Agripedia

उन्हाळी सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वत्र घेतले जाते. तसेच हे कडधान्य म्हणून आणि प्रक्रिया करून देखील वापरले जाते. कमी खर्चात जास्तीतजास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे .

Updated on 12 November, 2021 7:54 PM IST

आधुनिक आणि योग्य लागवड पद्धतीचा वापर न केल्यामुळे काही क्षेत्रमध्ये सोयाबीनचे उत्पादन कमी येत परंतु तेच योग्य लागवडीचे तंत्रज्ञान अवलंबल्यास जास्त उत्पादन घेता येते.

जमिनीचा प्रकार

उन्हाळी सोयाबीनची लागवड ४.५ ते ८.५ च्या पीएच (सामु) असलेल्या जमिनीत केली तरी चालते ज्या जमिनीत जास्त प्रमाणात पाणी साचुन राहत असेल त्या जमिनीत सोयबीनची लागवड करु नये. सोयाबीनची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. परंतु अत्यंत हलक्या जमिनीत अपेक्षित उत्पादन येत नाही. जास्त आम्लयुक्त, क्षारयुक्त तथा रेताड जमिनीत लागवड करू नये. जमिनीत सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगल्या प्रमाणात असली पाहिजे

हवामान

सोयाबीन दिवसा कमी तास सुर्यप्रकाश लागणारे पिक आहे. सोयाबीनला जसा जसा दिवसाचा सुर्यप्रकाशाचा कालावधी कमी कमी होत जाईल तसे तसे फुल धारणा होत असते उष्ण हवामान या पिकास चांगले मानवते. तापमान १८ ते ३५ अंश से.ग्रे.मध्ये पिकाची वाढ चांगली होते मुख्यत्वे सोयाबीन खरीप हंगामात घेतले जाते. या पिकास वार्षिक ६०० ते १००० मी.मी. पर्जन्यमानाची आवश्यकता असते.

पिकाची जात

मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या एमएयूएस ४७ (परभणी सोना), एमएयूएस ६१ (प्रतिकार), एमएयूएस ६१-२ (प्रतिष्ठा), एमएयूएस ७१ (समृद्धी), एमएयूएस ८१ (शक्ती), एमएयूएस १५८, एमएयूएस १६२ इ. सुधारित वाणांची निवड करावी.

 

लागवड

मान्सुन व्यवस्थित स्थिर झाल्यानंतरच सोयाबीनची लागवड करावी. सोयाबीनची लागवड जुन ते जुलै महिन्यात केली जाते. १ एकरात पेरणीसाठी ३० ते ४० किलो बियाणे पुरेसे होते पेरणीतील अंतर हे २ ओळीत ७५ से.मी. दोन रोपांत १० .सें.मी. राहील असे करावे एका ठिकाणी २ किंवा ३ बिया टोचता येतात पेरणी करताना जमिनीत फार खोलवर पेरणी करु नये.

 

खत व्यवस्थापन

सोयाबीन पिकाच्या मुळांवरती रायझोबियम हा उपयुक्त जीवाणू राहत असल्याने या पिकांस वरुन नत्र खताची फारशी गरज भासत नाही. सोयाबीनच्या मुळांवरील गाठी निट तयार होण्यासाठी पेरणी सोबत किंवा रोप उगवल्यानंतर लगेच १० किलो फेरस सल्फेट १ एकरात जमिनीतुन द्यावे. सोयाबीन पिकांत शेंगा पोसत असतांना सल्फर (गंधक) युक्त खतांचा वापर करावा.

मात्र या खतातून पिकांस उपलब्ध होईल अशा स्वरुपात गंधक मिळविण्यासाठी सल्फर ऑक्झिडाझिंग बॅक्टेरियाचा वापर करणे गरजेचे आहे. या काळात पिकांस बोरॉन आणि पालाशची गरज फवारणीतुन पुर्ण करावी. सोयाबीनच्या पिकास योग्य प्रमाणात सूक्ष्मअन्न द्रव्याची मात्र देणे गरजेचे आहे त्यामुळे माती परीक्षणानुसार त्याची योग्य मात्र ठरवावी.

 

पाणी व्यवस्थापन

सोयाबीनमध्ये रोप, फुलोऱ्याची, शेंगा भरण्याची अवस्था या पाण्याच्या ताणास संवेदनशील आहेत. या कालावधीत १५-२० दिवसात पाऊस कमी झाल्यास या अवस्थेत पिकास पाणी दिल्यास उत्पादनात भर पडते.

 

रोग नियंत्रण

उगवणीच्या काळात बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशके किंवा बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया आवश्यक आहे

खोड माशी : क्लोरोपायरीफॉस २० टक्के इसी १.५ लि. प्रति है. किंवा ट्रायझेफॉस ४० टक्के इसी ८oo मि.ली. पेरणीनंतर ८ ते १० दिवसांनी आणि पीक फुलो-यात असताना ५oo-७००लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.

पाने पोखरणारी अळी :

पाण्यात मिसळणारी ५० टक्के कार्बारील भुकटी प्रती हेक्टरी २ किलो ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावी. रस शोषणा-या किडी (मावा, तुडतुडे, हिरवा ढेकूण इ.)- मेथिल डिमेटॉन २५ इसी ६oo मि.ली. किंवा फॉसफॉमिडॉन ८५ इसी २oo मि.ली. किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ एस सी ८oo मि.ली. यापैकी एका कीटकनाशकांचा प्रती हेक्टरी ५०० लीटर पाण्यात मिसळून फवारा द्यावा या पिकावर केवडा, तांबेरा, देवी, मूळकुजव्या इ. रोग येतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हेक्झाकोनेझोल ५ इसी १० मिली (प्रतिबंधात्मक) आणि रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास दुसरी फवारणी प्रॉपिकोनेझोल २५ इसी १० मिली या बुरशीनाशकांची १o लिटर पाण्यात या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.

उत्पादन

पिकाचे उत्पादन त्याच्या वाणावर अवलंबून असते साधारण १८ ते ३५ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.पीक काढणीस तयार झालं कि पाने पिवळी पडायला लागतात आणि शेंगा वळायला लागतात.

संकलन - प्रवीण सरवदे, कराड

English Summary: Summer soybean planting information and technology
Published on: 12 November 2021, 07:54 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)