Agripedia

ऊसाला तुरा येण्याची कारणे तुरा येण्याचे प्रमाण हे त्या ऊसाच्या जातिच्या अनुवांशिक गुणांवर अवलंबून असते.

Updated on 22 December, 2021 4:32 PM IST

तुरा येण्यासाठी १२:३० तासांचा दिवस व ११:३० तासांची रात्र असा प्रकाश कालावधी असल्यास.

ज्यावर्षी पावसाचे प्रमाण आँक्टोंबर व सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त असते त्यावर्षी तुऱ्याचे प्रमाण जास्त असते.

दिवसाचे तापमान हे २६-२८℃ व रात्रीचे तापमान हे २२-२३℃ असल्यास.

हवेतील आद्रतेचे प्रमाण (६५-९०%) व जमिनीतील पाण्याचे प्रमाण जास्त असल्यास.

नत्राचे शोषण ऊस पिकाकडुन कमी झाल्यास तुरा येतो.

वाऱ्यामुळे ऊसावर होणारे परिणाम

वारा आल्यावर ऊसाची वाढ पुर्णपणे थांबते व ऊसाची पक्वता वाढत जाते.

सुरु ऊस जो डिसेंबर ते फेब्रुवारी/मार्च पर्यंत लावला जातो त्या ऊसास तुरा आल्यामुळे त्यांची शाकिय वाढ होत नाही परिणामी उत्पादन व साखर उताऱ्यात घट होते.

तुरा येण्यास सुरुवात झाल्यावर त्याची पाने अरुंद होतात व पिवळी पडण्यास सुरुवात होतेपानांचे क्षेत्रफळ कमी होते त्यामुळे कर्बग्रहणाची क्रिया मंदावते.

पोंग्यामधील कोंबाची वाढ थांबते.

तुरा आलेला ऊस जर शेतामध्ये १.५० ते २ महिन्यांच्या पुढे राहिला तर ऊस पोकळ पडण्यास सुरुवात होते.

परिणामी साखरेचा उतारा 18-20% पर्यंत घट होत

उपाय योजना

तुरा आलेल्या ऊसाची तोडणी लवकर करावी.

ऊसाची लागवड शिफारस केलेल्या हंगामात व वेळेत करावी.

पावसाळ्यात ऊसाच्या शेतात पाणी साठुन राहणार नाही याची काळजी घ्यावी.

English Summary: Sugarcane inflorescence why grow and their effects
Published on: 22 December 2021, 04:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)