मिर्ची पिकाकडे शेतकरी बांधवानी नगदी पिक म्हणून लक्ष दिले पाहिजे.उन्हाळी मिरची लागवडीसाठी पुसा ज्वाला, अग्निरेखा, पुसा सदाबहार, फुले प्रगती, परभणी तेजस, संकेश्वरी, कोकण कीर्ती, सूर्यमुखी, पंत सी-1, गुंटूर-4 यापैकी जातींचा वापर करावा. तसेच कमी तिखट जातीच्या लागवडीसाठी सितारा या जातीची लागवड करावी. यासह बाजारपेठेमध्ये खाजगी कंपन्यांच्या भरघोस उत्पादन देणाऱ्या, विषाणूजन्य रोगाला कमी प्रमाणात बळी पडणाऱ्या जाती उपलब्ध आहेत
15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या काळामध्ये पुनर्लागवड करावी. रोपे लागवडीअगोदर कॉपर ऑक्सीक्लोराईड 2 ग्रॅम प्रति लिटर द्रावणात बुडवून लागवड करावी.
15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या काळामध्ये पुनर्लागवड करावी. रोपे लागवडीअगोदर कॉपर ऑक्सीक्लोराईड 2 ग्रॅम प्रति लिटर द्रावणात बुडवून लागवड करावी. 6 मी लांब, 1 मी रुंद आणि 20 सेंमी उंचीचे गादीवाफे तयार करावेत. एक एकरसाठी 200 ते 600 ग्राम बियाण्यास 5 ग्रॅम थायरम चोळून बियांची पेरणी करावी.किंवा कोकोपीट व ट्रेच्या साहाय्याने घरीच रोपे तयार करावीत. एक एकर क्षेत्र लागवडीसाठी एका गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्रातील रोपे पुरेशी होतात.
जातीनुसार व जमिनीच्या प्रतीनुसार 60 ते 75 सेंमी अंतरावर सरी-वरंबे तयार करून घ्यावेत व त्यानंतर वरंब्याच्या बगलेत 45 ते 60 सेंमी अंतर ठेवून रोपांची लागवड करावी. ठिबक सिंचनावर लागवड करावयाची असल्यास जमिनीच्या प्रकारानुसार 60 बाय 60 सेंमी किंवा 60 बाय 45 सें.मी. अंतर ठेवावे. 10-15 दिवासांनी मर झालेल्या रोपांच्या जागी दुसरी रोपे लावावीत.
उन्हाळी मिरचीसाठी माती परीक्षणानुसार एकरी 50 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश द्यावे. यापैंकी अर्धे नत्र लागवडीनंतर 30 ते 40 दिवसांनी द्यावे. मिरचीस उन्हाळ्यात जमिनीच्या प्रतीनुसार व पिकाच्या आवश्यकतेनुसार एक ते दोन आठवड्यांच्या अंतराने पाणी द्यावे.
उन्हाळी मिरचीची फूलगळ ही मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे मिरचीचे तोडे कमी मिळून उत्पादन कमी मिळते. फुलांची गळ कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी एनएए हे संजीवक वापरावे.
यासाठी मिरचीची झाडे फुलावर आल्याबरोबर एनएए (50 पीपीएम) 20 मिली प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारावे. त्यानंतर दुसरी फवारणी 20 ते 25 दिवसांनी करावी.
मिरची हे 150 ते 170 दिवसांचे पीक असून जातीनिहाय एकरी उत्पादनामध्ये कमी जास्त प्रमाण होऊ शकते
आपला अनुभव हाच खरा गुरू आहे.
आपल्याला अवगत असलेले ज्ञान इतरांना सांगण्याने संपुष्टात येत नाही
Published on: 24 January 2022, 01:06 IST