नगदी पिकात प्रथम क्रमांक लागतो तो म्हणजे ऊस या पिकाचा. दिवसेंदिवस पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबरोबरच मराठवाडातील शेतकऱ्यांचा कल सुद्धा उसाकडे ओळू लागला आहे. वाढत्या क्षेत्राबरोबर उत्पादन सुद्धा वाढणे गरजेचे आहे मात्र शेतकरी खोडवा उसाकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे उसाच्या उत्पादनात घट होत आहे. जरी उसाचे उत्पादन घटण्यामागे अनेक कारणे असतील तरी मुख्य कारण हे खोडवा च आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाने खोडवा पिकाची जोपासना केली तर लागणीच्या उसाएवढे उत्पादन भेटणार आहे. जर तुम्ही योग्य प्रकारे व्यवस्थापन केले तर त्यापेक्षा जास्तच उत्पादन भेटणार आहे.
हे आहेत खोडवा ऊसाचे फायदे :-
१. खोडवा पिकाच्या उसासाठी पूर्वमशागत करणे गरजेचे नसते.
२. खोडवा ऊस घेतल्यामुळे लागवडीसाठी लागणारे बेणे तसेच बीजप्रक्रिया आणि ऊस लागवड करण्यासाठी लागणारा खर्च आहे त्याची बचत होते.
३. लागण केलेल्या उसापेक्षा खोडवा ऊस आधीच एक ते दीड महिना लवकर येतो.
४. खोडवा पीक पाण्याचा जास्त ताण सहन करते त्यामुळे जरी ताण आला तरी उसाच्या उत्पादनावर परिणाम होत नाही.
५. खोडवा उसाची पाचट सुद्धा आपण अच्छादन करण्यासाठी वापरतो.
खोडव्याचे उत्पादन घेताना महत्वाच्या बाबी :-
उसाची लागण करण्यादरम्यान उसाचे उत्पादन जर हेक्टरी १०० टन असेल तसेच उसाची संख्या १ लाखापेक्षा जास्त असेल तर खोडवा ऊस ठेवावा. जर ऊस विरळ झाला तर प्लास्टिक च्या पिशवीमध्ये तयार केलेली रोपे वापरावी लागणार आहेत. उसावरील खोड किडीची नियंत्रण करण्यासाठी 35 टक्के ७०० मिली एण्डोसल्फॉन 500 लिटर पाण्यास मिसळून प्रति हेक्टरी फवारावे.
खोडवा ऊसात पाचटाचा वापर :-
खोडवा उसाच्या पाचटमध्ये ०.४२ते ०.५० टक्के नत्र तसेच ०.१७ ते ०.२० टक्के स्फुरद, ०.९० ते १.०० टक्के पालाश आणि ३२ ते ४० टक्के सेंद्रीय कर्ब असते. उसाच्या एक हेक्टर क्षेत्रामधून ७ ते १० टन पाचट मिळते तसेच त्यामधून ३१.५ टक्के ते ५० किलो नत्र, ३ ते ४ हजार किलो सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये घातले जाते. सुरुवातीच्या काळात आच्छादन आणि नंतर पाचट जागेवरच चांगले सेंद्रिय खत तयार करण्यासाठी नवीन यंत्र विकसित केले जाते. उसाची पाचट न जाळता खोडव्यामध्ये या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून खोडवा व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यामुळे उत्पादनात वाढ देखील होईल तसेच जमिनीची सुपीकता देखील वाढेल.
रासायनिक खतांचा वापर :-
एकदा की खोडवा उसाला पाणी दिले की ३ ते ४ दिवसांनी वापसा आल्यानंतर रासायनिक खतांची पहिली मात्रा द्यावी. दोन समान आठवड्याच्या अंतरात रासायनिक खताची मात्रा द्यावी. पहिली मात्रा ही खोडवा दिल्यानंतर १५ दिवसांनी तर दुसरी खत मात्रा १३० दिवसांनी द्यावी.
Published on: 25 April 2022, 12:53 IST