Agripedia

उन्हाळी सोयाबीन कमरेला पोहचले अजूनही त्याची वाढ सुरूच आहे,

Updated on 21 March, 2022 7:15 PM IST

उन्हाळी सोयाबीन कमरेला पोहचले अजूनही त्याची वाढ सुरूच आहे, पिकाची कायिक वाढ जास्त झाली, आता त्याचे उत्पादन कमी होणार का? वाचा सविस्तर

उन्हाळी सोयाबीन कमरेला पोहचले अजूनही त्याची वाढ सुरूच आहे, पिकाची कायिक वाढ जास्त झाली, आता त्याचे उत्पादन कमी होणार का? वाचा सविस्तर 

सोयाबीन पिकाने आता सहा पंधरवढे पूर्ण केले आहेत. इवल्याशा जांभळ्या फुलांची जागा चपट्या हिरव्या शेंगांनी घेतली आहे. काही ठिकाणी फुले गळून तिथे चॉकलेटी रंगांचे छोटेखानी शेंग नजरेस पडत आहेत. फुले संगम केडीएस-७२६ ह्या वाणाचा लागवड केली असेल तर त्याची वाढ आता थांबली असावी. प्रथमच ह्या वाणाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचा मनात चिंतेने घर केले आहे. सोयाबीन कमरेला पोहचले अजूनही त्याची वाढ सुरूच आहे. पिकाची कायिक वाढ जास्त झाली, आता त्याचे उत्पादन कमी होणार अशी मनात शंका निर्माण होते. काही ठिकाणी झाडाला आपले वजन न पेलल्यामुळे झाडं जमिनीला स्पर्श करत आहेत. बऱ्याच शंका कुशंका आणि भीती ह्या वाणाचा भोवताली फिरत आहेत. असा वाण आपण प्रथमच बघत आहोत. त्याचा स्वभाव,त्याचे गुणधर्म आणि आपले पूर्वीचे अनुभव ह्या मध्ये थोडी तफावत आहे.

बऱ्याच शेतकऱ्यांना आता पर्यंत ज्ञात झाले असेल की दोन टोकणीतील अंतर नऊ इंचाचा पुढे का असावं. ज्या शेतकऱ्यांनी टोकन न करता पेरणी केली आहे त्यांना झाडांची दाटी किती होते ह्याचा अंदाज आला असावा. आम्ही दोन टोकणीतील अंतर एक फूट ठेवलं आहे, आम्हास तेवढे अंतरही कमी वाटत आहे. फुले संगम ह्या वाणा बाबतीत सांगायचं झाल्यास त्याची उंची जास्त असल्यामुळे त्याचा घेर ही मोठा असतो. त्यामुळे पारंपारीक पद्धती पेक्षा थोडा वेगळा विचार करावा लागतो.

आता पर्यंत आपण बऱ्याच फवारण्या केल्या आहेत.००:५२:३४ चे दोन ते तीन फवारणी झाले असतील. दोन ते तीन सुष्मअन्नद्रव्याचा ही फवारण्या झाल्या असतील. इथून पुढे फवारणी करणे थोडं अवघड जाते. त्यामुळे भविष्यात झाडास जे अन्नद्रव्ये लागतील त्याची पूर्तता आपण पूर्वीच करून घेतली आहे.जर फवारणी करणे शक्य असेल

००:००:५०(पोटॅशियम सल्फेट) एकरी एक किलो ह्या प्रमाणात दोन फवारण्या कराव्यात. पोटॅशियम सल्फेट मुळे शेंगा चांगले भरतात. दाण्यांचा आकार वाढतो. त्यावेळी जर जमिनीतून आपण २५किलो म्युरेट ऑफ पोटॅशचा वापर ड्रीप किंवा पाटपाण्याने केला तर त्याचाही दाण्याचा वजन वाढण्यास फायदा होतो. आपण सोयाबीन पिकाचा शेवटा कडे आलो आहोत. ह्या दिवसात आपण जमिनीतून जे पालाश देतो त्याचे विघटन होऊन पिकास उपलब्ध होण्यासाठी पालाश उपलब्ध करणाऱ्या जिवाणूंचा वापर करणेही आवश्यक आहे.

९० दिवसानंतर पिकावर बरेच रोग येऊन गेलेले असतात. त्यांच्यावर आपण बरेच प्रयत्न करून पीक रोगमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करतो. इथून पुढे फक्त दोन रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रथम शेवटी येणारा तांबिरा आणि द्वितीय शेंगा वरील करपा. जर तांबिरा रोगाचा प्रादुर्भाव झालेला जाणवल्यास प्रोपीकोण्याझोल २५% प्रवाही १० मिली किंवा हेक्झाकोण्याझोल ५ % प्रवाही १० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जर शेंगांवर करप्याचे अस्तित्व जाणवत असेल तर त्यावर बुरशीनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे. 

ह्या रोगाकडे दुर्लक्ष करणे आपणास उत्पादनामध्ये मोठी घट घडवून आणेल. शेंगेमध्ये असलेले सर्व अन्नरस ही बुरशी फस्त करते त्यामुळे आतील दाणे भरत नाहीत. शिवाय झाडांभोवती पानांचा घेर असल्यामुळे बुरशीनाशक शेंगांपर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे पेट्रोल पंपाने फवारणी करावी लागते. जेणेकरून फवारणी करते वेळेस तयार होणाऱ्या वाऱ्याचा झोतामुळे पाने हलतील आणि फवारणी शेंगेवर बसेल. रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास टेबुकोनाझोल १० % डब्लू.पी. + सल्फर ६५ % डब्लू.जी. २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी.

अशे निरनिराळे प्रयोग केल्यास आपणास सोयाबीन पिकाचे उत्पादन घेणे सोपे जाते. पेरणी केली आणि थेट काढणीला शेतात गेलो अशी शेती आजकाल होत नाही. दिवसातून दोन वेळेस शेताला भेट देणे खूप आवश्यक आहे. आपण रोज आशा समस्यांशी सामना करत असतो जे आपल्या कधी ध्यानीमनी ही आलेल्या नसतात. त्यामुळे रोज आपल्या शेतीचा,आपल्या पिकाचा विचार करणे गरजेचे आहे.

English Summary: summer soybean crop increase height then production how will know about
Published on: 21 March 2022, 07:14 IST