower Cultivation Technology
Published on: 26 June 2023, 01:58 IST