Agripedia

जून/जुलै महिन्यात काही दिवसांच्या पावसाच्या खंड काळात

Updated on 17 July, 2022 3:37 PM IST

जून/जुलै महिन्यात काही दिवसांच्या पावसाच्या खंड काळात आपण शेतीची खोल मशागत केल्यामुळे, ज्या शेतकरी बंधूनी, शेतात 2/3 वेळा खोल वखरती/डवरणी केली आणि जमीन खूपच भुसभुशीत करून ठेवली, अशा शेतकऱ्यांच्या शेतात एकाच वेळेस भरपूर पाऊस पडल्यामुळे, पाणी साचून राहिले, त्यामुळे कापूस या पिकाची मुळ खूप सैल झाली ,त्यांमुळे अशी झाडे कोमेजण्याचा प्रकार काही शेतकऱ्यांकडे झाला, झाड मलूल होऊन अंग सोडते त्याला जास्त घाबरण्याचे कारण नाही.खोल मशागत केली, कापसाच्या बुंध्या जवळ पाणी साचले ,तर कापूस पीक मलूल होते तसेच खूप पाऊस पडल्यानंतर पिकाला सूर्यप्रकाश मिळाला की शॉक बसतो. काही भागात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, काही भागात चांगला पाऊस पडत आहे,व नंतर स्वच्छ सूर्यप्रकाश पडल्यावर कापूस व तुरीच्या पिकाला शॉक बसेल या पिकात झाड मलूल/कोमेजण्याचा प्रकार दिसू लागेल, पीक कोमेजेल ज्या ठिकाणी जास्त पाणी साचले आहे तेथे हा प्रकार जास्त दिसेल, पाणी साचल्यामुळे मुळीला

ऑक्सिजन ची कमतरता भासते त्यामुळेही,कापूस/तूर पीक मलूल होते, वाढ खुंटते, त्याला घाबरून जाण्याचे कारण नाही .त्यासाठी खूप साधा आणि सोपा उपाय आहे.उपाय - कापूस पिकामधे अति पाऊस/ पाणी साचल्यामुळे ते पाणी चर काढून शेताबाहेर काढावे. तसेच कापसाचे झाड दोन्ही पायात घेऊन मुळाजवळ दाबणे व मुळयाना ताण देणे, मूळ घट्ट झाले की 2/3 दिवसात ते झाड सुधारते, अशा झाडांनायुरिया 200 ग्राम + DAP 200 ग्रॅम, काॅपर ऑक्सझीक्लोराईड 30 ग्रॅम, प्रती पम्प घेऊन (15 लिटर) प्रत्येक झाडाजवळ 50/60 मिली पाणी पंपाने ड्रेंचिंग करावे.मलूल झालेल्या झाडाच्या बुंध्या जवळ खुरपुन 4/5 ग्राम प्रति झाड युरिया द्यावा.150 ग्रॅम युरिया ,150 ग्राम पांढरा पोत्ताश ,30 ग्राम बावीस्टीन, 15 लिटरच्या पंपात घेऊन ड्रेंचिंग व फवारणीहि करावी. आपल्या जवळ वेस्ट दिकंपोझरचे द्रावण असेल तर ते द्रावण 5 लिटर व 10 लिटर पाणी पंपात घेऊन प्रति झाड 50/60 मिली ड्रेंचिंग करावे, 2 लिटर वेस्ट दिकंपोझर द्रावण 13 लिटर पाणी, अशी फवारणी करावी ,वेस्ट दिकंपोझर हे एक सर्वोत्तम बुरशीनाशक आहे. लवकर उपाय योजना केली तर नुकसान कमी होइल.

फुलगळ - गेल्या दोन दिवसांपासून आपल्या भगवती सिड्स च्या सर्वच ग्रुप्स वर कापूस पिकात मोठ्या प्रमाणात फुलगळ होत आहे ,असे प्रश्न विचारले जात आहेत शेतकरी बंधुनो जून/जुलै मध्ये काही दिवसाच्या पावसाच्या खंडा मुळे कापूस हे पीक तणावाखाली आले, प्रि मान्सूनची लागवड केलेल्या कापसाला भरपूर प्रमाणात फुलपाती असल्यामुळे व अन्न ग्रहण क्षमता पाण्या अभावी कमी झाल्यामुळे झाड अन्न ग्रहण करू शकले नाही, आणि गेल्या 10/15 दिवसापासून रोजच कमी अधिक प्रमाणात पाऊस सर्वत्र पडत असल्यामुळे, एकाच वेळेस झाडाने अन्न ग्रहण केल्यामुळे झाडावर ज्या कमकुवत पात्या, बारीक कैऱ्या होत्या त्यांची गळ होत आहे ,डिहायड्रेशन सारखा हा प्रकार आहे.गेल्या 10/12 दिवसापासून ढगाळ वातावरण आहे ,प्रकाश संसलेशनाची क्रिया मंदावली त्यामुळे पिकाची पर्ण रंद्रे बंद होतात,म्हणून झाडांची अन्न ग्रहण क्षमता कमी झाली , जमिनीत पाणी साचल्यामुळे मुलांची अन्न ग्रहण व मुलांची अन्न वाहन क्षमता कमी झाली ,परिणामी झाडाला अन्न पुरवठा कमी झाल्यामुळे कापसाचे झाड फुल सोडून देत आहे, हि नैसर्गिक गळ आहे .दुसरे कारण असेही आहे की pottash च्या कमतरतेमुळे झाड फुलपाती सोडून देते,त्याला कारण म्हणजे उशिरा खत देणे, pottash हे खत पिकाला दिल्यानंतर 45 दिवसांनी लागायला सुरुवात होते व 75 दिवसा पर्यन्त त्याचे कार्य चाललेले असते, आणि

आपण कापूस 1 महिन्याचा झाल्यावर पोत्यास/खते देतो, पोत्याशच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणात फुलगळ होते.आपण शेतात व्यवस्थित निरीक्षण केल्यास फुल गळ हि, जे कापूस वाण 8/10 वर्षांपासून बाजारात प्रचलित आहेत त्यांच्यावरच होताना दिसते. बियाणे आणि कापूस सल्ला हि मी लिहिलेली पोस्ट वाचा, त्यात म्हटले आहे ज्या वानांना 5/6 वर्ष झाली त्या ऐवजी नवीन वानाची लागवड करावी.दर 4/5 वर्षांनी बियाणे बदलवले पाहिजे हे महत्वाचे आहे.मित्रानो बीटी कापसाला *250/350* फुलपाती लागते 8/10 गळून गेल्या तर काही फरक पडत नाही, *फुलपाती झाडावर टिकऊन ठेवणे महत्वाचे आहे,* ज्या गळून गेल्या त्यावर उपाय न करता झाडावरच्या पात्या कशा टिकून राहतील त्यावर उपाय करा.उपाय - फुलपाती गळ होणे नैसर्गिक आहे,त्यासाठी आपण जी कीटकनाशकांची फवारणी करत आहात त्यात एन ए ए हे संजीवक (प्लॅनोफिक्स) 15 लिटर पंपाला 5 मिली फवारणी करावी ,5 मिली पेक्षा जास्त वा कमी करू नये *5 मिली म्हणजे पाचच मिली प्रमाण घ्यावेटीप - हे संजीवक एन ए ए (प्लॅनोफिक्स) कोणत्याच बुरशी नाशकासोबत फवारू नये.

 

अधिक माहिती साठी संपर्क

श्री प्रा.दिलीप शिंदे सर

भगवती सीड्स ,चोपडा जिल्हा जळगाव

भ्रमणध्वनी -9822308252

English Summary: Sudden dieback and blight in cotton crop and simple remedies
Published on: 17 July 2022, 03:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)