Agripedia

शेती आणि आहारात मुगास अनन्यसाधारण महत्व आहे. कडधान्य पिकामध्ये अल्पावधीत तयार होणारे खरीप व उन्हाळी हंगामातील मूग हे महाराष्ट्र राज्याचे महत्वाचे पीक आहे.

Updated on 11 February, 2022 2:49 PM IST

शेती आणि आहारात मुगास अनन्यसाधारण महत्व आहे. कडधान्य पिकामध्ये अल्पावधीत तयार होणारे खरीप व उन्हाळी हंगामातील मूग हे महाराष्ट्र राज्याचे महत्वाचे पीक आहे. महाराष्ट्रात या पिकाखाली सुमारे ७ लक्ष हेक्टर क्षेत्र आहे. विविध पीक पद्धतीत मूग पिकाचा समावेश केल्याने जमिनीचा पोत टिकून, तो सुधारण्यास सुद्धा मदत होते. मूग पिकाला पाणी कमी लागत असल्यामुळे आणि पर्यायाने पाण्याचा वापर कमी झाल्याने जमीन चोपण अथवा पाणथळ होण्यापासून वाचविता येते. 

जमीन

उन्हाळी मुगासाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी.

बियाणे प्रमाण आणि लागवडीचे अंतर

पिक कालावधी लागवडीची पद्धत हेक्टरी बियाणे (किलो) लागवड अंतर (से.मी.) उन्हाळी हंगामासाठी शिफारस केलेले वाण

जमीन योग्य ठरते. चोपण, पाणथळ, क्षारयुक्त जमिनीत हे पीक चांगले येत नाही. तसेच आम्लयुक्त जमिनीत मुळावरील रायझोबियम जिवाणूंच्या गाठींची वाढ होत नसल्यामुळे रोपे पिवळी पडतात आणि उत्पादनात घट येते. साधारणत: ६.५ ते ७.५ सामू असलेली जमीन या पिकाला योग्य असते.

हवामान

या पिकास २१ ते २५ अंश सें.ग्रे. तापमान चांगले मानवते. तसेच ३0 ते ३५ अंश सें.ग्रे. तापमानात हे पीक चांगले येते. खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात स्वच्छ सूर्यप्रकाश, उष्ण हवामान यामुळे मुगावर रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून येतो. परिणामी अधिक उत्पादन मिळते.

पूर्वमशागत

खरीप/ रब्बी पिकाचे जमिनीवर पडलेले अवशेष, पालापाचोळा वेचून घेऊन जमीन स्वच्छ करावी. जमिनीची खोल नांगरट नंतर २ कुळवण्या करून जमीन भुसभुशीत करावी. उन्हाळी मुगास पाण्याच्या पाळ्या देण्यासाठी योग्य अंतरावर सारा अथवा सरीवरंबा पद्धतीचा अवलंब करून रानबांधणी करावी. जमिनीच्या उताराला काटकोनात सारे अथवा सा-या पाडाव्यात. दोन ओळीतील अंतर २२.५ ते ३0 सें.मी. ठेवावे.

पेरणीची वेळ

उन्हाळी मुगाची पेरणी २० फेब्रुवारी ते १५ मार्च या दरम्यान करावी. पेरणीस फार उशीर करून नये अन्यथ: पीक मान्सुनच्या पावसात सापडण्याची शक्यता असते.

बियाण्याचे प्रमाण

पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने हेक्टरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात असणे आवश्यक असते. त्यासाठी प्रती हेक्टर बियाण्याचे प्रमाण पुरेसे आणि योग्य वापरणे महत्वाचे ठरते.

बीजप्रक्रिया आणि जिवाणू संवर्धन

बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास २ ग्रॅम थायस्म + २ ग्रॅम कार्बन्डॅझीम या बुरशींनाशकाची बीजप्रक्रिया करावी किंवा जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणात लावावे. यानंतर जिवाणू संवर्धनामध्ये नत्र स्थिर करणारे रायझोबियम जापोनिकम व स्फुरद विरघळवणारे पीएसबी प्रत्येकी २५ ग्रॅम प्रती किलो बियाण्यास लावावे.

खत

चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट १० ते १५ गाड्या प्रती हेक्टर प्रमाणे पेरणी अगोदर शेवटच्या कुळवणीच्या वेळी पसरावे. यामुळे ते जर्मिनीत चांगले मेिसळले जाते व अशा जमेिनीत या पेिकाची जोमदार वाळू होण्यास उपयोग होतो. पेरणी करताना मूग पिकास २o किलो नत्र आणि ४0 किलो स्फुरद प्रती हेक्टर या प्रमाणात द्यावे.

आंतरमशागत पीक सुरुवातीपासूनच तणविरहीत ठेवणे ही पिकाच्या जोमदार वाढ़ीसाठी आवश्यक बाब आहे. कोळष्याच्या सहाय्याने पीक २o ते २५ दिवसाचे असताना पहिली व ३० ते ३५ दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी. गरजेनुसार एक दोन खुरपण्या वेळीच द्याव्यात. पेरणीपूर्वी

फ्ल्युक्लोरालीन किंवा पेंडीमीथिलीन हे तणनाशक दौड़ लीटर प्रती हेक्टर पाचशे लेिट्र पाण्यातून जमिनीवर फवारावे.

पाणी व्यवस्थापन

उन्हाळी मुगाकरिता वेळेवर पाण्याच्या पाळ्या देणे अतिशय महत्वाचे असते. उन्हाळी मुगाचा कालावधी उन्हाळ्यात येत असल्याने ओर्लिताच्या साधारणपणे ५ ते ६ पाळ्या द्याव्यात. पीक पेरणीच्या पाण्यानंतर जर्मिनीच्या मगदुराप्रमाणे साधारणतः ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाण्याची पाळी द्यावी. यासाठी शेताची रानबांधणी व्यवस्थित करावी. या पिकाला फुले येताना आणि शेंगा भरतांना ओलाव्याची कमतरता भासू देऊ नये. तसेच पीक ५0 दिवसांचे झाल्यानंतर पाणी तोडावे, जेणेकरून पीक एकाच वेळी पक्वतेस येऊन उत्पादनात वाढ होईल.

पीक संरक्षण

सामान्यतः खरिपाच्या तुलनेत उन्हाळी मुगावर रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढ्ळून येतो. मात्र उन्हाळ्यातील कोरड्या व अधिकच्या तापमानात मुगावर प्रामुख्याने पिवळा विषाणू रोगाचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या विषाणूचा प्रसार पांढ्या माशीद्वारे होतो. या रोगामुळे झाडाची वाढ खुंटते. प्रादुर्भाव ग्रस्त झाडाच्या कोवळ्या पानांवर पिवळसर लहान ठिपके दिसतात व श्रोड्याच दिवसात पानांच्या ब-याचशा भागावर अनियमित आकाराचे पिवळे चट्टे दिसू लागतात. काही दिवसांनी पाने संपूर्ण पिवळी पडून कर्बग्रहण क्रिया मंदावते व फार कमी शेंगा लागतात.

उत्पादन : १o ते १२ किंवटल / हेक्टर प्रमाणे उत्पादन मिळते.

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

English Summary: Summer green gram production technology
Published on: 11 February 2022, 02:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)