Agripedia

पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवस्थापन खूप गरजेचे असते. यामध्ये पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन खूप गरजेचे असते. जर आपण विचार केला तर मुख्य अन्नद्रव्यांमध्ये नत्र,स्फुरद आणि पालाश यांची नितांत गरज असते व यासोबतच महत्त्वाची सूक्ष्म अन्नद्रव्ये देखील तितकेच महत्वाचे असतात. सूक्ष्म द्रव्यांचा नियोजनबद्ध वापर केला तर पीक उत्पादन वाढीमध्ये याचा खूप मोठा फायदा होतो.

Updated on 26 September, 2022 1:52 PM IST

पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवस्थापन खूप गरजेचे असते. यामध्ये पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन खूप गरजेचे असते. जर आपण विचार केला तर मुख्य अन्नद्रव्यांमध्ये नत्र,स्फुरद आणि पालाश यांची नितांत गरज असते व यासोबतच महत्त्वाची सूक्ष्म अन्नद्रव्ये देखील तितकेच महत्वाचे असतात. सूक्ष्म द्रव्यांचा नियोजनबद्ध वापर केला तर पीक उत्पादन वाढीमध्ये याचा खूप मोठा फायदा होतो.

जर आपण ऊस पिकाचा विचार केला तर या पिकासाठी मुख्य अन्नद्रव्यांसोबत दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे योग्य वेळेत व संतुलित प्रमाणात वापर करणे खूप आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आपण या लेखात ऊस उत्पादनवाढीसाठी गंधकाचा कशा पद्धतीने उपयोग होतो याची माहिती घेऊ.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो पुसा तेजस गव्हाचे वाण लागवडीसाठी फायदेशीर; फक्त 125 दिवसात मिळणार भरपूर उत्पादन

 ऊस उत्पादन वाढीत गंधकाचे कार्य

 दाणेदार गंधक खत जर जास्त प्रमाणात वापरले तर यामध्ये जवळजवळ 90 टक्‍क्‍यांपर्यंत मूलभूत गंधक व 10 टक्के बेन्टोनाईट असते.

याचा मातीमध्ये जो काही ओलावा असतो त्याच्याशी संपर्क आल्यावर त्याच्या  पेस्टाईलचे जलद विघटन होते व मूलभूत गंधक पिकास त्वरित उपलब्ध होत. विघटन झालेल्या गंधकाचे ऑक्सिडेशन होते व त्याचे सल्फेट मध्ये रूपांतर होते व हे ऊसाला त्याच्या संवेदनशिल वाढीच्या अवस्थेत उपलब्ध होते.

1- गंधक पिकांना जलद उपलब्ध होते उसाची वाढ होते.

2- गंधकामुळे नत्राची कार्यक्षमता वाढते.

3- जमिनीचा सामू सुधारल्यामुळे स्फूरद, लोह व जस्त या अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.

4- गंधकाच्या वापराने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते व खत वापर क्षमता वाढते.

नक्की वाचा:Crop Tips: कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवायचे तर 'या' छोट्या टिप्स ठरू शकतात उपयोगी, वाचा माहिती

5- ऊस पिकाच्या महत्त्वाच्या जो काही वाढीचा टप्पा आहे त्यामध्ये पिकाची अल्पकालीन व दीर्घकालीन गंधकाची गरज पुरवली जाते व पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

6- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उसाच्या रसाची शुद्धता वाढते साखरेचा उतारा देखील वाढण्यास मदत होते व गुणवत्ता सुधारते. त्यामुळे उत्पादनात वाढ होते.

ऊस पोषणामध्ये गंधकाची भूमिका

1- मुख्य अन्नद्रव्यांसोबत गंधक वापरल्याने उसाचे उत्पादन क्षमता वाढते.

2- जमिनीचे सामु पातळी नियंत्रित करते व क्षारयुक्त जमिनीचे गुणवत्ता वाढवते.

3- पानातील हरितद्रव्यमध्ये सुधारणा होते व प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया परिणामकारकपणे होते. ऊस पिकातील स्टार्च, शर्करा, मेद आणि जीवनसत्व या सगळ्यात सुधारणा होते व वनस्पतीमधील आवश्‍यक अमिनो आम्लाच्या 90 टक्के भाग यामुळे बनतो.

नक्की वाचा:Crop Veriety: शिमला मिरची लागवड करायचा प्लान आहे तर 'या' जाती देतील कमी दिवसात भरपूर उत्पादन

English Summary: sulphur is so useful and do help in more production to canecrop
Published on: 26 September 2022, 01:51 IST