Agripedia

हिंगणघाट, २० जून २०२५: उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (MSRLM) आणि राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पाच्या (NRETP) सहकाया ने, हिंगणघाट तालुक्यातील पोहना गावातील शेतकरी कुटुंबांतील महिलांनी मीराज प्रभाग संघाच्या माध्यमातून एक पथदर्शी कृषी सेवा केंद्र यशस्वी रत्या सुरू केले आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण मfहलांच्या सक्षमीकरणाला आणि कृषी विकासाला नवी दिशा मिळाली आहे.

Updated on 20 June, 2025 4:37 PM IST

हिंगणघाट, २० जून २०२५: उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (MSRLM) आणि राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पाच्या (NRETP) सहकाया ने, हिंगणघाट तालुक्यातील पोहना गावातील शेतकरी कुटुंबांतील महिलांनी मीराज प्रभाग संघाच्या माध्यमातून एक पथदर्शी कृषी सेवा केंद्र यशस्वी रत्या सुरू केले आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण मfहलांच्या सक्षमीकरणाला आणि कृषी विकासाला नवी दिशा मिळाली आहे.

राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पांतग त (NRETP) राज्यातील १५ जिल्ह्यांमधील ५५ तालुक्यांमध्ये कृषी आणि कृषी संलग्न उद्योगांची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मूल्यवर्धन साखळीत महिलांचा सहभाग वाढवणे, उत्पादक गट, महिला शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC/PE) स्थापन करणे आणि सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी सेंद्रिय शेती प्रभाग स्थापन करणे ही या प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्ट्य आहेत. ग्रामीण कुटुंबांची उपजीविका बळकट करण्यासाठी ग्राम संघ आणि  प्रभाग संघांमार्फत विविध उपक्रम राबवले जातात. पोहना येथील या कृषी सेवा केंद्राच्या स्थापनेने हे उद्दिष्ट प्रत्यक्षात आणले आहे.

या कृषी सेवा केंद्राद्वारे शेतकऱ्यांना उच्च दजा ची बियाणे, खते, कीटकनाशके, तसेच शेतीविषयक मार्गदर्शन एकाच छताखाली उपलब्ध होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचत असून, त्यांना योग्य निविष्ठा मिळण्यास मदत होत आहे. महिलांनी केवळ स्वतःच्या आर्थिक प्रगतीचा माग च निवडला नाही, तर सम्पूर्ण गावासाठी कृषी विकासाचे एक नवे दालन उघडले आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेत माग दश न व कौतुक

 दिनांक १७ जून २०२५ रोजी झालेल्या मीराज प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. INDIAGRO वर्धा चे कृषी माग दर्शक श्री. रोशन शिंदे आणि KRISHI JAGRAN वर्धा चे वाता हर श्री. उल्हास पवार यांनी शेतकऱ्यांना शेती व्यवस्थापनाबद्दल सखोल माग दश न केले. त्यांच्या

माग दश नाचा महिला शेतकरी आणि इतर उपिस्थतांना निश्चतच फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.

याच सभेत, हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा. समीर कुणावार यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. त्यांनी सभेत उपिस्थत असलेल्या सव महिला विशेतकरी भगीनींना त्यांच्या काया बद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच, या महिलांच्या कार्याला आणि त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांना सव तोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. आमदारांच्या या पाठिंब्यामुळे हिलांच्या आत्मविश्वासात आणखी वाढ झाली आहे.

पोहना येथील महिलांनी सुरू केलेले हे कृषी सेवा केंद्र हे ग्रामीण

महाराष्ट्राच्या विकासात महिलांचा किती मोठा वाटा असू शकतो, याचे उत्तम प्रतीक आहे. उमेद अभियान आणि NRETP च्या माध्यमातून सुरू झालेल्या या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील आर्थिक आणि

सामाजिपरिवत नाला गती मिळत असून, महिला सक्षमीकरणाचे हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

English Summary: Successful establishment of Agricultural Service Center by Women's Self-Help Groups in Pohna, Hinganghat; Guidance from MLAs and agricultural experts
Published on: 20 June 2025, 04:14 IST