Agripedia

पिनवर्म उन्हाळी हंगामात या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीमुळे टोमॅटो पिकाचे ४०-१०० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.

Updated on 01 January, 2022 1:56 PM IST

या किडीचा प्रादुर्भाव टोमॅटो पिकाच्या पाने, फळे आणि खोडावर आढळून येतो. किडीची अळी प्रथम पानांच्या दोन्ही पापुद्रांमधील हरितद्रव्य खाते. पानांवर वेडेवाकडे, पोकळ पांढरट पापुद्रे तयार होतात. पाने फाटतात, वाळतात व गळून पडतात. नंतर अळी कोवळे शेंडे, खोड व फळे पोखरून खायला सुरवात करते. हिरव्या आणि पिकलेल्या फळांच्या सालीमध्ये अळी छिद्र करून खाते. झाडाची वाढ खुंटल्याने उत्पादनात घट होते. 

एकात्मिक व्यवस्थापन पुनर्लागवडीपूर्वी रोपांची मुळे इमिडाक्लोचप्रिड ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या द्रावणात १० मिनिटे बुडवावीत. पानांवर किडीचा प्रादुर्भाव दिसताच, ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादुर्भावग्रस्त पाने, फळे किडीच्या अवस्थांसह गोळा करून नष्ट करावीत. शेतात एकरी दोन कामगंध सापळे लावावेत. काळ्या रंगाच्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. शेतात परोपजीवी मित्र किटकांचे (ट्रायकोग्रामा अॅची, नेसिडोकोरस, नेबीस, मॅक्रोलोफस, नेक्रीमस) संवर्धन करावे. बॅसिलस/मेटारायझीअम/बिव्हेरिया या जैविक कीडनाशकांची २ ग्रॅम प्रतिलिटरप्रमाणे फवारणी करावी. 

हिरव्या आणि पिकलेल्या फळांच्या सालीमध्ये अळी छिद्र करून खाते. झाडाची वाढ खुंटल्याने उत्पादनात घट होते. एकात्मिक व्यवस्थापन पुनर्लागवडीपूर्वी रोपांची मुळे इमिडाक्लोचप्रिड ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या द्रावणात १० मिनिटे बुडवावीत. पानांवर किडीचा प्रादुर्भाव दिसताच, ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादुर्भावग्रस्त पाने, फळे किडीच्या अवस्थांसह गोळा करून नष्ट करावीत.कोषावस्थेत जाणाऱ्या अळ्यांचे प्रमाण जास्त आढळल्यास, झाडाच्या बुंध्याजवळ रिंग/स्पॉट पद्धतीने फिप्रोनिल १ मि.लि. किंवा क्लोडरपायरीफॉस २ मि.लि. प्रतिलिटरप्रमाणे आळवणी करावी. 

आवश्यकतेनुसार रासायनिक कीटकनाशक क्लो.रअँट्रॅनिलीप्रोल ०.३ मि.लि. किंवा इंडोक्झाकार्ब ०.७५ मि.लि. किंवा स्पिनोसॅड ०.३ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळुन द्यावे। 

 

लेखक - मनोहर पाटील

 शेतकरी मित्र परिवार, जळगाव जिल्हा

English Summary: Summer tomato crop aslo care
Published on: 01 January 2022, 01:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)