Agripedia

पिकाने चार पंधरवढे पूर्ण केले. शेतकऱ्यांना आता पुष्परूपी जांभळ्या पाहुण्यांची चाहूल लागली आहे.

Updated on 04 March, 2022 4:01 PM IST

पिकाने चार पंधरवढे पूर्ण केले. शेतकऱ्यांना आता पुष्परूपी जांभळ्या पाहुण्यांची चाहूल लागली आहे. सोयाबीन पीक एरवी ४५ दिवसात फुलोऱ्यात येते. जसे प्रमुख पाहुण्यांना उशिरा यायची सवय असते तसे केडीएस-७२६चे जांभळे पाहुणे ५०+ दिवस घेतात. मागील वर्षी ६० दिवसानंतर फुलोऱ्याला सुरुवात झाली होती. ह्या वेळेस ४५व्या दिवशी काही ठिकाणी फुले दिसू लागली. पाहुणे नेहमी उशिरा येणार ह्याची खात्री असताना पाहुणा वेळेआधी आल्यावर जो आश्चर्याचा धक्का बसतो,तसाच काहीसा धक्का मलाही बसला. काल ह्या प्लॉटला साठ दिवस पूर्ण झाले. काही ठिकाणी फुलांचे रूपांतर शेंगेमध्ये झालेलं ही जाणवलं. 

बऱ्याच शेतकऱ्यांचा शिवारात आजही फुलोरा दिसत नाही. फुलोरा होणार, शेतकऱ्यांनी निश्चिन्त राहावे. 

                  आता पीक दोन महिन्याचे झाल्यावर त्याची वाढ झपाट्याने होण्यास सुरुवात होते. दिवसागणिक पिकाची वाढ झालेली जाणवते. बारा तासातही उंची वाढलेली जाणवते. जर केडीएस-७२६ ह्या वाणाची लागवड केली असेल तर आता झाडांची उंची कमरे बरोबर झालेली जाणवते. झाडांनी जमिनीला एवढे व्यापले आहे की

सूर्यप्रकाश ही भुई वर पोहचतही नाही. ह्याच सावलीचा आसरा घेत टिटवीसारख्या पक्ष्यांची छोटेखानी तात्पुरती बांधलेली घरटी ही पहावयास मिळतात. आपले पाऊल कुठे पडत आहे ह्याचा कोणताच अंदाज आपणास बांधता येत नाही. आशा अवस्थेत जर आपण फवारणी करत असू तर आपले पाऊल सबमेन वर पडून सबमेन फुटण्याची दाट शक्यता आहे. ह्या अवस्थेत रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करणे टाळावे. फुलांची गळ होण्याची दाट शक्यता आहे. तरीही एखाद्या फवारणी करण्याची गरज भासल्यास, निंबोळी अर्क अथवा इतर जैविक निविष्ठांची फवारणी करावी. 

मागील तीस दिवसात आम्ही एकूण सहा फवारण्या केल्या आहेत. तीन ००:५२:३४ चा प्रति एकर एक किलो ह्या मात्रे मध्ये आणि तीन फवारण्या सुष्मअन्नद्रव्याचा. ह्या सहा फवारण्यामुळे संपूर्ण क्षेत्रात अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत नाही. ह्या वर्षी रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढलेला जाणवला. इमिडकलोपरिडची फवारणी झाल्यास रसशोषक किडींवर मात करता येते. एकंदरीत ह्या पंधरवड्यात जास्ती काही करण्यासारखे नाही. फक्त स्फुरद आणि पालाश विरघळवणाऱ्या जिवाणूंचा वापर नियमित ठेवावा. 

                      फुलोऱ्याचे नियोजन आपण गेली दोन महिने करत असल्याने त्याला कोणत्याही टॉनिकची फवारणी करावी लागत नाही. प्रत्येक झाडाचे खोड हे करंगळी एवढे जाड झाले आहे. खोडात भरपूर साखर साठली आहे. त्यामुळे फुलोरा,फळधारणा आणि दाणे भरणे नैसर्गिकरित्या होते. 

 

विवेक पाटील,सांगली©️

०९३२५८९३३१९

English Summary: Summer soyabin crop fifth fourtnight
Published on: 04 March 2022, 04:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)