ऊसाला तुरा येण्याची प्रक्रिया :
कुठल्याही पिकामध्ये संकरिकरण करुन अनेक चांगल्या गुणांचा एकत्रित समुच्चय असणाऱ्या नवीन वाणांची निर्मिती करायची असेल तर त्यांना फुले येणे महत्त्वाचे असते. ऊसामध्येसुद्धा नवीन वाण निर्माण करण्याच्या दृष्टीने तुरा येणे व त्यावर बीजधारणा होणे या प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण शेतक-यांच्या शेतावर ऊसाला तुरा येणे ही बाब मात्र अनिष्ट आहे. तुरा येण्यापूर्वी उभ्या ऊसाला बाणासारखी टोके (ऍरोइंग) दिसू लागतात आणि ऊसाची वाढ थांबते. अशी अवस्था आल्यानंतर तीन महिन्यात ऊस तोडला तर उत्पादन अथवा साखरेवर फारसा विपरीत परिणाम होत नाही. पण तुरा येऊन फुले झडू लागल्यावर ऊसामधल्या रसाची गुणवत्ता ढासळू लागते. साखरेचे रुपांतर ग्लुकोज व इतर प्राथमिक पदार्थांमध्ये होते. धाग्याचे प्रमाण वाढते. दशी सुटून ऊस भेंडाळतो. शेंड्याकडील डोळे फुटू लागतात.
१. वाण : तुरा येण्याचे प्रमाण अनुवंशिक घटकावर अवलंबून असते. को ७२१९, कोसी ६७१, को ९४०१२ या वाणांमध्ये तुरा लवकर येतो. को ७४०, को ७१२५, को ८०१४, को २६५ मध्ये तुरा उशीरा येतो.
ऊसाला तुरा येण्यापूर्वी साधारणपणे ७५ ते ९० दिवस पुष्पांकुर (फ्लोरलबड इनिशियेशन) तयार होते. पुष्पांकुर तयार होण्याची प्रक्रिया प्रामुख्याने दिवसाचा प्रकाश काळ किती मोठा आहे यावर अवलंबून असते.
को ७२१९, कोसी ६७१, को ९४०१२ या वाणांमध्ये तुरा लवकर येतो. को ७४०, को ७१२५, को ८०१४, को २६५ मध्ये तुरा उशीरा येतो.
ऊसाला तुरा येण्यापूर्वी साधारणपणे ७५ ते ९० दिवस पुष्पांकुर (फ्लोरलबड इनिशियेशन) तयार होते. पुष्पांकुर तयार होण्याची प्रक्रिया प्रामुख्याने दिवसाचा प्रकाश काळ किती मोठा आहे यावर अवलंबून असते. प्रकाश काळाच्या प्रभावावर दिवसाचे तापमान, जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण, पोषण द्रव्यांची उपलब्धता, पानामधील ऑक्सिजन या संजीवकाचे प्रमाण यांचा मोठा परिणाम होऊ शकतो. ऊस पीक लघु दिवशीय असून डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत त्यास तुरा येतो. दिवसाचे तापमान २६ ते २८ अंश से., रात्रीचे तापमान २२ ते २३ अंश से., हवेतील आर्द्रता ६५ ते ९०%, दिवसाचा प्रकाश काळ १२.३० तास आणि प्रकाशाची तीव्रता १० ते १२ हजार फूट कँडल असे वातावरण पुष्पांकुर तयार होण्यास अनुकूल असते. असे वातावरण १० ते १२ दिवस सलग राहिल्यास पुढे ७० ते ९० दिवसांत तुरा येतो. कोयंबतूर (११N) येथे अशी परिस्थिती जुलैच्या दुस-या आठवड्यापासून ऑगस्टच्या चौथ्या आठवड्यापर्यंत असू शकते. बिजापूर येथे (१७N) ऑगस्टच्या दुस-या आठवड्यापासून चौथ्या आठवड्यापर्यंत ही परिस्थिती असते. लखनौ येथे हा काळ सप्टेंबरच्या दुस-या ते चौथ्या आठवड्यात येतो. जसजसे विषुववृत्ताकडे जावे तसतसे पुष्पांकुर तयार होण्याची क्रिया लवकर घडते.
तुरा येण्याच्या क्रियेवर परिणाम करणारे घटक
२. पाणथळ परिस्थिती : शेतामध्ये पाणी साठून रहात असेल तर तुरा येण्याचे प्रमाण जास्त राहाते. एरवी तुरा न येणा-या को ६३०४ सारख्या वाणालासुद्धा पाणथळ स्थितीत तुरा येतो.
३. पाण्याचा ताण : पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात पिकाला पाण्याचा ताण पडला तर तुरा येण्याचे प्रमाण कमी राहते.
४. नत्राची कमतरता : पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात नायट्रोजनची कमतरता निर्माण झाली तर मोठ्या प्रमाणात तुरा येतो म्हणून या गावाच्या अक्षांशाप्रमाणे जास्तीत जास्त मोठा दिवस येण्याच्या वेळेला २५% वाढीव नत्राची मात्रा देवून पुढे पंधरा दिवसांनी थोडा पाण्याचा ताण दिला तर तुरा येण्याचे प्रमाण कमी राहते. साखरेचा उतारा वाढतो. पावसाळी किंवा मिरगी डोस देण्याची काही ठिकाणी पद्धत या दृष्टीने महत्त्वाची आहे.
तुरा येऊ नये म्हणून काय करावे?
५. पिकाचा प्रकार : लागण ऊसापेक्षा खोडवा ऊसामध्ये तुरा येण्याचा प्रकार जास्त असतो. सुरू, पूर्वहंगामी आणि आडसाली असा कोणताही लागण हंगाम असला तरी ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात ऊसाला तुरा येतो. एप्रिल ते जून याकाळात लागण केलेला ऊस ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तीन चार कांड्यांवर असेल आणि तुरा येण्यास अनुकूल हवामान मिळाले तर अशा ऊसाला डिसेंबरपर्यंत तुरा येऊ शकतो. पण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये उगवण अथवा फुटवा अवस्था असेल तर त्यावर्षीच्या आक्टोबर-डिसेंबरमध्ये तुरा येत नाही.
२) पाण्याचा ताण देणे पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात थोडा पाण्याचा ताण दिला तर तुरा येणे टळते. पण महाराष्ट्रात हा काळ जुलैमध्ये येतो. त्यावेळी पावसाळा ऐनभरात असतो. त्यामुळे पाण्याचा ताण बसणे शक्य होत नाही आणि अपेक्षेप्रमाणे पाण्याचा ताण बसला तर फुटवे मरु लागतात. गाळप योग्य ऊसाची संख्या कमी होते. उत्पादन घटते. ही बाब सुद्धा अव्यवहार्य आहे.
३) पॅराक्वाट या रसायनाची फवारणीपॅराक्वाट या रसायनाचे (०.३५ किलो क्रियाशील घटक/ हेक्टर) ३००० लिटर पाण्यात द्रावण करुन गर्भांकुराच्या काळात फवारणी ४ दिवसाच्या अंतराने दोनदा केल्यास तुरा येत नाही. अशी फवारणी भरणीच्या वेळी केली तरी फायदा होतो.
१) शेंड्याजवळील पाने काढणे ऊसाच्या शेंड्याजवळील ३-४ पानांत पुष्पांकुर करणारी जैवरसायने तयार होत असतात. पाने पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात काढली तर तुरा येत नाही. शिवाय नवीन पाने येऊन वाढ चालू राहाते. प्रत्यक्षात ही कृती व्यवहार्य नाही.
तुऱ्याचे नियंत्रण करण्याचे फायदे :उष्ण कटिबंधामध्ये तुर्याचे नियंत्रण केलेल्या ऊसाचे टनेज वाढते. साखरेचे प्रमाणसुद्धा वाढते. ऊसाची वाढ चालू राहते. समशीतोष्ण कटिबंधात मात्र तुरा येवो अथवा न येवो नोव्हेंबरपासून येणार्या थंडीमुळे ऊसाची वाढ थांबलेलीच असते. त्यामुळे तुर्याचे नियंत्रण करुन फारसा फायदा होत नाही. पण एक फायदा मात्र असा होतो की मार्च महिन्यानंतर जरी ऊस तुटला तरी साखरेचे प्रमाण कमी होत नाही.
डॉ.बी.एम.जमदग्नी सर
M.Sc. (Agri), Ph.D.
वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ, निवृत्त शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
Published on: 21 January 2022, 09:08 IST