Agripedia

Sugarcane Varieties: महाराष्ट्रात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच आता ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. मात्र अनेकजण दरवर्षी प्रमाणे त्याच त्या उसाच्या जातींची लागवड करत असतात. मात्र आता संशोधन केंद्राने उसाच्या दोन जातींना सर्वोत्तम जाती ठरवले आहे.

Updated on 31 October, 2022 1:10 PM IST

Sugarcane Varieties: महाराष्ट्रात (Maharashtra) उसाची लागवड (Cultivation of sugarcane) मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच आता ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. मात्र अनेकजण दरवर्षी प्रमाणे त्याच त्या उसाच्या जातींची लागवड करत असतात. मात्र आता संशोधन केंद्राने (Research Centre) उसाच्या दोन जातींना सर्वोत्तम जाती ठरवले आहे.

ऊस संशोधन केंद्राने ऊस संशोधनासाठी दहा एकरमध्ये आठ जातींची लागवड केली आहे. यामध्ये संशोधन केंद्राने कोएम- ०२६५ (COM- 0265)' आणि ' को- ९२००५ ' (Co- 92005) या जाती सर्वोत्तम ठरवल्या आहेत.

शेतकऱ्यासाठी उसाच्या जाती खूप महत्त्वाच्या ठरतात. उत्पन्नात वाढ कशी करता येईल याचा सर्वत्र विचार करत आहेत. कोकणातील ऊस लागवडीचा मागील तीन वर्षांचा आढावा घेतला असता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एकरी केवळ १५ ते १६ टन उत्पादन मिळत आहे.

गुजरातमध्ये मोठी दुर्घटना! पूल तुटल्याने शेकडो लोक पाण्यात बुडाले; आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू

कोकणातील वातावरण कोणत्या ऊस जातींना पोषक आहे, याचा अभ्यास होण्याची गरज होती. त्यादृष्टीने नापणे येथील ऊस संशोधन केंद्रामध्ये २०२० पासून प्रकल्पाधिकारी डॉ. विजय शेट्ये यांचा (Lifestyle) गट ऊस जातींवर संशोधन करीत आहे. २०२० मध्ये संशोधन केंद्रामध्ये पहिल्या वर्षी विविध आठ जातींची दहा एकरांत लागवड करण्यात आली.

या संशोधनात ३ वर्षांच्या निकषानंतर या उत्पादनाचा अंतिम आकडा काढण्यात येणार आहे. मात्र पहिल्या वर्षीच्या निष्कर्षात कोएम ०२६५ या जातीपासून हेक्टरी ८०.४६ टन आणि को ९२००५ या जातीपासून हेक्टरी ८०.४५ टन उत्पादन मिळाले आहे.

कृषिमंत्र्यांचे बांधावर जाऊन आश्वासन मात्र अद्याप नुकसान भरपाई नाही; शेतकरी मेटाकुटीला

मात्र लागवड केलेल्या इतर जातींपेक्षा या दोन जातींचे उत्पादन अधिक आहे. इतर जातींचे उत्पादन खूपच कमी मिळाले आहे. तसेच या दोन जातींना कोकणातील वातावरण पोषक मानले जात आहे.

येत्या पुढील २ वर्षात इतर जातींसह या दोन जातींचाही अभ्यास केला जाणार आहे. तसेच कोणत्या जातींपासून किती उत्पादन मिळत आहे हे देखील तपासले जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान भरपाई! पीक विमा कंपन्यांनी तालुकास्तरावर उघडली कार्यालये
CNG Car: 1 लाखात घरी आणा ही जबरदस्त सीएनजी कार; मिळेल 31KM मायलेज

English Summary: Sugarcane Varieties: Two new varieties of sugarcane are setting records, farmers are benefiting..
Published on: 31 October 2022, 01:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)