या पद्धतीतील घटक भूपृष्ठावरील ठिबक सिंचन पद्धतीप्रमाणे असून, इनलाईन इमिटिंग पाइप्स जमिनीखाली 10-15 सें.मी. खोलीपर्यंत घालून सर्व ठिकाणी सारख्या प्रवाहाने पाणी दिले जाते. भूपृष्ठांतर्गत (सबसरफेस) ठिबक सिंचन पद्धतीचे फायदे - जमिनीच्या पृष्ठभागावरून पाण्याचे होणारे बाष्पीभवन कमी होते. पाणी वापर क्षमता वाढते आणि पाण्यात बचत होते.- जमिनीचा पृष्ठभाग कोरडा राहिल्याने तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.- इनलाईन इमिटिंग पाइप जमिनीत ठराविक खोलीवर (10 ते 15 सें.मी.) घातली असल्याने यांत्रिक पद्धतीने तोडणी करताना अडचण येत नाही.
- मुळांजवळ गरजेएवढा ओलावा ठेवता येत असल्याने अन्नद्रव्ये सहज उपलब्ध होतात. रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते. इमिटिंग पाइप्सवरील ड्रीपरमधील अंतर व प्रवाह - जमिनीच्या प्रकारानुसार ड्रीपर्समधील अंतर ठेवल्यास पाण्याचे उभे-आडवे प्रसरण योग्य प्रमाणात होऊन पिकास सर्वत्र समान प्रमाणात पाणी मिळते व पिकाची वाढ जोमदारपणे होते.- हलक्या वालुकामय जमिनीसाठी दोन ड्रीपर्समधील अंतर 30 सें.मी. असावे. तर मध्यम खोलीच्या जमिनीसाठी 40 सें.मी. आणि जास्त खोलीच्या चिकणमातीच्या जमिनीसाठी 50 ते 60 सें.मी. असावे.- ड्रीपरचा प्रवाह जमिनीत पाण्याचे होणारे प्रसरण, तसेच उसाच्या मुळांच्या व्याप्तीवर अवलंबून असते.
जमिनीखाली पिकांच्या मुळांच्या सहवासात थेंबा-थेंबाद्वारे सिंचन करण्याच्या पद्धतीला भूपृष्ठांतर्गत (सबसरफेस) ठिबक सिंचन असे म्हणतात. या पद्धतीतील घटक भूपृष्ठावरील ठिबक सिंचन पद्धतीप्रमाणे असून, इनलाईन इमिटिंग पाइप्स जमिनीखाली 10-15 सें.मी. खोलीपर्यंत घालून सर्व ठिकाणी सारख्या प्रवाहाने पाणी दिले जाते. भूपृष्ठांतर्गत (सबसरफेस) ठिबक सिंचन पद्धतीचे फायदे - जमिनीच्या पृष्ठभागावरून पाण्याचे होणारे बाष्पीभवन कमी होते. पाणी वापर क्षमता वाढते आणि पाण्यात बचत होते.- जमिनीचा पृष्ठभाग कोरडा राहिल्याने तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
साधारणपणे 2.5 लिटर प्रति तास प्रवाह देणाऱ्या ड्रीपर्सचा वापर करणे फायदेशीर ठरते.सबसरफेस ठिबक उभारणी करताना खालील काळजी घ्यावी.- इमिटिंग पाइप्सच्या टोकांना एंड कॅप लावण्याऐवजी सर्व टोके कलेक्टर पाइपला जोडावीत व त्याची चरामध्ये उभारणी करावी.- सबमेनच्या खोलीपेक्षा कलेक्टर पाईपची खोली थोडी जास्त असू द्यावी व सबमेनपासून कलेक्टर पाईपपर्यंत थोडा उतार असू द्यावा.- सबमेन व कलेक्टर पाइपमधिल हवा निघून जाण्यासाठी एअर व्हॉल्व्ह बसवावेत.- सबमेन फ्लश करण्यासाठी फ्लश व्हॉल्व्ह बसवावेत.- दाब जाणून घेण्यासाठी सबमेनवर दाबमापकाचा अवलंब करावा.
शेतकरी हितार्थ
Published on: 05 June 2022, 12:45 IST