Agripedia

उन्हाळ्यात उसाचा रस ताजा आणि थंडगार पिण्याचा आनंद काही वेगळाचं असतो. उसाचा रस हे नैसर्गिक पेय आहे.

Updated on 03 March, 2022 7:29 PM IST

उन्हाळ्यात उसाचा रस ताजा आणि थंडगार पिण्याचा आनंद काही वेगळाचं असतो. उसाचा रस हे नैसर्गिक पेय आहे. उसाचा रस फक्त तुमचा गर्मीपासूनच बचाव करत नाही तर बऱ्याच आजारापासूनही दूर ठेवतो. उसाच्या रसापासून भरपूर ऊर्जा देखील मिळते.

 

हे आहेत उसाच्या रसाचे फायदे

१. उसाचा रस प्यायल्याने त्वचा उत्तम राहते. यामुळे पिंपल्स, चेहऱ्यावरचे डाग दूर होतात आणि स्किनला हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते.

२. उन्हाळ्यात डिहायड्रेशनची भीती सतत असते त्यामुळे उसाचा रस प्यायल्याने डीहायड्रेशन पासून बचाव होतो.

 ३. उसाचा रस ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. यात ग्लूकोजची अधिक मात्रा असून याला एक उत्तम एनर्जी ड्रिंक बनवतं. यामुळे तुम्हाला फक्त ऊर्जाच मिळत नाही तर उन्हापासून बचाव करुन शरीराला शांत ठेवण्यास देखील मदत होते.

४.उसाचा रस खोकला, दमा, मुत्ररोग आणि किडनीशी संबधित रोगांवरदेखील फायदेशीर आहे.

५. उसाचा रस कावीळ या रोगावर अत्यंत गुणकारी आहे. कावीळ होऊ नये म्हणून उसाचा रस नेहमी पिणे फायदेशीर आहे.

६.कावीळ झाली असल्यास उसाचा रस किंवा रोज सकाळी उस खाल्यास कावीळ लवकर बरी होण्यास मदत होते.

७.उसाचा रस प्यायल्याने तोंडातील दुर्गंधीपासून मुक्ती मिळते आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध होतो. यामुळे दातांना होणाऱ्या इनफेक्शनपासून बचाव आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत होते.

८.उसाचा रस हा नैसर्गिक असल्यामुळे लहांनांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वजण पिऊ शकतात. फक्त १-४ वर्षापर्यंतच्या बालकांनी मात्र उसाचा रस थोड्या प्रमाणात घ्यावा.

९.कृत्रिम थंड पेय शरीराला तात्पुरता थंडावा देतात खरी पण याचे दुष्परिणाम खूप आहेत. याउलट उसाच्या रसाचे नेसर्गिक असल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

१०.उसाचा रस नाशवंत असल्यामुळे तो पिण्याआधी ताजा असणे फार महत्त्वाचे आहे.

११)उसाचा रस फक्त तुमचा गर्मीपासूनच बचाव करत नाही तर बऱ्याच आजारापासूनही दूर ठेवतो. उसाच्या रसापासून भरपूर ऊर्जा देखील मिळते.

English Summary: Sugercane juice most important benifits
Published on: 03 March 2022, 07:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)