Agripedia

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे (परभणी) सोयाबीन पैदासकार डॉ. एस. पी. मेहेत्रे म्हणाले,

Updated on 25 November, 2021 8:23 PM IST

की आम्हीही विद्यापीठ कार्यक्षेत्रात उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन लागवड चाचण्यांचा कार्यक्रम सुरू केला आहे. त्याचे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत. या सोयाबीनची लावण डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते जानेवारीचा पंधरवडा या कालावधीत केलेली फायदेशीर ठरते. पिकाच्या वाढीसाठी २० ते ३० अंश सेल्सिअस तापमान असणे गरजेचे असते. तसेच संरक्षित पाण्याची सोय देखील असावी लागते. जानेवारी व फेब्रुवारीच्या सुरुवातीस प्रत्येकी १० ते १२ दिवसांनी पाणी देता येते. मात्र फेब्रुवारीनंतर तापमान वाढत असल्याने आठवड्यातून एकदा पाणी द्यावे. 

आमच्या विद्यापीठाच्या एमएयूएस ६१२, एमएयूएस १५८ आदी जातींचे प्रयोग आम्ही घेत आहोत.

तज्ज्ञांनी विशद केले उन्हाळी सोयाबीनची वैशिष्ट्ये

मेहेत्रे म्हणाले, की एरवी खरिपातील सोयाबीन काढणीच्या वेळेस येते त्या वेळी पाऊस आल्यास पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. मात्र उन्हाळी सोयाबीनचा फायदा म्हणजे काढणीच्या वेळी पाऊस येत नाही.

याच्या बियाण्याची उगवणशक्ती चांगली म्हणजे ८५ ते ९० टक्के असते. त्यामुळे खरिपात लावण करताना त्याचा फायदा होतो.

या सोयाबीनमध्ये दाण्यांचा आकार मात्र कमी राहतो. खरिपातील सोयाबीनच्या १०० दाण्यांचे वजन ११ ते १३ ग्रॅम असेल, तर उन्हाळी सोयाबीनच्या दाण्यांचे वजन ८० ते १० ग्रॅमपर्यंत राहते.

दाण्यांचा आकार कमी असल्याने प्रति एकर झाडांची संख्याही वाढू शकते.

एकरी २० ते २२ किलो बियाणे पुरेसे होते.

 

संपर्क- डॉ. एस. पी. मेहेत्रे- ९४२१४६२२८२ 

विनोद धोंगडे नैनपुर

ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर

9923132233

English Summary: Summer soybean experiments at Agricultural University.
Published on: 25 November 2021, 08:23 IST